Airtel Prepaid Pack : एअरटेलचा जबरदस्त प्रीपेड पॅक पाहिलात का? जाणून घ्या डेटा अन् कॉल्सबद्दलच्या ऑफर्स
जिओ अन् एअरटेलमध्ये चांगलीच स्पर्धा दिसून येत आहे. जिओच्या अनेक प्रीपेड प्लॅनला टक्कर देण्यासाठी एअरटेलनेही आपल्या प्रीपेड प्लॅनमध्ये बदल केले आहेत.
नवी दिल्ली : सध्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये (Telecom companies) प्रचंड स्पर्धा वाढली आहे. जिओच्या लाँचिंगनंतर ही स्पर्धा अधिकच तीव्र झालेली दिसून येत आहे. 5G च्या युगामध्ये ग्राहकांना सर्वाधिक जलद डेटाची सुविधा हवी आहे, यासह गरजेनुसार कंपन्या आपल्या प्लॅन्समध्ये अमुलाग्र बदल करत नवनवीन ऑफर्स देत आहे. यात, जिओ अन् एअरटेलमध्ये चांगलीच स्पर्धा (Competition) दिसून येत आहे. जिओच्या अनेक प्रीपेड प्लॅनला टक्कर देण्यासाठी एअरटेलनेही आपल्या प्रीपेड प्लॅनमध्ये बदल केले आहेत. ज्या ग्राहकांना डेटा आणि कॉलसाठी काही आकर्षक प्लॅन पाहिजे आहे, त्यांच्यासाठी एअरटेलचे अनेक प्रीपेड (Airtels prepaid pack) उत्तम पर्याय ठरु शकतात. एअरटेलच्या अनेक प्रीपेड प्लॅनवर कंपनीकडून काही खास ऑफर्स आणल्या आहेत. ज्यांचा फायदा घेउन ग्राहक दिलेल्या पर्यायांमधून आपला सर्वोत्तम प्लॅनची निवड करु शकणार आहेत. या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एअरटेलच्या निवडक प्रीपेड प्लॅनबद्दल सांगणार आहोत.
299 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
एअरटेलचा 299 रुपयांचा प्रीपेड प्लॅन अमर्यादित आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना सर्व नेटवर्कवर ॲक्सेस देण्यात आला आहे. याशिवाय युजर्सना रोज 1.5GB डेटाही दिला जातो. या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज शंभर एसएमएस देखील दिले जातात. या पॅकची वैधता 28 दिवस आहे. यासोबत यूजर्सना Airtel Xstream पॅक देखील मिळतो. याच्या मदतीने तुम्ही सोनी लिव्ह अॅप, एक्सस्ट्रीम व्हिडिओ अॅप आणि विंक म्युझिकचा लाभ घेउ शकतात. 2GB डेटा आणि 1 महिन्याची वैधता असलेल्या प्लॅनसाठी तुम्हाला 319 पॅकचीही निवड करता येइल.
719 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
एअरटेलच्या 719 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये अमर्यादित कॉल देखील येतात. यामध्ये दररोज 100 एसएमएस देखील दिले जातात. या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 1.5GB डेटा मिळतो. या प्लॅनसह, वापरकर्त्यांना फास्टटॅगवर 100 रुपयांचा कॅशबॅक, Xstream मोबाइल पॅकची मेंबरशिप मिळते. त्याची वैधता 84 दिवस आहे.
2,999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
तुम्हाला स्वतःसाठी वर्षभराचा प्लॅन घ्यायचा असेल तर 2999 चा प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल. यामध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉल्स आणि दररोज 100 एसएमएस दिले जातात. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटाही दिला जातो. यामध्ये देखील वापरकर्त्यांना Airtel Xtream Pack, Wink Pack आणि इतर फायदे मिळतात. त्याची वैधता 365 दिवस आहे.
179 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
एअरटेलचा 179 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सना महिन्याभरासाठी 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉल्स दिले जातात. यामध्ये एका महिन्यात 300 एसएमएस दिले जातात.