Smartwatch : नुकतीच लाँच झालेली ‘ही’ स्मार्टवॉच पाहिलीत का? गेमींगसह विविध हेल्थ फिचर्सचा समावेश
Fire-Boltt Ninja Pro Plus ही स्मार्टवॉच भारतात नुकतीच लाँच करण्यात आली आहे. या स्मार्टवॉचमध्ये 30 हून अधिक स्पोर्टस वर्कआउट मोड्स देण्यात आलेले आहे. सिंगल चार्जवर ही स्मार्टवॉच पाच दिवस अगदी सहज पध्दतीने चालू शकते.
भारतीय बाजारात अनेक स्मार्टवॉच उपलब्ध आहेत, त्यात आता अजून एक नव्या स्मार्टवॉचची भर पडली आहे. फायर बोल्ट निन्जा प्रो प्लस (Fire-Boltt Ninja Pro Plus) असं त्या नवीन स्मार्टवॉचचं नाव आहे. या स्मार्टवॉचची नुकतीच विक्री सुरु करण्यात आली असून यात गाहकांना विविध फिचर्सही मिळणार आहेत. ही एक बजट स्मार्टवॉच असल्याने सर्वसामान्य अगदी सहज विकत घेउ शकतात. याशिवाय ज्या लोकांना चांगले हेल्थ फिचर्स पाहिजे आहेत, असे लोकही या स्मार्टवॉचची (smartwatch) खरेदी करु शकतात कारण या स्मार्टवॉचमध्ये 30 पेक्षा जास्त स्पोर्टस् वर्कआउट मोड (Sports workout mode) देण्यात आले आहे. याशिवाय यात विविध इनबिल्ट गेमदेखील देण्यात आलेले आहेत. यात एक रेक्टुअँगल डिसप्ले देण्यात आला असून याची स्क्रीन साइज 1.69 इंच इतकी आहे. ही स्मार्टवॉच फ्लिपकार्डवर लिस्टेड आहे.
30 स्पोर्टस् मोड
या स्मार्टवॉचची स्क्रीन साईज 240 बाय 280 पिक्सल इतकी आहे. सोबत याच्या उजव्या भागात एक क्राउन बटन देण्यात आलेले आहे. ज्याच्या मदतीने मेन्यू आणि सेटिंग्समध्ये आपल्या आवडीनुसार बदल करता येउ शकतो. या स्मार्टवॉचला 1.69 इंचाचा डिसप्ले देण्यात आला आहे. व्यक्तींच्या आरोग्यविषयक गरजा ओळखून यात 30 स्पोर्टस मोड देण्यात आलेले आहेत. हे मोड कॅलरीज्चेही मुल्यमापन करतील. या स्मार्टवॉचमध्ये हार्टरेट सेंसर, एसपीओ2 सेंसर, स्लीप मॉनिटरिंग, स्लीप मॅपिंगचीही सुविधा देण्यात आली आहे. ही स्मार्टवॉच इनबिल्ट गेम्ससोबत देण्यात आली आहे.
सिंगल चार्जवर 5 दिवसांचा बॅकअप
ही स्मार्टवॉच केवळ एका चार्जवर पाच दिवस चालत असल्याचा दावा Fire-Boltt Ninja Pro Plus च्या कंपनीकडून करण्यात आला आहे. यासोबत दोन एटीएम वॉटर रेसिस्टेंस क्वालिटी मिळते. तसेच 200 क्लाउड वॉच फेस, म्यूझिक, कॅमेरा कंटोल, स्मार्ट नोटिफिकेशन्स आदी पर्यायदेखील उपलब्ध आहेत. दरम्यान, ही स्मार्टवॉच 2 हजार 499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचचा पहिला सेल 24 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजेपासून सुरु झालेला आहे. ही वॉच मल्टीपल कलरमध्ये उपलब्ध असून यात, ब्लॅक, रेड, ब्लू, पिंक आणि ग्रे कलरचा समावेश आहे.
इतर बातम्या
Sanjay Raut | त्यांना खाजवण्याची सवयच आहे, एक दिवस चमडी फाटणार.. संजय राऊतांनी काय दिला इशारा?