नव्या स्मार्टफोनसह Nokia ढासू अ‍ॅक्सेसरीज लाँच करणार, HMD च्या ग्लोबल इव्हेंटमध्ये काय असणार खास

एचएमडी ग्लोबल (HMD Global) कंपनी पुढील महिन्यात एक कार्यक्रम (इव्हेंट) आयोजित करणार आहे. (HMD Global will host an event next month)

नव्या स्मार्टफोनसह Nokia ढासू अ‍ॅक्सेसरीज लाँच करणार, HMD च्या ग्लोबल इव्हेंटमध्ये काय असणार खास
Hmd Global Event
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 10:01 AM

मुंबई : एचएमडी ग्लोबल (HMD Global) कंपनी पुढील महिन्यात एक कार्यक्रम (इव्हेंट) आयोजित करणार आहे. Nokia Mobile च्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार 8 एप्रिल रोजी हा कार्यक्रम आयोजित केला जाणार असून यामध्ये कंपनी नवीन स्मार्टफोन तसेच मोबाइल अ‍ॅक्सेसरीज लॉन्च करणार आहे. (HMD global is going to launch Nokia G10 series and other Accessories)

NokiaPowerUser ने स्पॉट केलेल्या हा इव्हेंट भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरु होईल. यावेळी नेमक्या कोणत्या अ‍ॅक्सेसरीज लाँच केल्या जाणार आहेत, याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु असं म्हटलं जातंय की, या इव्हेंटमध्ये कंपनी Nokia G10 हा स्मार्टफोन लाँच करु शकते.

कंपनीने या कार्यक्रमाची टॅगलाईन #LoveTrustKeep अशी ठेवली असून त्यांनी जारी केलेल्या पोस्टरमध्ये लिहिलं आहे की, ‘Save the date’ आणि पुढे कार्यक्रमाची वेळ आणि तारीख लिहिली आहे. HMD ग्लोबल कंपनी दरवर्षी बार्सिलोना येथे आयोजित मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेसमध्ये आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करते, परंतु गेल्या वर्षी कोरोनामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.

Nokia G10 चे एक्सपेक्टेड फीचर्स

नोकिया जी 10 हा एक मिड रेंज स्मार्टफोन असेल. मिळालेल्या माहितीनुसार या फोनमध्ये 6.4-इंचाची स्क्रीन, ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 48 मेगापिक्सलचा रीअर क्वाड कॅमेरा सेटअप असेल. हा स्मार्टफोन मलेशियाच्या SIRIM सर्टिफिकेशन साइटवरदेखील पाहायला मिळाला होता. या स्मार्टफोनचा मॉडेल नंबर TA-1334 आहे. तथापि, कंपनी या कार्यक्रमात आणखी काही स्मार्टफोन लाँच करणार आहे किंवा नाही, ही बाब कंपनीने अद्याप स्प्ष्ट केलेली नाही. यासह, कंपनी या इव्हेंटमध्ये नोकिया ब्रँडेड पॉवर बँकदेखील लाँच केली जाऊ शकते.

Nokia 5.4 आणि Nokia 3.4 लाँच

दरम्यान, नोकिया मोबाईल ब्रँडने गेल्या महिन्यात बजेट फोनच्या कॅटेगरीमध्ये नुकतेच दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. यामध्ये Nokia 5.4 आणि Nokia 3.4 या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. नोकिया 5.4 एक क्वाड रियर कॅमेरासह सादर करण्यात आला आहे तर नोकिया 3.4 ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह लाँच करण्यात आला आहे. दोन्ही फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन SoCs वर चालतात. दोन्ही फोनमध्ये फ्रंट कॅमेरासाठी डिस्प्लेमध्ये पंच कटआउट होल देण्यात आला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हा फोन युरोपातील काही देशांमध्ये लाँच करण्यात आला होता. त्यानंतर आता हा फोन भारतात लाँच करण्यात आला आहे. दरम्यान, Nokia 3.4 या स्मार्टफोनची भारतात विक्री सुरु झाली आहे.

नोकिया 3.4 चे स्पेसिफिकेशन्स

नोकिया 3.4 मध्ये 6.3 इंचांचा का HD+ डिस्ले देण्यात आला आहे जो 1560 x 720 पिक्सल रेजॉल्यूशनसह मिळतो. सेल्फी कॅमेरासाठी या फोनच्या डिस्प्लेमध्ये पंच होल कटआऊट देण्यात आला आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर देण्यात आला आहे. जो ऑक्टा कोर सीपीयू आणि अॅड्रिनो 610 जीपीयूसह येतो. फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजचा पर्याय देण्यात आला आहे. युजर्स याची इंटर्नल स्टोरेज स्पेस 512 जीबीपर्यंत वाढवू शकतात.

या फोनच्या कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा असून सोबत 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी यामध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर आणि 4000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 10W नॉर्मल चार्जिंग स्पीडसह मिळते.

नोकिया 5.4 चे स्पेसिफिकेशन्स

नोकिया 5.4 मधील फिचर्सबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 6.39 इंचांचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 1560 x 720 पिक्सल रेजॉल्यूशनसह येतो. तसेच या फोनमध्ये पंच होल कटआउट दिला आहे. जो सेल्फी कॅमेरासाठी आहे. फोनच्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 663 प्रोसेसर देण्यात आला आहे जो ऑक्टा कोर सीपीयू आणि अॅड्रिनो 610 जीपीयूसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 4 जीबी आणि 6 जीबी रॅमचा पर्याय देण्यात आला आहे.

स्टोरेजसाठी या फोनमध्ये 64 जीबी इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. नोकिया 5.4 मध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. फोनचा सेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सलचा आहे. नोकिया 5.4 मध्ये 4000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे जी 10W नॉर्मल चार्जिंगला सपोर्ट करते.

इतर बातम्या

मूनशॉट फीचरसह दमदार कॅमेरा, ‘या’ दिवशी लाँच होणार OnePlus 9, OnePlus 9 Pro

Flipkart Carnival Sale सुरु, स्मार्टफोन्सवर बम्पर डिस्काऊंट, आयफोनवर 10000 रुपयांची सूट

Jio युजर्ससाठी खुशखबर! IPL चे सामने मोफत पाहता येणार

(HMD global is going to launch Nokia G10 series and other Accessories)

पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.