Google Chrome वापरत असाल तर व्हा सावधान, या त्रूटींमुळे डीव्हाईस हॅक होण्याचा धोका

केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक मंत्रालयाच्या इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने ( CERT-In ) संगणकाच्या क्रोम युजर्सवर फिशिंग आणि मालवेअर अटॅक होऊ शकतो असा इशारा दिला आहे

Google Chrome वापरत असाल तर व्हा सावधान, या त्रूटींमुळे डीव्हाईस हॅक होण्याचा धोका
google chromeImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 12, 2023 | 1:34 PM

मुंबई | 12 ऑगस्ट 2023 : तुम्ही जर गुगल क्रोम या वेब ब्राऊजरचा वापर करीत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. सरकारने कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने ( CERT-In ) गुगल क्रोम युजरना सावधान केले आहे. या टीमने म्हटले आहे की गुगल क्रोमच्या ठराविक व्हर्जनमध्ये अनेक त्रूटी आहेत. ज्याचा वापर करून सायबर गुन्हेगार तुमच्या संगणकावर ताबा मिळवू शकतात. त्यामुळे गुगल क्रोमचे हे व्हर्जन तुम्ही वापरत असाल तर तुमची पैसे आणि खाजगी माहीती धोक्यात आहे. त्यामुळे खालील उपाय योजून सावध रहा असे आवाहन सरकारने केले आहे.

केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक मंत्रालयाच्या इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने ( CERT-In ) संगणकाच्या क्रोम युजर्सवर फिशिंग आणि मालवेअर अटॅक होऊ शकतो असा इशारा दिला आहे.  युजर्सची संवेदनशील माहीती त्यामुळे धोक्यात सापडू शकते. त्यामुळे यूजर्सनी सावधान राहून पावले उचलायला हवीत. CERT-In ही इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाच्या अधिपत्याखाली काम करणारी संस्था आहे.

कोणते गुगल क्रोम व्हर्जन प्रभावित

CERT-In च्यामते लायनेक्स आणि Mac साठी 115.0.5790.170 च्या आधीचे गुगल क्रोम व्हर्जन आहेत. तर विण्डोजसाठी 115.0.5790.170/.171 च्या आधीचे गुगल क्रोम व्हर्जन आहेत. जर युजर या वरील दोन्ही व्हर्जनपैकी कोणतेही एक व्हर्जन वापरत असतील तर त्यांनी आपली सिस्टीम सुरक्षित करण्यासाठी त्वरीत एक्शन घ्यायला हवी

असे डीव्हाईसला सेफ करा 

– ज्या वेबसाईटबद्दल तुम्हाला खात्री नाही तिची लिंक ओपन करु नये

– सर्व ऑनलाईन अकाऊंटसाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन ( 2FA ) ला इनेबल करावे

– सर्व अकाऊंटसाठी स्ट्रॉंग पासवर्ड आणि तो सेव्ह करण्यासाठी स्ट्रॉंग पासवर्डचा वापर करावा

– आपण सोशल मिडीयावर कोणती माहीती शेअर करताय त्याबाबत दक्ष रहा

– तुमच्या कॉम्प्युटर ऑपरेटींग सिस्टीम आणि सॉफ्टवेअरला लेटेस्ट सिक्युरिटी पॅचसह अपडेट करावे

– संगणकाला मालवेअर-फिशिंग अटॅक पासून वाचण्यासाठी फायरवॉल आणि एण्टीव्हायरस सॉफ्टवेअर वापरावे

वाचण्यासाठी काय करावे 

सिस्टीम हॅक होण्यापासून वाचण्यासाठी CERT-In ने युजरना लवकरात लवकर गुगल क्रोमचे व्हर्जन लेटेस्ट व्हर्जनमध्ये अपडेट करावे. या त्रूटी दूर करण्यासाठी गुगलने एक अपडेट जारी केले आहे.

कॉम्प्युटर हॅक झाल्यास काय होते 

संवेदनशील आणि पर्सनल माहीतीची चोरी होते. आर्थिक नुकसान म्हणजे पैशांची चोरी होते. अटॅकर कंपनीची माहीती चोरून तिच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवू शकतो.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.