Google Maps मध्ये तुमच्या घराचा डिजीटल अ‍ॅड्रेस तयार करता येणार, अचूक लोकेशन शोधणं सोपं होणार

मित्र, नातेवाईक आणि कुटुंबीयांसोबत आपले लोकेशन (Locations) शेअर करण्यासाठी आपण व्हॉट्सअॅप (WhatsApp) किंवा गुगल मॅप्सचा (Google Maps) वापर करतो. ज्यावरुन तुमच्या आसपासचे लोकेशन दर्शवले जाते. 

Google Maps मध्ये तुमच्या घराचा डिजीटल अ‍ॅड्रेस तयार करता येणार, अचूक लोकेशन शोधणं सोपं होणार
Google Map
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 5:05 PM

मुंबई : मित्र, नातेवाईक आणि कुटुंबीयांसोबत आपले लोकेशन (Locations) शेअर करण्यासाठी आपण व्हॉट्सअॅप (WhatsApp) किंवा गुगल मॅप्सचा (Google Maps) वापर करतो. ज्यावरुन तुमच्या आसपासचे लोकेशन दर्शवले जाते. आता गुगल इंडियाने (Google India) घोषणा केली आहे की, कंपनीने एक नवीन फीचर सादर केले आहे. प्लस कोड असे या फीचरचे नाव आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स त्यांच्या घराचा डिजिटल पत्ता (Digital Address Code) तयार करू शकतील. या फीचरद्वारे यूजर्स त्यांच्या घराचा डिजिटल पत्ता तयार करू शकतील. याच्या मदतीने कोणीही तुमच्या अचूक लोकेशनपर्यंत पोहोचू शकेल.

असे म्हणता येईल की Google तुमचा पत्ता डिजिटल कोड नंबरमध्ये रूपांतरित करेल. हे फिजिकल अॅड्रेसपेक्षा पूर्णपणे वेगळे असेल. तसेच, हा पत्ता इतका प्रभावी ठरेल की जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून तुमच्या पत्त्यावर पोहोचता येईल. याच्या मदतीने कोणतीही व्यक्ती तुमच्या अचूक ठिकाणापर्यंत पोहोचू शकेल. हे सध्याच्या पिन कोडप्रमाणे काम करेल.

गोपनीयतादेखील कायम राहील

या डिजिटल पत्त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या पत्त्यावर लोकांचे नाव, परिसर, घर क्रमांक इत्यादींची गरज असणार नाही. हा डिजिटल पत्ता latitude आणि longitude वर आधारित आहे, ज्याला आपण मराठीत अक्षांश आणि रेखांश रेषा म्हणून देखील ओळखतो. प्लस कोड लहान व्यापाऱ्यांसाठीही खूप उपयुक्त ठरतील.

डिजिटल पत्त्यामध्ये काय असेल वेगळं?

डिजिटल अॅड्रेस कोड बनवण्यासाठी देशातील प्रत्येक घर वैयक्तिकरित्या ओळखले जाईल आणि पत्ता जियोस्पेशियल कोऑर्डिनेट्सशी (भू-स्थानिक निर्देशांक) जोडले जाईल. यासह, प्रत्येकाचा पत्ता नेहमी रस्त्याने किंवा परिसराने नव्हे तर संख्या आणि अक्षरे असलेल्या कोडद्वारे ओळखला जाऊ शकतो. हा कोड कायमस्वरूपी असेल.

सध्याचे फीचर्स

सध्या आपण आपल्या लोकेशनसाठी Google Maps आणि WhatsApp वापरतो, ही एक सोपी प्रक्रिया आहे. या लोकेशनमध्ये दोन प्रकारचे पर्याय आहेत, त्यापैकी एक स्टँडर्ड आणि दुसरा लाईव्ह लोकेशनचा पर्याय आहे. लाइव्ह लोकेशन तुमच्या फोनच्या लोकेशनवर अवलंबून असते, जे एकाच वेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते, तर स्टँडर्ड लोकेशनमध्ये अशी सुविधा नसते.

इतर बातम्या

11000 रुपयांच्या रेंजमध्ये 5 बेस्ट स्मार्टफोन्स, जाणून घ्या कॅमेरा डीटेल्स आणि फीचर्स

PHOTO | फिटनेस प्रेमींसाठी लवकरच भारतात येतोय Redmi Smart Band pro.; मोठ्या डिस्प्लेसोबत आहेत आकर्षक फीचर्स !

ओप्पोच्या ग्राहकांसाठी गुड न्यूज…फास्ट चार्जिंग मोबाईलच्या जगात आता ओप्पो ठेवणार पाय, स्मार्टफोन झटपट चार्ज होणार!

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.