Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

20X सुपर रेस झूम कॅमेरा, रिअल टाईम ट्रान्सलेशन फीचरसह Google Pixel 6 सिरीज लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेक्स

गुगलने मंगळवारी रात्री गुगल पिक्सेल 6 सीरीजअंतर्गत दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. ज्यामध्ये पिक्सेल 6 आणि पिक्सेल 6 प्रो या दोन स्मार्टफोन्सचा समावेश आहे. यासोबत कंपनीने एक पिक्सेल पास देखील लॉन्च केला आहे.

20X सुपर रेस झूम कॅमेरा, रिअल टाईम ट्रान्सलेशन फीचरसह Google Pixel 6 सिरीज लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेक्स
Google Pixel Phone
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 1:56 PM

मुंबई : गुगलने मंगळवारी रात्री गुगल पिक्सेल 6 सीरीजअंतर्गत दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. ज्यामध्ये पिक्सेल 6 आणि पिक्सेल 6 प्रो या दोन स्मार्टफोन्सचा समावेश आहे. यासोबत कंपनीने एक पिक्सेल पास देखील लॉन्च केला आहे, जो युजर्सना विविध सुविधा पुरवण्याचे काम करेल. कंपनीने पिक्सेल 6 सिरीजसाठी लाईव्ह ट्रान्सलेशन फीचर दिले आहे. हे फीचर मेसेज, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामला सपोर्ट करेल. (Google Pixel 6, Pixel 6 Pro launched with Custom-Built Tensor; know Price, Specifications)

Google Pixel 6 pro चे स्पेसिफिकेशन्स

गूगल पिक्सेल 6 प्रो स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच डायनॅमिक डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 10 हर्ट्ज ते 120 हर्ट्ज इतका आहे. या स्मार्टफोनमध्ये Tensor चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. या फोनचं डिझाईन आकर्षक आहे. यात मोठी बॅटरी आहे. हा फोन 12 जीबी रॅमसह येतो. कंपनीने Pixel 6 Pro ची किंमत 899 डॉलर्स इतकी ठेवली आहे.

Google Pixel 6 Pro चा कॅमेरा सेटअप

Google Pixel 6 Pro च्या कॅमेरा डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाल्यास, याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. जो 2.5X अधिक लाईट कॅप्चर करू शकतो. तसेच याचा सेकेंडरी कॅमेरा 12 मेगापिक्सलचा आणि तिसरा कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. त्याला 20X सुपर रेस झूमचा सपोर्ट मिळेल. या फोनमध्ये मॅजिक इरेझर फीचरदेखील मिळेल.

Google Pixel 6 चे स्पेसिफिकेशन्स

गुगल पिक्सेल 6 मध्ये 6.4-इंच OLED डिस्प्ले आहे. हा एक 5G फोन आहे आणि युजर्सना त्यात Android 12 OS मिळेल. यात फास्ट चार्जिंगसह अनेक लेटेस्ट फीचर्स देण्यात आले आहेत. पिक्सेल 6 च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, याच्या बॅक पॅनेलवर ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे, जो एक वाइड सेन्सर आहे आणि चांगल्या फोटो क्वालिटीसाठी तो लाईट प्रकाश कॅप्चर करू शकतो. तसेच, या फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर आहे. या फोनची किंमत 599 डॉलर्स इतकी ठेवण्यात आली आहे.

लाइव्ह ट्रान्सलेशन

गुगल पिक्सेल 6 मध्ये लाईव्ह ट्रान्सलेशन फीचर देण्यात आले आहे. हे फीचर मेसेज, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामला सपोर्ट करेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही इन्स्टाग्रामवर परदेशी भाषेतील व्हिडिओ पहात असाल तर हे फीचर त्या भाषेचे रिअल टाइममध्ये भाषांतर करेल.

इतर बातम्या

स्ट्राँग बॅटरी, रिव्हर्स चार्जिंगसह Vivo Y3s (2021) भारतात लाँच, किंमत 9499 रुपयांहून कमी

दमदार प्रोसेसर, फास्ट चार्जरसह Realme चे दोन स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स

Samsung ची विक्री जैसे थे, तरीही ठरला जगातील अव्वल स्मार्टफोन ब्रँड, Apple, Xiaomi ला पछाडलं

(Google Pixel 6, Pixel 6 Pro launched with Custom-Built Tensor; know Price, Specifications)

हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत.
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्.
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका.
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या..
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती.
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?.
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्...
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्....