Laptops : इतक्या स्वस्तात लॅपटॉप, Google-HP अनेकांचा बाजार उठवणार

Laptops : आता तुम्हाला लवकरच स्वस्तात लॅपटॉप मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी तर ही खास पर्वणी असेल. Google आणि HP ने सर्वात स्वस्त Chromebook Laptops ला बाजारात उतरवण्यासाठी कंबर कसली आहे. खास बाब म्हणजे हे लॅपटॉप अगदी स्वस्त असल्याने अनेक कंपन्यांचे टेन्शन वाढले आहे. काय असेल किंमत या क्रोमबुक मॉडल्सची?

Laptops : इतक्या स्वस्तात लॅपटॉप, Google-HP अनेकांचा बाजार उठवणार
Follow us
| Updated on: Oct 01, 2023 | 9:35 AM

नवी दिल्ली | 1 ऑक्टोबर 2023 : तुमचे लॅपटॉपचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होऊ शकते. स्वस्तात लॅपटॉपसाठी जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही. पॉकेट फ्रेंडली लॅपटॉपसाठी दोन दिग्गज कंपन्यांनी हातमिळवणी केली आहे. HP आणि Google या दोन मोठ्या टेक कंपन्या स्वस्त लॅपटॉप उपलब्ध करुन देणार आहेत. या दोघांनी Chromebook Laptops बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. खासकरुन विद्यार्थी, शैक्षणिक संस्था आणि सरकारच्या योजनांमध्ये हे लॅपटॉप अत्यंत महत्वाची भूमिका निभावतील. विद्यार्थ्यांसाठी तर ही पर्वणीच असेल. या दोन्ही कंपन्या अनेक कंपन्यांचा बाजार उठविण्याच्या तयारीत आहे. कारण हा लॅपटॉप सध्याच्या बाजारात सर्वात स्वस्त असेल असा दावा करण्यात येत आहे.

किती पाहावी लागेल वाट

टेक जगतातील या दोन दिग्गज कंपन्यांनी स्वस्तात लॅपटॉप बाजारात उतरविण्यासाठी खास प्रकल्प सुरु केला आहे. Chromebook Laptops चे उत्पादन या 2 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे ते बाजारात येण्यास फार उशीर होणार नाही. भारतीय शैक्षणिक क्षेत्रात कोरोना काळानंतर अमुलाग्र बदल झाला आहे. तंत्रज्ञानाची मोठी गरज वाढली आहे. त्यामुळेच क्रोमबुक भारतात तयार करण्यात येत आहे. त्याचा विद्यार्थ्यांनाच नाही तर अनेकांना फायदा होणार आहे.

हे सुद्धा वाचा

Google HP Laptops चे फीचर्स?

गुगल आणि एचपी कंपनीच्या या अपकमिंग मॉडल्समध्ये अनेक फीचर्स मिळतील. त्याविषयीची उत्सुकता ताणल्या गेली आहे. अनेक गोष्टी अद्याप गुलदस्त्यात आहेत. पण विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालत हे क्रोमबुक बाजारात उतरविण्यात येईल. विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील असे फीचर्स देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच आताच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर शैक्षणिक क्षेत्रासाठी करण्याचा प्रयत्न आहे.

JioBook ला थेट टक्कर

एचपी आणि गुगल पूर्वीच स्वस्तात लॅपटॉप देण्याचा प्रयत्न जिओबुकने केला आहे. यापूर्वीच 16 हजार 499 रुपयांमध्ये जिओबुक बाजारात उपलब्ध आहे. हे डिव्हाईस तुम्हाला रिलायन्स डिजिटल, जिओ मार्ट आणि ॲमेझॉनवर खरेदी करता येईल. 11.6 इंचची एचडी स्क्रीनसह स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी या डिव्हाईसमध्ये मीडियाटेक ऑक्टा-कोर प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. हा लॅपटॉप एकदा फुल चार्ज झाल्यानंतर 8 तासांहून अधिक काळ चालतो. आता या डिव्हाईसच्या तुलनेत या दोन कंपन्यांचा लॅपटॉप काय रेंजमध्ये मिळले हे समोर येईलच.

बरं किंमत तरी किती

रिपोर्ट्सनुसार Chromebook लॅपटॉप मॉडल्स 20 हजार रुपयांमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. या लॅपटॉपचे उत्पादन चेन्नई जवळील फ्लेक्स फॅसिलिटीमध्ये सुरु होत आहे. एचपी कंपनी ऑगस्ट 2020 पासून याच फॅक्टरीतून लॅपटॉप निर्मिती करत आहे.

भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.