AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

iPhone 15 Discounts : बाप्पा पावला! स्वस्तात खरेदी करा iPhone 15, मिळणार मोठं डिस्काऊंट

iPhone 15 Discounts : ॲप्पलच्या आयफोन 15 वर ग्राहकांसाठी आता खास सवलतीचा वर्षाव झाला आहे. ग्राहकांसाठी विशेष डिस्काऊंट जाहीर झाल्याने हा स्मार्टफोन स्वस्तात मिळेल.

iPhone 15 Discounts : बाप्पा पावला! स्वस्तात खरेदी करा iPhone 15, मिळणार मोठं डिस्काऊंट
Follow us
| Updated on: Sep 20, 2023 | 4:21 PM

नवी दिल्ली | 20 सप्टेंबर 2023 : आयफोन-15 चाहत्यांना गणपती बाप्पा पावला. त्यांना हा स्मार्टफोन आता स्वस्तात खरेदी करता येईल. भारतात उत्पादन होऊनही इतर देशांपेक्षा आयफोन15 महागडा मिळत असल्याची ओरड सुरु होती. ग्राहक त्यामुळे नाराज होते. पण कंपनीने त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. ग्राहकांसाठी खास डिस्काऊंटची घोषणा ॲप्पल कंपनीने (Apple India) केली आहे. आयफोन-15 साठी प्री-ऑर्डरची तारीख 22 सप्टेंबर 2023 ही ठेवण्यात आली आहे. ग्राहकांसाठी कंपनीने खास सवलत जाहीर केली आहे. कंपनीच्या वेबसाईटवर, दिल्ली आणि मुंबई येथील आऊटलेटवर ही सवलत ग्राहकांना मिळेल. कंपनीच्या आयफोन-15 मालिकेवर (iPhone 15 Discounts) हा सवलतीचा वर्षाव करण्यात आला आहे.

अशी मिळणार सवलत

India Today, नुसार या सवलतीचा ऑनलाई आणि ऑफलाईन पद्धतीने लाभ घेता येईल. भारतीय ग्राहकांना आयफोन 15 मालिकेवर म्हणजे चार मॉडेलवर सवलत मिळेल. 6000 रुपयांची सवलत ग्राहकांना मिळेल. त्यासाठी ग्राहकाकडे एचडीएफसीचे कार्ड असणे आवश्यक आहे. त्याआधारे हा फोन सवलतीत मिळवता येईल. iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro, iPhone 15 Pro Max या चार मॉडेल्सवर सवलतींचा पाऊस पडला आहे.

हे सुद्धा वाचा

स्वस्तात मिळवा आयफोन 15

  1. आयफोन 15 आता 79,900 रुपयांऐवजी 74,900 रुपयांना मिळेल
  2. आयफोन 15 प्लस 84,900 रुपयांना मिळेल, त्याची मुळ किंमत 89,900 रुपये आहे.
  3. आयफोन 15 प्रो आता 1,28,900 रुपयांना उपलब्ध, मुळ किंमत 1,34,900 रुपये
  4. आयफोन 15 मॅक्स आता 1,53,900 रुपयांना, मुळ किंमत 1,59,000 रुपये आहे.

आयफोन 14 वर पण मिळवा विशेष सवलत

  1. आयफोन 14 वर पण खास सवलत जाहीर करण्यात आली आहे.
  2. आयफोन 14 ग्राहकांना 69,900 रुपयांऐवजी 65,900 रुपयांना मिळेल.
  3. आयफोन 14 ग्राहकांना 79,900 रुपयांऐवजी 75,900 रुपयांना उपलब्ध
  4. आयफोन 13 आता ग्राहकांना 56,900 रुपयांना मिळेल, मुळ किंमत 56,900 रुपये

काय आहे इस्त्रो कनेक्शन

ॲप्पलच्या नव्या दमाच्या आयफोनमध्ये इस्त्रोचे नेव्हिगेशन आहे. iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max मध्ये इस्त्रोचे GPS बसविण्यात आले आहे. हे मॉडेल इंडियन सॅटेलाईट नेव्हिगेशन सिस्टमचा उपयोग करणार आहे.. पहिल्यांदाच आयफोन युझर्स परदेशी नाही तर भारतीय जीपीएस सिस्टमचा वापर करतील. त्यामुळे भारतीय युझर्सला प्रवासा दरम्यान, नकाशा पाहण्यासाठी या नॅव्हिगेशनचा वापर करता येईल.

प्रतिक्षा संपली

iPhone 15, 15Plus आणि15 Pro सारखे इतर स्मार्टफोन मॉडल ऑनलाईन खरेदीसाठी आणि डिलिव्हरीसाठीचा कालावधी वाढला आहे. 22 सप्टेंबर रोजी दिल्ली आणि मुंबईतील Apple स्टोअरमध्ये हे मॉडल उपलब्ध आहेत. 22 सप्टेंबर रोजी कंपनी भारतासह जवळपास 40 देशांमध्ये iPhone 15 एकाचवेळी लाँच करेल. Apple ची मालकी असलेले ऑनलाईन स्टोअरवर iPhone 15 Pro Max चा प्रतिक्षा कालावधी एक महिन्यांहून अधिक झाला आहे. जागतिक बाजारातील अनेक बाजारात या मॉडेलची कमतरता आहे.

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.