PhonePe : फोनपे आले मैदानात, लाँच केले नवीन ॲप स्टोअर

PhonePe : फोनपे पण मैदानात उतरले आहे. Google आणि Apple च्या ॲप स्टोअरला ते टफ फाईट देईल. हे नवीन ॲप स्टोअर 12 भाषांमध्ये उपलब्ध झाले आहे. या देशी स्वॅगने इतर दोन्ही ॲप स्टोअरची झोप उडवली आहे. काय आहे Indus Appstore, कोणते ॲप आहेत फ्री, कधी द्यावे लागेल शुल्क

PhonePe : फोनपे आले मैदानात, लाँच केले नवीन ॲप स्टोअर
Follow us
| Updated on: Sep 24, 2023 | 4:53 PM

नवी दिल्ली | 24 सप्टेंबर 2023 : कोणतेही ॲप डाऊनलोड करायचे असेल तर आपण आता सहज गुगल प्ले स्टोअर अथवा ॲप्पलच्या ॲप स्टोअरचा आपण सर्रास वापर करतो. कोणतेही ॲप सहज शोधता येते आणि झटपट डाऊनलोड होते म्हणून प्रत्येक जण या दोन ॲपचा सर्वाधिक वापर करतो. आता या दोन्ही अमेरिकन कंपन्यांना टक्कर देण्यासाठी मेड इन इंडिया ॲप स्टोअर आले आहे. दिग्गज डिजिटल पेमेंट कंपनी PhonePe ने स्वदेशी Indus Appstore लाँच केले आहे. भारतात तयार केलेले हे ॲप स्टोअर चर्चेचा विषय ठरलेला आहे. या नवीन ॲप स्टोअरवर तुम्हाला तुमची यादी तयार करता येते. डेव्हलपर्ससाठी तर फोनपेने अनेक सोयी-सुविधा दिल्या आहेत. त्यामुळे डेव्हलपर्स फोनपेकडे गर्दी करण्याची शक्यता आहे.

दोन्ही ॲपसमोर आव्हान

इंडस ॲप स्टोअर अनेक सोयी-सुविधा घेऊन आले आहे. हा प्लॅटफॉर्म डेव्हलपर्सला पण अनेक फायदे देणार आहे. त्यामुळे गुगल आणि ॲप्पल या कंपन्यांसमोर आव्हान उभं ठाकलं आहे. आता डेव्हलपर्सला इंडस ॲप स्टोअरमुळे नवीन पर्याय मिळाला आहे. त्यांना या नवीन ॲप स्टोअरचा फायदा होईल.

हे सुद्धा वाचा

Indus Appstore एकदम मोफत

इंडस डेव्हलपर प्लॅटफॉर्म सुरु झाले आहे. फोनपेच्या इंडस ॲप स्टोअरवर पहिल्या वर्षी नोंदणी आणि ॲप अपलोड करणे अगदी मोफत आहेत. त्यासाठी या प्लॅटफॉर्मवर कोणतेही शुल्क आणि इन-ॲप पर्चेस कमीशन देण्याची गरज नसेल. या सर्व सुविधा पाहता हे ॲप गुगल आणि ॲप्पलला तगडी फाईट देणार हे निश्चित आहे.

Indus Appstore चे फीचर्स

भारतीय बाजार डोळ्यासमोर ठेवत या नवीन ॲपमध्ये अनेक नवीन फीचर्स मिळतील. यामध्ये थर्ड-पार्टी पेमेंट प्रोव्हायडर्स, 12 भारतीय भाषांचा पाठिंबा आणि मोबाईल क्रमांकाच्या आधारे लॉगइन सिस्टम सारख्या सुविधा मिळतील. हे ॲप स्टोअर डेव्हलपर्ससाठी टारगेट बेस्ट रिलीज मॅनेजमेंट फीचर घेऊन आले आहे. यामध्ये ॲप अपडेट करण्यासह ते मॉनिटर करण्याचे काम सहज होईल.

ॲपसाठी नवीन पर्याय

AI च्या मदतीने डेव्हलपर्स ॲप व्हर्जन लाँच करतील. तसेच ॲपवर लक्ष ठेऊ शकतील. गुगल त्यासाठी भारतीय स्टार्टअप आणि इतर डेव्हलपर्सकडून 15-30 टक्के कमिशन घेते. त्यामुळे गुगलवर नाराजी असल्याचे समोर आले आहे. आता इंडस डेव्हलपर प्लॅटफॉर्म हा नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.