Nokia ब्रॅंड संपणार का ? HMD Globle च्या सीईओने केली मोठी घोषणा ?
एकेकाळी सर्वांचा आवडचा स्मार्टफोन असलेल्या नोकीया फोनची निर्माती कंपनी एचएमडी ग्लोबलने नवा स्मार्टफोन आणण्याची तयारी केली आहे. त्यामुळे नोकीयाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नवी दिल्ली | 13 सप्टेंबर 2023 : Nokia फोनची मालकी असलेल्या HMD ग्लोबल कंपनी आता नवा स्मार्टफोन ब्रॅंड लॉंच करण्याची घोषणा करणार आहे. HMD ग्लोबल कंपनी साल 2016 पासून नोकिया ब्रॅंड अंतर्गत स्मार्टफोनची मॅन्युफॅक्चरिंग करीत आली आहे. कंपनीने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीचे को-फाऊंडर आणि सीईओ म्हटले आहे की आता HMD ब्रंड अंतर्गत स्मार्टफोन लॉंच करण्याची तयारी करीत आहेत. त्यामुळे आता अनेकांच्या आठवणीतील नोकिया ब्रॅंड आता संपुष्ठात येणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
HMD ग्लोबलचे को-फाऊंडर, चेअरमन आणि सीईओ Jean Francois Baril यांनी लिंक्डइन पर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कंपनीच्या भविष्याच्या घोषणाबद्दल सुतोवाच केले आहे. त्यांनी आपण घेत असलेला नव्या निर्णय नव्या ब्रॅंडसाठी महत्वपूर्ण असणार आहे. कंपनीने हेही स्पष्ठ केले आहे की HMD ग्लोबल नोकिया ब्रॅंडचे फोन बनविणे आणि विकणे थांबविणार नाही.
कंपनीने म्हटले आहे की Nokia सोबतच HMD चे ब्रॅंडचे फोन विकणार आहे. एवढच नाही तर कंपनी नवीन पार्टनर सोबत सहभागाने फोन लॉंच करण्याची देखील तयारी करीत आहे. परंतू या पोस्टमध्ये हे नवीन पार्टनर कोण असतील हे मात्र सांगितलेले नाही. भविष्यात यासंदर्भात कंपनी या संदर्भात घोषणा करु शकते असे म्हटले जात आहे.
नवीन ब्रॅंड नेमका कोणता ?
HMD ग्लोबलचे को-फाऊंडर, चेअरमन आणि सीईओ Jean Francois Baril यांनी सांगितले की एचएमडी ग्लोबल एक वेगाने वाढणारा 5G स्मार्टफोन मॅन्युफॅक्चर कंपनी आहे. गेली अनेक वर्षे नोकियाचे स्मार्टफोन आणि फिचर फोन बाजारात येत आहेत. आता कंपनी स्वत: एक स्वतंत्र ब्रॅंडच्या रुपात स्थापित करु इच्छीत आहे. परंतू एचएमडी ग्लोबल नेमके कोणत्या प्रकारचे फोन लॉंच करणार आहे हे स्पष्ट केलेले नाही. बाजारात अनेक मोबाईल ब्रॅंड आले आहेत. परंतू त्यापैकी मोजक्याच ब्रॅंडना यश मिळाले आहे. आता एचएमडी ग्लोबल कंपनीला नवीन स्मार्टफोन बाजारात आणणे सोपे नाही. नोकिया एड्रॉइड फोनच्या स्पर्धेतून बाहेर फेकला गेल्याने बाजारात आपली पहिल्याची जागा मिळवू शकला नाही.