गोपनीय माहिती, गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंडसोबतचं चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी वापरा WhatsApp चं भन्नाट फिचर
तुम्हाला जर WhatsApp वर आलेले खासगी मेसेज इतरांपासून लपवायचे असतील परंतु त्यासाठीची ट्रिक माहिती नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
मुंबई : तुम्हाला जर WhatsApp वर आलेले खासगी मेसेज इतरांपासून लपवायचे असतील परंतु त्यासाठीची ट्रिक माहिती नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. किंवा जे युजर्स WhatsApp चॅटच्या सुरक्षिततेसाठी थर्ड पार्टी अॅप वापरतात त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण इन्स्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp त्यांच्या युजर्सना अॅपमध्ये चॅट सुरक्षित ठेवण्यासाठीचं एक फीचर देतं. त्यामुळे तुमचं WhatsApp चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी अॅपची आवश्यकता नाही.
आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅप अकाऊंट प्रायव्हसी कशी वाढवता येईल, याबाबतची माहिती देणार आहोत. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्ही तुमच्या अॅपवर फिंगरप्रिंट लॉक लावू शकता. खास बाब म्हणजे हे लॉक अगदी सहजपणे अॅक्टिव्हेट करता येईल आणि तितक्याच सहजपणे ते वापरता येईल. (here is how to lock your private messages on whatsapp with fingerprint on android phone)
अॅपमध्येच तुमचं चॅट सुरक्षित ठेवा
- सर्वात आधी तुम्ही तुमचं व्हॉस्टअॅप ओपन करा. होम पेजवर उजव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात तुम्हाला 3 डॉट्स दिसतील, त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्यासमोर काही पर्याय दिसतील, त्यापैकी Settings वर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर Account चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- आता Privacy या पर्यायावर क्लिक करा.
- Privacy वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही पर्याय दिसतील, त्यापैकी सर्वात शेवटी Fingerprint Lock असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करुन Unlock with fingerprint वर क्लिक करा.
- आता तुम्हाला फिंगरप्रिंट रजिस्टर करण्यास सांगितंल जाईल. फिंगरप्रिंट रजिस्टर या पर्यायावर क्लिक करुन तुम्ही तुमच्या आवडीनुसार फिंगंरप्रिंट लॉक टाईम सेट करु शकता.
- यामध्ये तुम्हाला तीन पर्याय मिळतील, तुमच्या सोयीनुसार तुम्ही Immediately, After 1 minute, After 30 Minutes या तीनपैकी एकाची निवड करु शकता.
- यामध्ये तुम्ही Immediately हा पर्याय निवडलात तर अॅप बंद होताच तुमचं लॉक अॅक्टिव्हेट होईल. तर After 1 minute, After 30 Minutes यापैकी कोणताही एक पर्याय निवडल्यानंतर अनुक्रमे 1 मिनिट किंवा 30 मिनिटांनंतर तुमचं लॉक अॅक्टिव्हेट होईल.
इतर बातम्या
Special Report | WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; Privacy Policy च्या मुदतीपासून व्हॉटसअॅपची माघार
(here is how to lock your private messages on whatsapp with fingerprint on android phone)