Google Event 2021: गूगल पिक्सेल 6, पिक्सेल प्रो ग्राहकांच्या भेटीला, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

Google Event 2021: Apple नंतर आता गूगल स्वतःचा एक ग्लोबल कार्यक्रम आयोजित करत आहे. हा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार आज रात्री साडेदहा वाजता होईल.

Google Event 2021: गूगल पिक्सेल 6, पिक्सेल प्रो ग्राहकांच्या भेटीला, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास
Google Event 2021
Follow us
| Updated on: Oct 19, 2021 | 4:12 PM

Google Event 2021: Apple नंतर आता गूगल स्वतःचा एक ग्लोबल कार्यक्रम आयोजित करत आहे. हा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार आज रात्री साडेदहा वाजता होईल. गुगलने आपल्या ट्विटर हँडलवरून नवीन Google Pixel 6 सीरीज स्मार्टफोनची घोषणा केली आहे. (Google Event 2021 : Pixel 6 and Pixel 6 pro smartphone set to launch today)

Google Pixel 6 सीरीजच्या स्मार्टफोनमध्ये अनेक चांगले स्पेसिफिकेशन्स आणि उत्तम स्पीड देण्यासाठी कस्टमाइज्ड चिपसेटचा वापर केला असल्याचे बोलले जात आहे. या फोनमध्ये Tensor चा वापर करण्यात आला आहे आणि हा गुगलचा पहिला कस्टम मोबाइल चिपसेट आहे. कंपनीच्या मते, हा एक शक्तिशाली, स्मार्ट आणि सुरक्षित स्मार्टफोन आहे.

पिक्सेल 6 फोनमध्ये Exynos 5G मॉडेल वापरण्यात आले आहे. या स्मार्टफोनची किंमत नुकतीच समोर आलेल्या लीकमधून उघड झाली. Pixel 6 ची किंमत 649 EUR (जवळपास 56,200 रुपये) असू शकते, तर Pixel 6 Pro ची किंमत 899 EUR (जवळपास 77,900 रुपये) असेल. मात्र, कंपनीने अद्याप या माहितीला दुजोरा दिलेला नाही.

गुगल पिक्सेल 6 सिरीजमध्ये कंपनी 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट देईल. मागच्या अहवालात सांगण्यात आले होते की, त्यात 33W चार्जिंग ब्रिक दिली जाऊ शकते. विशेष म्हणजे आतापर्यंत पिक्सेल फक्त 18W चार्जिंग स्पीडला सपोर्ट करत असे. गुगलबद्दल असेही सांगितले जात आहे की, कंपनी पिक्सेल 6 लाँच इव्हेंटमध्ये स्वतःचा फोल्डेबल फोन देखील सादर करु शकते.

संभाव्य फीचर्स

आधीच्या काही अहवालांमध्ये असे दिसून आले आहे की, आगामी पिक्सेल 6 सिरीजमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स दिले जातील. यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, 5000mAh बॅटरी, 12 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज स्पेस पिक्सेल 6 प्रो मध्ये देण्यात येईल. त्याचबरोबर, गुगलने असेही म्हटले आहे की, आगामी पिक्सेल 6 सिरीजमध्ये इन-हाउस टेंसर चिपसेट दिला जाईल.

दोन्ही स्मार्टफोनमध्ये स्टॅक रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल, जो बंपच्या आत ठेवला जाईल. त्याच वेळी, पिक्सेल 6 प्रो हा पिक्सेल 6 स्मार्टफोनपेक्षा मोठा असेल. जर कंपनी Apple iPhone 13 लाँच होण्याच्या एक दिवस आधी हा स्मार्टफोन लाँच करत असेल, तर नक्कीच काही मोठे नियोजन असणार हे स्पष्ट आहे. यावेळी कंपनी नक्कीच काहीतरी नवीन सादर करु शकते.

वर्षअखेर Google Pixel Fold लाँच होणार

गुगलने फोल्डेबल पिक्सेल (Google Pixel Fold) फोनचे संकेत देऊन काही वर्ष लोटली आहेत. आता कंपनीने यात थोडीफार प्रगती केली आहे. याबाबतचा डेटा कंपनीने सार्वजनिक केला आहे, अशी अपेक्षा आहे की, Google 2021 च्या अखेरीस हे डिव्हाईस लाँच करेल. डिस्प्ले सप्लाय चेन कन्सल्टंट्सचे वरिष्ठ संचालक डेव्हिड नारंजो यांनी याबाबतची माहिती दिली आहे. नारंजो यांनी नुकत्याच केलेल्या एक ट्वीटमध्ये अशा डिव्हाईसेसची लिस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये SDC कडून LTPO OLED पॅनेल वापरण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये गुगल पिक्सेल फोल्डचे नाव देखील समाविष्ट आहे.

नारंजो यांच्या ट्विटनुसार, एलटीपीओ ओएलईडी डिस्प्ले गुगलच्या पिक्सेल फोल्डवर वापरता येईल. पिक्सेल फोल्डची लाँचिंग टाइमलाइन दर्शविण्याची ही पहिली वेळ नाही. जीएसएम एरिनाच्या मते, गुगलने पिक्सेल 6 सीरिज लाँच करण्याची तयारी केल्यामुळे, टेक दिग्गज कंपनी या वर्षाच्या चौथ्या तिमाहीत आगामी पिक्सेल फोल्डची घोषणा देखील करू शकते. अहवालात असे म्हटले आहे की गुगल 19 ऑक्टोबर रोजी आपली पिक्सेल 6 सिरीज लॉन्च करेल. हार्डवेअर डेव्हलपमेंटच्या सूचनांसह, Google फोल्डेबल डिव्हाइसेससाठी अधिक कस्टमाइज Android सक्रियपणे पुढे नेण्यासाठी ओळखले जाते. तथापि, फोल्डेबल स्मार्टफोनसाठी प्लॅटफॉर्म सक्षम करण्यासाठी इतर OEM द्वारे हे माध्यम म्हणून सुरू झाले.

इतर बातम्या

12GB/256GB, 50MP बॅक, 32MP सेल्फी कॅमेरासह Vivo X70 स्मार्टफोन बाजारात, किंमत…

फेसबुकवर पोस्ट करताना विचार करा, नव्या नियमांचे पालन न केल्यास कारवाई, पब्लिक फिगर्सवरील टीका रोखण्याचा कंपनीचा प्रयत्न

Xiaomi च्या स्लिम, लाइटवेट 5G फोनवर 1500 रुपयांचा डिस्काऊंट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

(Google Event 2021 : Pixel 6 and Pixel 6 pro smartphone set to launch today)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.