नवे वैज्ञानिक घडवण्यास राज्य सरकारचा पुढाकार, विज्ञान अविष्कार नगरी उभारण्यास मान्यता; ठिकाणही ठरलं

वैज्ञानिक दृष्टीकोन, तंत्रज्ञानाचा समाज उन्नतीसाठी उपयोग विचारात घेऊन राज्य स्तरावर विज्ञान अविष्कार नगरीची उभारणी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

नवे वैज्ञानिक घडवण्यास राज्य सरकारचा पुढाकार, विज्ञान अविष्कार नगरी उभारण्यास मान्यता; ठिकाणही ठरलं
cm uddhav thackeray
Follow us
| Updated on: Sep 01, 2021 | 6:10 PM

मुंबई : 21 व्या शतकातील भारत घडवण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाची गरज ओळखून भारताला समृद्ध बनविण्याचे स्वप्न व दूरदृष्टी देऊन हे परिवर्तन करण्यासाठी विज्ञान या विषयाचे अनन्य साधारण आहे. देशाच्या विकासासाठी आणि बौद्धिक पातळी वाढीसाठी देशात संगणक व इंटरनेटची सुविधा उभारण्यात आल्या. वैज्ञानिक दृष्टीकोन, तंत्रज्ञानाचा समाज उन्नतीसाठी उपयोग विचारात घेऊन राज्य स्तरावर विज्ञान अविष्कार नगरीची उभारणी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. (Government of Maharashtra approves Science Invention City near Pune)

21 व्या शतकातील कौशल्ये ( 21st Century Skills), जागतिक नागरिकत्व (Global Citizenship), उद्योग 4.0 (Industry 4.0), उद्योजगकता (Entrepreneurship), वैज्ञानिक दृष्टीकोन (Scientific Temperament), बहु-अनुशासनातत्मक (Multidisciplinary), अनुभवात्मक शिक्षण (Experiential Learning) विद्यार्थ्यांना देण्यासाठी राज्यात जागतिक दर्जाच्या भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरीची (Science City) स्थापना करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

पुणे शहरात विज्ञानाशी संबधित राष्ट्रीय स्तरावरील अनेक संस्था आहेत. त्यामुळे भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी पुणे लगतच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात उभारण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे, भविष्यातील वैज्ञानिक घडविणे यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात 8 एकर जागा उपलब्ध असून त्यापैकी एक एकर जागेत यापूर्वी तेथे विभागीय पातळीचे विज्ञान केंद्र उभारण्यात आले असून उर्वरीत 7 एकर क्षेत्रफळावर जागतिक दर्जाचे विज्ञानातील विविध संकल्पनांवर आधारीत रु. 191 कोटीची vertical भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी पुढील पाच वर्षात उभारण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

इतर बातम्या

निलेश राणेंची करेक्ट कार्यक्रमाची धमकी, राऊतांच्या सुरक्षेत वाढ, 6 शस्त्रधारी जवानांचं सुरक्षा कवच; घराला छावणीचं स्वरुप

लोकांच्या जीवापेक्षा स्वत:चा राजकीय अजेंडा महत्त्वाचा मानू नका; दिलीप-वळसे पाटलांचा राज ठाकरेंना टोला

ज्या आमदारांच्या जीवावर मुख्यमंत्री झालात त्यांना समजून घ्या; राष्ट्रवादीच्या आमदाराचा मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर

(Government of Maharashtra approves Science Invention City near Pune)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.