Google च्या या फोनला आहे iPhone सारखी मागणी, प्री-ऑर्डरमध्येच झाला सोल्ड आउट

iPhone ची क्रेझ ही जगात भारी आहे, मात्र आता Google ने एक असा स्मार्टफोन आणला आहे जो आयफोनला टक्कर देतोय

Google च्या या फोनला आहे iPhone सारखी मागणी, प्री-ऑर्डरमध्येच झाला सोल्ड आउट
गुगल पिक्सल 7Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 07, 2022 | 7:24 PM

मुंबई,  Google ने भारतात आपली नवीन स्मार्टफोन सिरीज Pixel 7 लॉन्च केली आहे. या सिरीजमध्ये  Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro हे दोन स्मार्टफोन समाविष्ट आहेत. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये गुगलने नवीन प्रोसेसर दिला आहे. त्यांची विक्री 13 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. गुगलचा हा नवा स्मार्टफोन  पिक्सेल 7 फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. विशेष म्हणजे कंपनीने त्यावर प्री-ऑर्डर ऑफरही जाहीर केली आहे. प्री-ऑर्डर करणारे ग्राहक Fitbit Inspire 2 फक्त Rs 4,999 मध्ये मिळवू शकतात. दुसरीकडे, Pixel Buds A-सिरीजसाठी तुम्हाला फक्त 5,999 रुपये खर्च करावे लागतील. गुगलने या स्मार्टफोन्सच्या किंमती अतिशय आकर्षक ठेवल्या आहेत.

फोन येताच स्टॉक संपला

सुरुवातीच्या किंमतीबद्दल सांगायचे तर, डिस्काउंट ऑफरनंतर तुम्ही Google Pixel 7 हा  50 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकाल. त्यामुळेच या फोनला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र आता स्टॉक संपल्याने हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर  प्री-ऑर्डर करू शकणार नाही.

 Google Pixel 7  किंमत

किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, Google Pixel 7 ची किंमत 59,999 रुपये आहे. हा फोन तुम्ही स्नो, ऑब्सिडियन आणि लेमनग्रास कलर वेरिएंटमध्ये खरेदी करू शकता. दुसरीकडे, Google Pixel 7 Pro साठी तुम्हाला 84,999 रुपये खर्च करावे लागतील.

हे सुद्धा वाचा

हा स्मार्टफोन तुम्ही Hazel, Obsidian आणि Snow या रंगांमध्ये खरेदी करू शकता. दोन्ही फोन 13 ऑक्टोबरला विक्रीसाठी उपलब्ध होतील. गुगलनेही या स्मार्टफोन्सवर सूट जाहीर केली आहे. Pixel 7 Pro वर 11,250 रुपयांची बँक सवलत उपलब्ध आहे. दुसरीकडे, तुम्ही Pixel 7 Rs 49,999 मध्ये खरेदी करू शकता.

ॲपलच्या चुकीचा फायदा गुगलला

Google Pixel 7 मालिकेकडे इतके लक्ष वेधण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे स्मार्टफोनच्या किंमती. यावेळी ॲपलला नवीन काही करता न आल्याने एक पोकळी निर्माण झाली आणि गुगलने याचाच फायदा घेतला. आकर्षक किंमत आणि उत्तम ऑफर्ससह, तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.