Google | टेक्स्ट लिहिताच व्हिडिओ तयार, गुगलने अशी केली कमाल
Google | गुगल नवनवीन तंत्रज्ञान आणते. आता गुगलने AI मॉडल LUMIERE सादर केले आहे. त्यामुळे तुम्ही सोप्या पद्धतीने क्रिएटिव्ह व्हिडिओज तयार करु शकता. टेक्सच्या सहायाने तुम्हाला व्हिडिओ तयार करता येतील. कसे आहे हे तंत्रज्ञान, ते कसे काम करते, जाणून घेऊयात...
नवी दिल्ली | 28 January 2024 : 2023 या वर्षाच्या सुरुवातीलाच जगभरात कृत्रिम बुद्धीमता, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (AI) वापर वाढला. पूर्ण वर्षभरात अनेक टूल्स आणि प्रोजेक्ट समोर आले. Google आणि Microsoft सारख्या मोठ्या कंपन्या AI मध्ये मोठी रक्कम गुंतवणत आहेत. गुगलने अनेक टूल्स गेल्या वर्षात सादर केली होती. आता कंपनीने नवीन वर्षात त्यांचे लेटेस्ट AI मॉडेल LUMIERE सादर केले आहे. हे AI मॉडेल खास करुन क्रिएटिव्ह व्हिडिओ तयार करण्यासाठी आणण्यात आले आहे. केवळ टेक्सच्या माध्यमातून क्रिएटिव्ह व्हिडिओ तयार करता येईल.
LUMIERE AI मॉडेल
या नवीन LUMIERE AI मॉडेलच्या मदतीने तुम्ही सोप्या पद्धतीने व्हिडिओ तयार करु शकता. गुगलचे LUMIERE AI मॉडेल तुमची मदत करेल. या टूलच्या मदतीने युझर्स मिनिटांत क्रिएटिव्ह व्हिडिओ तयार करु शकाल. टेक्स दिल्यानंतर अवघ्या काही वेळात व्हिडिओ तयार होईल. अजून हे टूल सार्वजनिक झालेले नाही. त्यावर अजून काम सुरु आहे. लवकरच हे टूल सर्वच युझर्ससाठी उपलब्ध होईल.
केवळ लिहावा लागेल टेक्स्ट
LUMIERE यामुळे सुद्धा खास आहे की, याच्या मदतीने तुम्ही टेक्स्ट लिहून व्हिडिओ क्रिएट करु शकता. हे टूल टेक्स्ट टू व्हिडिओ आणि इमेज टू व्हिडिओ तयार करण्यास मदत करेल. तुम्ही LUMIERE ला लिहून प्रॉम्प्ट करा अथवा इमेज इनपूट द्या. या दोन्ही स्थितीत तुम्हाला चांगला क्रिएटिव्ह व्हिडिओ तयार करता येईल. त्यासाठी कंपनीने X वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात या नव तंत्रज्ञानाची माहिती दिली आहे. त्यानुसार, गुगलचे LUMIERE AI मॉडेल तुमची मदत करेल. या टूलच्या मदतीने युझर्स मिनिटांत क्रिएटिव्ह व्हिडिओ तयार करु शकाल. टेक्स दिल्यानंतर अवघ्या काही वेळात व्हिडिओ तयार होईल.
Introducing Lumiere, a space-time diffusion research model for video generation that synthesizes videos portraying realistic, diverse & coherent motion. It was a collaboration between Google Research, @WeizmannScience, @TelAvivUni, & @TechnionLive. More → https://t.co/BHJYEUwAW7 pic.twitter.com/XTsnimT8uc
— Google AI (@GoogleAI) January 26, 2024
Google चे LUMIERE AI मॉडेलला स्पेस-टाईम यू नेट आर्किटेक्चरचा सपोर्ट आहे. व्हिडिओ देण्यासाठी तुम्हाला काही तरी थीम द्यावी लागेल. त्यासंबंधीचा टेक्स्ट द्यावा लागेल. तुम्ही एक नाचणारे अस्वल असा टेक्स्ट दिला तर काही मिनिटातच डान्स करणाऱ्या अस्वलाचा व्हिडिओ तयार होईल.