गुगल मॅप्सचं Area Busy फीचर, कोरोना काळात तुम्हाला गर्दीपासून दूर राहण्यासाठी मदत करेल

तुम्ही सुट्टीच्या काळात बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला प्रचंड गर्दीचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला गर्दी टाळायची असेल, तर गुगलचे नवीन फीचर तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे.

गुगल मॅप्सचं Area Busy फीचर, कोरोना काळात तुम्हाला गर्दीपासून दूर राहण्यासाठी मदत करेल
Google Maps
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 5:27 PM

मुंबई : तुम्ही सुट्टीच्या काळात बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला प्रचंड गर्दीचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला गर्दी टाळायची असेल, तर गुगलचे नवीन फीचर तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. गुगलने काही महिन्यांपूर्वी ‘एरिया बिझीनेस’ (Area Busyness) हे फीचर लाँच केले होते. या फीचरमुळे युजर्सना शहराचा कोणता भाग कोणत्या वेळी सर्वात जास्त व्यस्त आहे हे समजेल. (Google Maps testing new feature Area Busy to dock locations)

गुगलच्या या फीचरच्या मदतीने दिवसाच्या कोणत्या वेळी शहरातील कोणते ठिकाण जास्त वर्दळीचे किंवा रिकामे आहे हे लोकांना समजू शकणार आहे. यामध्ये रेस्टॉरंट, दुकाने, लायब्ररीसह इतर ठिकाणांचा देखील समावेश आहे. या सुट्टीच्या मोसमात, हे अॅप अँड्रॉइड आणि iOS डिव्हाईसेससाठी जागतिक स्तरावर लॉन्च केले जाऊ शकते.

व्यस्त क्षेत्राचा संपूर्ण चार्ट एका क्लिकवर दिसेल

एकूणच, ‘एरिया बिझीनेस’ फीचरअंतर्गत, व्यस्त क्षेत्राचा, वर्दळीच्या भागाचा संपूर्ण चार्ट एका टॅपवर (क्लिकवर) पाहता येईल. परिसरातील रेस्टॉरंट्स, दुकाने आणि इतर ठिकाणांच्या माहितीसह, Google मॅप्सवर एकूण ग्राफ पाहता येईल. दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी ते क्षेत्र किती बिझी आहे किंवा सक्रीय आहे हे दर्शवले जाईल. Google Maps वर विशिष्ट ठिकाणी टॅप करून ते पाहता येईल. गेल्या वर्षी देखील Google Maps ने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर बिझी आणि कमी बिझी क्षेत्र दर्शविणारे इंडीकेटर सादर केले होते.

नवीन अपडेट कोरोनाव्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे सोशल डिस्टन्स राखण्यात मदत करू शकते. या फीचरच्या मदतीने लोक गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळू शकतात.

Google ने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, “बिझी एरीया निश्चित करण्यासाठी, आम्ही लोकांच्या डेटा आणि अननोन लोकेशन हिस्ट्रीचं अॅनालिसिस करतो, ज्यांनी या सेटिंग्स त्यांच्या Google अकाउंट चालू करण्याच्या वेळी निवडल्या होत्या. हा डेटा प्रत्येक तासासाठी एरिया किती व्यस्त आहे याची गणना करण्यासाठी उपयुक्त आहे. सर्वात बिझी टाईम हा आमचा बेंचमार्क बनतो आणि त्यानंतर आम्ही त्या वेळेनुसार आठवड्यातील उर्वरित बिझी एरियाचा डेटा दाखवतो.”

इतर बातम्या

WhatsApp News Emoji : व्हाट्सअॅपवर चॅटिंगची मजा होणार आणखी ‘रंगतदार’, इमोजीमध्ये आणणार व्हेरिएशन

Google Pay New Feature : ‘गुगल पे’मध्ये आलं नवं फिचर, आता ऑनलाइन पेमेंट होणार अधिक सोपं

(Google Maps testing new feature Area Busy to dock locations)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.