बॅन झालेल्या PUBG ला पछाडत ‘या’ नव्या गेमचा जगभरात डंका, छप्परफाड कमाई

भारतात बॅन झाल्यानंतर PUBG मोबाईल गेमच्या खिशाला कात्री बसल्याचे बोलले जात आहे. कारण कमाईच्या बाबतीत पबजी गेमने पहिलं स्थान गमावलं आहे.

बॅन झालेल्या PUBG ला पछाडत 'या' नव्या गेमचा जगभरात डंका, छप्परफाड कमाई
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 11:45 AM

मुंबई : भारत-चीन तणावाच्या (India-China tension) पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने चार महिन्यांपूर्वी चीनला मोठा झटका दिला. केंद्र सरकारने भारतात PUBG या लोकप्रिय गेमिंग अ‍ॅपसह 118 चिनी अ‍ॅप बॅन केले. त्यापूर्वी केंद्र सरकारने टिक टॉक, शेअरइट, हॅलो, यूसी ब्राऊझर यांसारखे एकूण 59 अ‍ॅप्लिकेशन बॅन केले होते. भारत हे PUBG Mobile गेमसाठीचं सर्वात मोठं मार्केट आहे आणि हा गेम भारतातच बॅन झाल्यानंतर गेम बनवणाऱ्या कंपनीचं खूप मोठं नुकसान होईल असं बोललं जात होतं. परंतु तसं झालेलं नाही. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या मोबाईल गेम्सच्या यादीत पबजी मोबाईल गेम दुसऱ्या स्थानावर आहे. (Honor of Kings owned by PUBG by tencent games become top grossing mobile game in january 2021)

PUBG Mobile गेम गेल्या काही महिन्यांमध्ये कमाईच्या बाबतीत सर्वात पुढे होता. परंतु आता एका नव्या गेमने कमाईच्या बाबतीत PUBG ला धोबीपछाड दिला आहे. Honor of Kings असं या गेमचं नावं आहे. Honor of Kings हा गेम जानेवारी 2021 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा मोबाईल गेम ठरला आहे. जानेवारी 2021 मध्ये या गेमने तब्बल 267.3 मिलियन डॉलर्स इतकी कमाई केली आहे. जानेवारी 2020 च्या तुलनेत Honor of Kings ने यंदा 22 टक्के अधिक कमाई केली आहे.

सर्वाधिक कमाई करणाऱ्या गेम्सच्या यादीत PUBG Mobile दुसऱ्या नंबरवर आहे. Tencent गेम्स कंपनीने जानेवारी 2021 मध्ये 259 मिलियन डॉलर्सची कमाई केली आहे. PUBG च्या एकूण कमाईपैकी 60 टक्के कमाई ही एकट्या चीनमधून झाली आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या गेम्सच्या यादीत पुढचं (तिसर) नाव सोनी Aniplex च्या Fate/Grand Order या गेमचं आहे. तर या यादीत चौथ्या स्थानी Roblox Corporation चा Roblox हा गेम आहे. तर Professional Baseball Spirits A बा गेम कमाईच्या बाबतीत पाचव्या स्थानी आहे. टॉप 10 गेम्समध्ये प्रवेश करणारा हा नवा गेम आहे. विविध गेम्सच्या कमाईबाबतची ही माहिती Sensor Tower च्या रिपोर्टमध्ये मांडण्यात आली आहे.

PubG Mobile India लवकरच लाँच होणार

पबजी इंडिया हा गेम कधी लाँच केला जाणार? याबाबतची अधिकृत माहिती कंपनीकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. काही वबसाईट्स आणि पबजी कंटेट क्रिएटर्स दररोज वेगवेगळे दावे करत आहेत. परंतु पबजी कॉर्पोरेशनने अद्याप याबद्दल काहीही सांगितलेलं नाही. तसेच भारत सरकारडूनही याबाबत कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही.

