I Phone लव्हर्ससाठी खुशखबर! ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या सेलमध्ये किंमत घसरण्याची शक्यता

सेलआणि नवीन सीरिजच्या आगमनामुळे iPhone 13 ची किंमत 50 हजार रुपयांपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास हँडसेटची ही आजपर्यंतची सर्वात कमी किंमत असेल.

I Phone लव्हर्ससाठी खुशखबर! ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या सेलमध्ये किंमत घसरण्याची शक्यता
I phone 13Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 7:14 AM

जर तुम्ही आय फोन लव्हर आहात आणि I phone 13 घेण्याच्या विचारात आहात तर  ही तुमच्यासाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे.  आगामी सणासुदीच्या सेलमध्ये iPhone 13 सर्वात कमी किमतीत मिळू शकेल. या हँडसेटची  किंमत कमी होण्याची अनेक कारणे आहेत. एक म्हणजे फ्लिपकार्ट (Flipkart sale) आणि ॲमेझॉनवर (Amezon sale) होणारा सेल आणि दुसरा म्हणजे आयफोन 14 (I phone 14) सीरीजचा लॉन्च. सेलआणि नवीन सीरिजच्या आगमनामुळे iPhone 13 ची किंमत 50 हजार रुपयांपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास हँडसेटची ही आजपर्यंतची सर्वात कमी किंमत असेल. फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन या दोन्ही प्लॅटफॉर्मवर मेगा फेस्टिव्हल सेल होणार आहे.

या विक्रीमध्ये तुम्हाला आकर्षक सवलती मिळतील. फ्लिपकार्टवर जिथे बिग बिलियन डेज (Flipkart Big billion Days) सेल सुरू होणार आहे. त्याचवेळी Amazon ने ग्रेट इंडियन फेस्टिव्हल ( Amazon Great Indian Festival) सेलचीही घोषणा केली आहे. हे दोन्ही सेल या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होऊ शकतात. या सेल्समध्ये तुम्हाला iPhone 13 वर बँक ऑफर, सेल डिस्काउंट आणि इतर फायदे मिळतील.

 आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत उपलब्ध असेल

या ऑफरसह,  I Phone 13 55 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी केले जाऊ शकतो असे जाणकारांचे मत आहे. मात्र, ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टकडून याची अधिकृत माहिती दिल्या गेलेली नाही.  सध्या हा फोन फ्लिपकार्टवर 69999 रुपयांना लिस्ट झाला आहे.

जर तुम्ही HDFC कार्ड वापरत असाल तर तुम्हाला रु.2000 ची सूट मिळेल. याशिवाय फ्लिपकार्टवर 19,999 रुपयांची एक्सचेंज ऑफरही उपलब्ध आहे.

त्याच वेळी, आयफोन 14 सिरीज  7 सप्टेंबर रोजी लॉन्च होणार आहे. हा फोन लॉन्च झाल्यानंतरही iPhone 13 ची किंमत कमी होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे, आगामी सेलमध्ये तुम्ही हा फोन अतिशय कमी किमतीत खरेदी करू शकाल.

असा आहे iPhone 13

iPhone 13 ला 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले मिळेल, जो 2532×1170 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 460ppi पिक्सेल डेन्सीटीसह येतो. फोन A15 बायोनिक चिपसेटवर काम करतो. यामध्ये तुम्हाला 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेजचा पर्याय मिळेल.

डिव्हाइस iOS 15 वर कार्य करते. ऑप्टिक्सबद्दल बोलायचे झाले तर यात ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, ज्याची मुख्य लेन्स 12MP आहे. दुय्यम लेन्स देखील 12MP चा आहे. फ्रंटमध्ये कंपनीने 12MP सेल्फी कॅमेरा दिला आहे.  यात 3240mAh बॅटरी आहे, जी 20W चार्जिंगला सपोर्ट करते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.