WhatsApp वरील डिलीट केलेले मेसेज वाचायचे आहेत? मग ही ट्रिक वापरा
अनेकदा आपण मेसेज वाचण्याआधीच समोरच्या युजरने मेसेज डिलीट केलेला असतो. अशा वेळी त्या मेसेजमध्ये काय लिहिलं होतं, त्या युजरने आपल्याला काय पाठवलं होतं, यासारखे अनेक प्रश्न आपल्याला पडतात.
मुंबई : WhatsApp कंपनी त्यांच्या युजर्सच्या मागणीनुसार सातत्याने अॅपमध्ये नवनवे फिचर्स अॅड करत आहे. परंतु WhatsApp चं एक असं फिचर आहे जे काही युजर्सना आवडत नाही अथवा त्यामध्ये नवीन अपडेटची मागणी केली जाते. या फिचरचं नाव आहे डिलीट फॉर एव्हरीवन (Delete for everyone). या फिचरद्वारे कोणताही युजर मेसेज पाठवल्यानंतर तो मेसेज डिलीट करु शकतो. (here is Trick you can use to read Whatsapp deleted message)
अनेकदा आपण मेसेज वाचण्याआधीच समोरच्या युजरने मेसेज डिलीट केलेला असतो. अशा वेळी त्या मेसेजमध्ये काय लिहिलं होतं, त्या युजरने आपल्याला काय पाठवलं होतं, यासारखे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. तो मेसेज वाचण्यासाठी आपण उत्सुक असतो. परंतु WhatsApp मध्ये असं कोणतंही फिचर नाही, ज्याद्वारे आपण डिलीट केलेले मेसेज वाचू शकतो. परंतु आम्ही तुम्हाला डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी एक ट्रिक सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही डिलीट केलेले मेसेज मिळवू शकता.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही ट्रिक वापरण्यासाठी तुम्हाला एक थर्ड पार्टी अॅप इन्स्टॉल करावं लागेल. दरम्यान तुम्हाला एक बाब लक्षात ठेवावी लागेल की, WhatsApp अशा कोणत्याही गोष्टीला प्रमोट करत नाही. तसेच या थर्ड पार्टी अॅपचा तुमच्या प्रायव्हसीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गरज असेल तरच तुम्ही या ट्रिकचा वापर करायला हवा.
WhatsApp वरील डिलीट केलेले मेसेज मिळवण्याची ट्रिक
1. डिलीटेड मेसेज वाचण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या अँड्रॉयड फोनवर WhatsRemoved+ अॅप इन्स्टॉल करावं लागेल. 2. WhatsRemoved+ अॅप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला टर्म अँड कंडिशन्स अॅक्सेप्ट कराव्या लागतील. 3. अॅप वापरण्यासाठी तुम्हाला फोन नोटिफिकेशनचा अॅक्सेस द्यावा लागेल. 4. त्यानंतर तुम्ही असे अॅप्स निवडा ज्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला पाहायचे आहेत. 5. यामध्ये तुम्हाला WhatsApp मेसेज इनेबल करावं लागेल. त्यानंतर continue बटणावर क्लिक करा. तसेच तुम्हाला फेसबुक, इन्स्टाग्रामचाही पर्याय दिसेल. तुम्हाला फेसबुक, इन्स्टाग्रामचेही नोटिफिकेशन्स हवे असल्यास तुम्ही त्यांचे पर्याय इनेबल करु शकता. 6. आता तुम्ही थेट अशा पेजवर जाल जिथे तुम्हाला डिलीट केलेले सर्व मेसेज दिसतील.
गुगल प्ले स्टोरवर असे अनेक अॅप उपलब्ध आहे, ज्याद्वारे तुम्ही व्हॉट्सअॅपवरील डिलीट केलेले मेसेज वाचू शकता. परंतु हे अॅप्स केवळ अँड्रॉयड युजर्ससाठी आहेत, आयओएस युजर्ससाठी कोणतंही अॅप उबलब्ध नाही. शिवाय त्यांच्या सुरक्षिततेबाबत माहिती उपलब्ध नाहीत
संबंधित बातम्या
Whatsapp वरुन पैसे ट्रान्सफर कसे कराल? जाणून घ्या नव्या फिचरची स्टेप बाय स्टेप माहिती
WhatsApp मध्ये सिक्रेट चॅट करणं सोपं होणार; लवकरच येणार ‘हे’ कमालीचं फिचर
Whatsapp पेमेंट्सचा वापर करणार आहात? त्याआधी ‘या’ सहा गोष्टी लक्षात ठेवा
WhatsApp मधील ‘या’ 5 दमदार फिचर्सचा वापर करायलाच हवा
(here is Trick you can use to read Whatsapp deleted message)