Samsung च्या या ढासू स्मार्टफोनवर 10 हजार रुपयांहून अधिक डिस्काऊंट

तुम्हाला तुमचा स्मार्टफोन (Smartphone) अपग्रेड करायचा आहे आणि जास्त पैसेदेखील खर्च करायचे नसतील तर तुमच्यासाठी एक बेस्ट ऑफर आहे.

Samsung च्या या ढासू स्मार्टफोनवर 10 हजार रुपयांहून अधिक डिस्काऊंट
Follow us
| Updated on: Jan 22, 2021 | 11:54 PM

मुंबई : जर तुम्हाला तुमचा स्मार्टफोन (Smartphone) अपग्रेड करायचा आहे आणि जास्त पैसेदेखील खर्च करायचे नसतील तर तुमच्यासाठी एक बेस्ट ऑफर आहे. सॅमसंगने त्यांचा ढासू स्मार्टफोन गॅलेक्‍सी एम51 (Samsung Galaxy M51) वर जबरदस्‍त डिस्‍काऊंट देऊ केला आहे. सॅमसंग गॅलेक्‍सी एम51 मध्ये तुम्हाला 7000 mAh ची दमदार बॅटरी आणि बरेच फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने या स्मार्टफोनवर 10,000 रुपयांहून अधिक डिस्काऊंट दिला आहे. परंतु तुम्हाला या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर सॅमसंग रिटेल आऊटलेटवर (Retail Outlet) जावं लागेल. कारण कंपनीने ही सूट ऑनलाईन ग्राहकांना दिलेली नाही. तसेच ही ऑफर केवळ 24 जानेवारी 2021 पर्यंतच असेल. (get more than 10 thousand rupees discount on this samsung smartphone, know features and price of Samsung Galaxy M51)

सॅमसंग गॅलक्सी एम 51 ग्राहकांना फक्त 12 हजार 249 रुपयांत खरेदी करता येणार आहे. टेक वेबसाईट 91 मोबाईल्सच्या एका रिपोर्टनुसार सॅमसंग हा स्मार्टफोन अपग्रेड प्रोग्रामअंतर्गत विकत आहे. यानुसार गॅलक्सी एम 51 या मोबाईलवर ग्राहकांना 2 हजार 750 रुपयांची सूट सॅमसंगने देऊ केली आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन खरेदी करताना जर ग्राहक जुना फोन देत असतील तर त्यांना 8 हजार रुपयांपर्यंतची एक्सचेंज सवलतही मिळेल. पण ही रक्कम तुम्ही देत असलेल्या फोनवर अवलंबून असेल. आता या दोन्ही ऑफरचा विचार केला असता ग्राहकांना एकूण 10 हजार 750 रुपयांचा फायदा होवू शकतो. यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे ही ऑफर फक्त दुकानात जावून मोबाईल खरेदी करणाऱ्यालाच मिळेल.

या फोनमध्ये तुम्हाला 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड इनफिनिटी ओ डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्र्रॅगन 730 जी प्रोसेसर दिला आहे. फास्ट ग्राफिक्स अनुभवण्यासाठी या फोनमध्ये अड्रीनो 618GPU दिला आहे. या फोनमध्ये 8 जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेज दिला आहे. स्टोरेज स्पेस मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते. या फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सोनी IMX682 सेंसर दिला आहे. तसेच 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, 5 मेगापिक्सलचा मायक्रो आणि 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. फोनमध्ये पुढच्या बाजुला 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

या फोनमध्ये 7000mAh ची बॅटरी दिली आहे. 25 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट सुद्धा दिला आहे. कंपनीचा दावा आहे की, या फोनची बॅटरी 115 मिनिटात शून्य ते 100 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. यूएसबी टाइप सी पोर्ट सोबत या फोनमध्ये रिव्हर्स चार्जिंग फीचर्स सुद्धा दिले आहेत. इलेक्ट्रिक ब्लू आणि सेलेस्टियल ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये येणारा हा फोन ग्राहकांच्या पसंतीय उतरला आहे.

हेही वाचा

शानदार ऑफर! केवळ 48,900 रुपयांमध्ये खरेदी करा iPhone 12 सिरीजचे स्मार्टफोन्स

Samsung चा ग्राहकांना दणका, ‘या’ नव्या Smartphones सोबत Charger मिळणार नाही

(get more than 10 thousand rupees discount on this samsung smartphone, know features and price of Samsung Galaxy M51)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.