PubG भारतात रजिस्टर

मीडिया रिपोर्ट्सनुसार सरकारने PUBG Mobile India या गेमला अप्रूव्ह केलं आहे. PUBG Mobile India Private Ltd. या नावाने हा गेम भारतात रजिस्टर केला आहे. केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट अफेयर्सच्या वेबसाईटवर हा गेम CIN सह रजिस्टर करण्यात आला आहे. हा गेम केवळ भारतीयांसाठी डिझाईन करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यावेळी PUBG Corporation चिनी कंपनी Tenncent सोबत कोणतीही भागिदारी करणार नाही. दरम्यान अद्याप या गेमच्या लाँचिंगसाठी भारत सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळणं बाकी असल्याची माहिती काही संकेतस्थळांनी प्रसिद्ध केली आहे.

PUBG Corporation ने म्हटलं आहे की, आमचं नवं गेमिंग अॅप युजर्सना जास्तीत जास्त सुरक्षा आणि जबरदस्त गेम प्ले प्रदान करेल. भारतीय प्लेयर्सशी सहज कम्युनिकेशन व्हावे यासाठी कंपनी एक सबसिडरी तयार केली जाणार आहे. तसेच कंपनी भारतात 100 कर्मचाऱ्यांना नोकरी देणार आहे. यासाठी कंपनी भारतात काही ठिकाणी लोकल कार्यालय सुरु केली जाणार आहे. कंपनी भारतात लोकल बिझनेससह गेमिंग सर्व्हिस देणार आहे.

100 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक

Krafton Inc (PUBG Corporation ची पॅरेंट कंपनी) या कंपनीने भारतात 100 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक मनोरंजन, लोकल गेम्स, ई-स्पोर्ट्स आणि आयटी इंडस्ट्रीसाठी असेल. PUBG Corporation च्या म्हणण्यानुसार ही कोणत्याही कोरियन कंपनीने भारतात केलेली सर्वात मोठी गुंतवणूक आहे.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतीय प्लेअर्सना अधिक चांगला अनुभव प्रदान करण्यासाठी PUBG कॉर्पोरेशनने त्यांचा गेमिंग कॉन्टेंट अपडेट आणि अधिक अॅडव्हान्स केला आहे. भारतीय प्लेअर्सच्या इच्छेनुसार आणि मागणीनुसार नवा गेम कस्टमाईज करण्यात आला आहे.

कसा बनला पबजी गेम?

एक जपानी चित्रपट ‘बॅटल रोयाल’ पासून प्रेरणा घेऊन Pubg हा गेम बनवण्यात आला आहे. या चित्रपटात सरकार विद्यार्थ्यांच्या एका ग्रूपला बळजबरी करून मृत्यूशी लढायला पाठवतं. त्याच गोष्टीला धरून हा गेम बनवण्यात आला आहे.

हा गेम दक्षिण कोरियाची व्हीडिओ गेम कंपनी ब्लूहोलनं विकसित केला आहे. या कंपनीनं या गेमचं डेस्कटॉप व्हर्जन तयार केलं होतं. परंतु, चीनची कंपनी Tenncent ने काही बदल करून या गेमचं मोबाईल व्हर्जन लाँच केलं. डेस्कटॉप व्हर्जनपेक्षा मोबाईल व्हर्जनला जगभरात खूप प्रसिद्धी मिळाली. भारतात हा गेम सर्वात यशस्वी ठरला. जगभरात पब्जी खेळणाऱ्यांपैकी जवळपास 25 टक्के लोक भारतातील आहेत, 17 टक्के चीनमध्ये तर 6% गेमर्स अमेरिकेत आहेत. जगभरात हा गेम 60 कोटींपेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड केला आहे.

संबंधित बातम्या

PUBG नंतर आता TikTok ही परतणार? युजर्समध्ये आनंदाचं वातावरण

PUBG Mobile India भारतात कधी लाँच होणार?

चीटिंग करणाऱ्या युजर्सना PUBG चा दणका, 12 लाख अकाऊंट्स बॅन

(Honor of Kings owned by PUBG by tencent games become top grossing mobile game in january 2021)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.