Vodafone Idea चा अनलिमिटेड डेटा प्लान घेतला आहे का? मग ही बातमी वाचाच
Vodafone Idea Plans: व्होडाफोन-आयडिया टेलिकॉम कंपनीने केलेल्या आरोपात आता स्वत:च अडकल्याचं दिसत आहे. ट्रायने अमर्यादित डेटा प्लॅनबाबत कंपनीची चौकशी सुरू केली आहे.

मुंबई : देशभरातील नेटवर्किंग कंपन्या ट्रायच्या रडारवर आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनलिमिटेड प्लान नियमानुसार ग्राहकांना दिला जातो की याबाबत ट्रायने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने व्होडाफोन आयडिया विरुद्ध तपास सुरु केला आहे. ट्रायने कंपनीच्या अनलिमिटेड डेटा प्लानची चौकशी सुरु केली आहे. व्होडाफोन आयडिया व्यतिरिक्त बीएसएनएलही चौकशीच्या फेऱ्यात आहे. सरकारी टेलिकॉम कंपनीच्या अनलिमिटेड प्लानची चौकशी होत आहे. याआधी अनलिमिटेड 5जी डेटा देणाऱ्या रिलायन्स जिओ आणि एअरटेलची चौकशी सुरु होती.
ईटी रिपोर्टनुसार, बीएसएनएल आणि व्होडाफोन-आयडिया अनलिमिटेड प्लान ऑफर करतात. ट्रायने या प्रकरणी दोन्ही कंपन्यांकडे माहिती मागितली आहे. यापूर्वी ट्राय रिलायन्स जिओ आणि एअरटेलच्या अनलिमिटेड 5 जी प्लानची चौकशी करत होतं. आता व्होडाफोन आयडिया आणि बीएसएनएल रडारवर आलं आहे.
ग्राहकांना लोभ दाखवला ?
व्होडाफोन आयडिया आणि बीएसएनएलने 3 जी-4जी अनलिमिटेड डेटा प्लानच्या किमती कशा ठरवल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी किंमत ठरवली तर नाही ना याबाबत चौकशी सुरु आहे. टेलिकॉम कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनलिमिटेड डेटा प्लान आणि कमी किंमत असलेला प्लान जाहीर केला आहे. टेलिकॉम ऑपरेटर्संनी जाहीर केलेल्या प्लानच्या किमतीवर टेलिकॉम रेग्युलेटरी समिती या महिन्याच्या शेवटी मोठा निर्णय घेणार आहे.
आपल्याच जाळ्यात अडकली व्होडाफोन आयडिया
या वर्षाच्या सुरुवातील व्होडाफोन आयडियाचे कुमार मंगलम बिर्ला यांनी भारतातील टॉप टेलिकॉम कंपन्या असलेल्या जिओ आणि एअरटेलवर निशाणा साधला होता. दोन्ही कंपन्यांनी अनलिमिटेड 5 जी प्लानसाठी खूपच कमी किंमत आकारत आहे, असा आरोप केला होता. पण व्होडाफोन आयडियाचा आरोप त्यांच्याशी अंगाशी आल्याचं दिसत आहे. आता ट्रायने वीआयची चौकशी सुरु केली आहे.
बीएसएनएलच्या 397 रुपयांचा रिचार्ज प्लानमध्ये अमर्यादित डेटा आणि व्हॉईस कॉल्सचा वापर नो फेअर यूज पॉलिसी (FUP) मर्यादेशिवाय आहे. दुसरीकडे, व्होडाफोन आयडिया 2,999 रुपयांमध्ये अमर्यादित दैनिक डेटा लाभासह 365 दिवसांच्या वैधतेची योजना ऑफर करते.