Google Wallet upgrade| Google Payची जागा घेणार Google Wallet, जाणून घ्या काय आहेत फीचर्स
Google Wallet | गुगल वॉलेट फीचरच्या रोल आऊटला सुरुवात झाली आहे. मे महिन्यात Google I/O 2022 मध्ये त्याची घोषणा करण्यात आली होती. गुगल वॉलेट आता गुगल पे ला रिप्लेस करणार आहे.
Google I/O 2022 मध्ये गुगल वॉलेटची (Google Wallet) घोषणा करण्यात आली होती. सध्या असलेल्या गुगल पे (Google Pay)च्या जागी आता हे पेमेंट ॲप येणार आहे. मात्र असे असले तरी अमेरिका व सिंगापूरमध्ये गुगल वॉलेट आणि गुगल पे एकत्र काम करतील. गुगलने वॉलेट ॲपचे फीचर रोल आऊट करण्यास सुरूवात केली आहे. हे ॲप गुगल पे च्या अपडेटसोबत रोल आऊट करण्यात येत आहे. सध्या 39 देशांमध्ये निवडक ॲंड्ऱॉईड युजर्ससाठी हे रोल आऊट सुरू आहे. मात्र थोड्याच दिवसात सर्व युजर्ससाठी लॉंच करण्यात येईल. ‘दि व्हर्ज’ (The Verge) नुसार, येत्या काही काळातच गुगल वॉलेट सर्व देशांमध्ये लॉंच करण्यात येईल. सध्या केवळ 39 देशात हे लॉंच झाले आहे, असे गुगलच्या प्रवक्त्याने सांगितले. भारतात मात्र गुगल वॉलेट ॲप वापरता येणार नाही. येथे गुगल पे हेच वापरता येईल.
काय आहेत Google Wallet चे फीचर्स ?
Google I/O 2022 मध्ये गुगलने या ॲपबद्दल माहिती दिली होती. युजर्सची सर्व डिजीटल कार्ड्स, ज्यामध्ये डेबिट व क्रेडिट कार्डचा समावेश असेल. तसेच ओळखपत्र (Identity card), लसीकरणाचा तपशील, तिकीट , सुरक्षा हे सर्व नमूद असेल. गुगल वॉलेट सर्वच देशांमध्य गुगल पे ची जागा घेईल ( will replace google pay). मात्र सिंगापूर आणि अमेरिका या दोन देशांमध्ये मात्र गुगल पे आणि गुगल वॉलेट ही दोन्ही ॲप्सचे कार्य सुरू राहील, असे समजते. या दोन्ही देशांमध्ये गुगल पे केवळ UPI ॲपप्रमाणे काम करेल. तर गुगल वॉलेट मध्ये सर्व डिजीटिल रेकॉर्ड ठेवता येतील. भारतात मात्र गुगल वॉलेट ॲप वापरता येणार नाही
Phone, keys … Google Wallet. Coming soon to Android, Google Wallet gives you fast, secure access to all your everyday essentials — including payment cards, boarding passes, vaccine cards, event tickets and soon even your driver’s license. #GoogleIO pic.twitter.com/BJXKbykaSw
— Google (@Google) May 11, 2022
गुगल पे च्या या नव्या युजर इंटरफेसमध्ये पेमेंट कार्ड्स, लॉयल्टी कार्ड्स इत्यादींचा सपोर्टही मिळेल. एवढेच नव्हे तर गुगल वॉलेटमध्ये कार्ड्स, एअरलाइन पास, थिएटर तिकीट, ट्रान्झिट फेअर कार्ड्स इत्यादी फीचर्सही उपलब्ध असतील. गुगल वॉलेटच्या सेटिंग्जमध्ये जाऊन Gmailअकाऊंट सोबतही लिंक करता येईल व त्यातील सर्व फीचर्सही वॉलेटमध्ये खेचता येतील.
गूगल पेचे क्रेडिट कार्ड
आता अन्य बँकाप्रमाणे तुम्ही गूगल पेचे क्रेडिट कार्ड (GOOGLE PAY CREDIT CARD) बनवू शकतात. ‘गूगल पे’ने आपल्या ग्राहकांसाठी खास ही सेवा उपलब्ध केली आहे. गूगल पेने अन्य बँकांसोबत सहकार्यात्मक भागीदारी करून ग्राहकांना नवी भेट उपलब्ध करुन दिली आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार गूगल पे क्रेडिट कार्ड साठी अप्लाय करू शकतात आणि लोन वरही खरेदीचा मनमुराद आनंद लुटू शकतात. गूगल पे द्वारे नव्या सेवेसाठी अनेक बँकासोबत सहकार्यात्मक भागीदारी करण्यात आली आहे.