WhatsApp Stickers द्वारे मित्र-नातेवाईकांना होळीच्या शुभेच्छा द्या, जाणून घ्या स्टिकर्स कुठून मिळवायचे?

आज आम्ही तुम्हाला स्टिकरच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅपवरुन होळीच्या शुभेच्छा कशा देता येतील ते सांगणार आहोत. (Whatsapp Sticker for holi 2021)

WhatsApp Stickers द्वारे मित्र-नातेवाईकांना होळीच्या शुभेच्छा द्या, जाणून घ्या स्टिकर्स कुठून मिळवायचे?
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 6:49 PM

मुंबई : संपूर्ण भारतात परवा (29 मार्च) होळीचा सण साजरा केला जाणार आहे. परंतु कोरोना साथीच्या रोगामुळे आपण आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना भेटू शकणार नाही, परंतु काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला असा एक मार्ग सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही WhatsApp च्या मदतीने सर्व लोकांना होळीच्या डिजिटल शुभेच्छा (Digital Celebration) देऊ शकता. (Holi has to be made special, so send stickers to people on WhatsApp, know the complete process)

व्हॉट्सअ‍ॅपवरुन आपण आपल्या कुटूंबाला व्हिडीओ कॉल किंवा मेसेजद्वारे होळीच्या शुभेच्छा देऊ शकत असलो तरी आज आम्ही तुम्हाला स्टिकरच्या माध्यमातून होळीच्या शुभेच्छा कशा देता येतील ते सांगणार आहोत. यासाठी आपण मजेदार स्टिकर्स डाउनलोड करू शकता आणि WhatsApp वर लोकांना होळीच्या शुभेच्छा देऊ शकता. चला तर मग हे स्टीकर्स कसे डाउनलोड करायचे याची स्टेप बाय स्टेप माहिती घेऊया…

Android फोनमध्ये स्टिकर्स कसे डाऊनलोड करायचे?

  • सर्वात आधी WhatsApp ओपन करा आणि ज्या व्यक्तीला स्टिकर पाठवायचं आहे, त्या व्यक्तिची चॅट व्हिंडो ओपन करा
  • त्यानंतर टेक्स्ट बारवर दिलेल्या Smiley आयकॉनवर टॅप करा
  • आता खाली दिलेल्या स्टिकर आयकॉनवर क्लिक करा त्यानंतर तुम्ही याआधी वापरलेले किंवा स्टँडर्ड स्टिकर्स कॅटेगरीज दिसतील तिथेच डाव्या कोपऱ्यात ‘+’ असा आयकॉन असेल, त्यावर क्लिक करा
  • आता तुमच्यासमोर स्टिकर लायब्ररी ओपन होईल. त्यानंतर खाली दिलेल्या ‘Get More Stickers’ या पर्यायावर क्लिक करा.
  • Get More Stickers या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही थेट गुगल प्ले स्टोरवर जाल. इथे तुम्हाला वेगवेगळे स्टिकर पॅक डाऊनलोड करण्याचा पर्याय दिसेल. तिथे तुम्ही होळीचा स्टिकर पॅक निवडू शकता आणि डाऊनलोड करु शकता.
  • स्टिकर पॅक डाऊनलोड केल्यानंतर ‘Add to WhatsApp’ ऑप्शनवर टॅप करुन इन्स्टॉल करा. त्यानंतर स्टिकर लायब्ररीमध्ये तुम्हाला Holi 2021 चे स्टिकर्स दिसतील, हे स्टिकर्स तुम्ही मित्र आणि नातेवाईकांना पाठवू शकता.

iPhone मध्ये होळीचे स्टिकर्स डाऊनलोड करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

– iPhone मध्ये स्टिकर्स पॅक डाऊनलोड करण्यासाठी WhatsApp ओपन करा आणि ज्या व्यक्तीला स्टिकर पाठवायचं आहे, त्या व्यक्तिची चॅट व्हिंडो ओपन करा – टेक्स्ट बारवर क्लिक करुन उजव्या बाजूला स्टिकर टॅबवर क्लिक करा – आता तुमच्या WhatsApp वरील सध्याचे स्टिकर ऑप्शन ओपन होतील. – त्यानंतर तुमच्या आवडीचे स्टिकर्स डाऊनलोड करा. – स्टिकर लायब्ररीमधील तुमचे आवडते स्टिकर्स सिलेक्ट करुन मित्रांना, नातेवाईकांना पाठवा

संबंधित बातम्या

WhatsApp वर अ‍ॅमेझॉनकडून ऑफरचा मेसेज तर सावधान! वाचा काय आहे सत्य

आता ‘या’ Iphone मध्ये WhatsApp चालणार नाही? कंपनीकडून सेवा बंद

मोदी सरकारचा WhatsApp च्या New Privacy Policy ला विरोध, दिल्ली उच्च न्यायालयात ‘ही’ मागणी

(Holi has to be made special, so send stickers to people on WhatsApp, know the complete process)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.