AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Apple iPhone 15 : घरपोच मिळवा iPhone 15! कशाला तंगडतोड करताय

Apple iPhone 15 : आयफोन 15 मिळविण्यासाठी गर्दीतच उभं राहावं असं तुम्हाला कोणी सांगितलं. आता 15 तास उभं राहून मिळवायला तो काय प्रसाद आहे का? करकरीत नोटा मोजल्या असतील, हप्ते मॅनेज करायचे असतील, तर मग नवीन आयफोन घरपोच का नको मिळायला? हो की नाही..

Apple iPhone 15 : घरपोच मिळवा iPhone 15! कशाला तंगडतोड करताय
Follow us
| Updated on: Sep 23, 2023 | 9:41 AM

नवी दिल्ली | 23 सप्टेंबर 2023 : Apple चा iPhone 15 मिळविण्यासाठी 15 तास रांगेत थांबलो, अमक्या ठिकाणाहून आलो, इतका प्रवास केला. इतक्या तास उभा राहिलो हे काय फुशारकीने सांगायच्या गप्पा आहेत का? तुम्ही पैसे देऊन हा दमदार फीचर असलेला नवीन स्मार्टफोन खरेदी करत आहात. त्यासाठी रांगेत उभं राहायची काय गरज आहे. या शहरातील लोकांनी तर मिळूच रांगेत थांबू नये. या शहरातील चाहत्यांना हा स्मार्टफोन घरपोच (Doorsteps Home Delivery) मिळू शकतो. तेही डिस्काऊंटमध्ये, बोला आता. अनेक जण सकाळ, रात्रीपासून स्टोअरसमोर उभे आहेत. त्यांना ही युक्ती कदाचित माहिती नसेल, पण आता तुम्हाला कळली तर मग रांगेत उभं राहणार की घरपोच iPhone 15 मिळवणार?

या शहरातील चाहत्यांसाठी सरप्राईज

तर तुम्ही दिल्ली, दिल्ली-एनसीआर, मुंबई, पुणे आणि बंगळुरुमध्ये राहत असाल अथवा तुमचा नातेवाईक, मित्र या शहरात राहत असेल तर आयफोन 15 घरपोच मिळवणं सहज शक्य आहे. त्यासाठी मोठी मेहनत करण्याची गरज नाही. रांगेत उभं राहण्याची गरज नाही. अवघ्या काही तासांत हा स्मार्टफोन तुमच्या हातात असेल. त्यासाठी तुम्हाला हे App मात्र वापरावं लागेल.

हे सुद्धा वाचा

यापूर्वी पण घरपोच सेवा

तर या App च्या मदतीने iPhone 14 आणि iphone 14 Pro ग्राहकांना घरपोच मिळाला होता. त्यांना काही स्टेप फॉलो केल्यानंतर लागलीच हा स्मार्टफोन बुक झाला. त्यानंतर त्यांना निश्चित वेळी हा स्मार्टफोन घरपोच मिळाला होता. त्यामुळे या चाहत्यांना नाहक रांगेत उभं राहवं लागले नाही. त्यांना आयफोनसाठी पाय दुखवावे लागले नाही.

Blinkit येईल मदतीला

तर Blinkit App तुमच्या मदतीला येईल. दिल्ली, दिल्ली-एनसीआर, मुंबई, पुणे आणि बंगळुरुमधील ग्राहकांना हा स्मार्टफोन त्यांच्या घरपोच मिळेल. त्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. ग्राहकांना iPhone 15 आणि iPhone 15 Plus घरपोच मिळेल. हा स्मार्टफोन कमी कालावधीत ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे Blinkit चे सीईओ आणि सहसंस्थापक अलबिंदर दिंडसा यांनी स्पष्ट केले.

या स्टेप्स करा की फॉलो

  1. Blinkit वर जा, बाय नाऊ हा पर्याय निवडा. अटी व शर्तीं नक्की वाचा.
  2. तुम्ही नो-कॉस्ट ईएमआयसाठी पात्र आहात का? निकषात बसता का, हे तपासा.
  3. एचडीएफसी कार्डधारकांना 5,000 रुपयांची विशेष सवलत मिळते हे लक्षात ठेवा.
  4. Place Order ही कळ, बटण दाबा.
  5. तुम्हाला कोणते मॉडल हवे, त्याचा रंग आणि इतर तपशील जमा करा.
  6. सगळे सोपास्कार पार पडल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल. काही तासात, मिनिटात आयफोन तुमच्या हातात असेल.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू.
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया.
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?.
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन.
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?.