Google Maps वर हवेची गुणवत्ता तपासा, AQI फिचरची मदत घ्या

Google Maps New Feature: प्रदूषणापासून दूर राहण्यासाठी ही बातमी नक्की वाचा. Google ने भारतातील युजर्ससाठी रिअल-टाईम एअर क्वॉलिटी इंडेक्स (AQI) डेटा ट्रॅक करण्यासाठी एक नवीन फिचर आणले आहे. Google Maps च्या माध्यमातून रिअल टाईम एअर क्वॉलिटी इंडेक्सची (AQI) माहिती मिळू शकते. हे फिचर 40 देशांमध्ये उपलब्ध आहे.

Google Maps वर हवेची गुणवत्ता तपासा, AQI फिचरची मदत घ्या
Follow us
| Updated on: Nov 15, 2024 | 3:22 PM

आता तुम्ही Google Maps वर हवेच्या गुणवत्तेची अपडेटेड माहिती मिळवू शकता. त्यामुळे तुम्ही प्रदूषणाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन तुमची दैनंदिन कामे किंवा प्रवास प्लॅन आखू शकतात. यासाठीच Google ने रिअल-टाईम एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) डेटा ट्रॅक करण्यासाठी एक नवीन फीचर आणले आहे. Google Maps च्या माध्यमातून रिअल टाईम एअर क्वॉलिटी इंडेक्सची (AQI) माहिती मिळू शकते. 40 देशांमध्ये फीचरचा वापर

Google Maps च्या माध्यमातूनच रिअल टाईम एअर क्वालिटी इंडेक्सची (AQI) माहिती मिळू शकते. हे फीचर 40 देशांमध्ये उपलब्ध आहे. विशेषतः प्रवास करणाऱ्या लोकांसाठी हे फीचर खूप उपयुक्त ठरणार आहे. जर तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी जात असाल तर या फिचरच्या माध्यमातून तुम्ही तिथल्या हवेच्या गुणवत्तेबद्दल आधीच जाणून घेऊ शकता.

AQI ट्रॅकर कसे वापरावे?

स्टेप 1: आपल्या डिव्हाईसवर अ‍ॅपचे नवे किंवा अपडेटेड एडिशन आहे की नाही, याची खात्री करून गुगल मॅप्स अपडेट करा.

स्टेप 2: सर्च बारमध्ये आपल्याला ज्या ठिकाणाची तपासणी करायची आहे त्याचे नाव टाकून लोकेशन शोधा.

स्टेप 3: स्थान दिसल्यानंतर सर्च पट्टीच्या खाली असलेल्या चौरसांच्या स्टॅकसारखे दिसणाऱ्या लेअर्स आयकॉनवर टॅप करा.

स्टेप 4: आता समोर दिसणाऱ्या मेनू पर्यायांमधून “एअर क्वालिटी” निवडा.

काय-काय वापरता येणार?

युजर्स त्या विशिष्ट क्षेत्रासाठी AQI पाहण्यासाठी नकाशावर कोठेही टॅप करू शकतात. युजर्स गुगल मॅप्स अ‍ॅपद्वारे नवीन AQI ट्रॅकरमध्ये प्रवेश करू शकतात, तसेच रहदारी, सार्वजनिक वाहतूक, सायकलिंगसाठी ट्रॅकर देखील वापरू शकतात.

हवेची गुणवत्ता कशी ओळखावी?

0 ते 50 दरम्यानची संख्या चांगल्या हवेची गुणवत्ता दर्शवते. 51 ते 100 हा आकडा अतिशय चांगला नीचांकी स्तर दर्शवितो. त्यानंतर 101 ते 200 हा आकडा सामान्य परिस्थिती दाखवतो. 201 ते 300 ही संख्या वाईट आहे. तर, 301 ते 400 हा आकडा अत्यंत वाईट परिस्थिती आहे. ही संख्या 401 ते 500 च्या दरम्यान असेल तर ती अत्यंत वाईट परिस्थितीसाठी आहे.

रंग दर्शवतो हवेची गुणवत्ता

हवा गुणवत्ता निर्देशांक रंग-कोडेड आहे. हिरवा रंग सुरक्षित आणि निरोगी हवेच्या गुणवत्तेचे प्रतिनिधित्व करतो, तर पिवळा रंग मध्यम पातळी दाखवतो. केशरी अशी हवा सुचवते जी संवेदनशील गटांसाठी अस्वास्थ्यकर असू शकते आणि लाल रंग प्रत्येकासाठी अस्वास्थ्यकर परिस्थिती दाखवतो. जांभळा रंग अत्यंत अस्वास्थ्यकर हवा दाखवतो आणि मरूनचा वापर धोकादायक पातळी दाखवण्यासाठी केला जातो, ज्यामुळे आरोग्यास गंभीर धोका निर्माण होतो.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.