घाबरायचं नाय गड्या घाबरायचं नाय… भूकंपापूर्वी मिळणार मोबाईलवर अलर्ट; पटापट जाणून घ्या गुगलची भन्नाट सर्व्हिस
Earthquake Alerts System : भूकंपामुळे अफगाणिस्तान, पाकिस्तानसह भारतातील अनेक शहरातील लोक घराबाहेर पडले. भूकंपाच्या आधी काही लोकांना फोनवर अलर्टही आला होता.
नवी दिल्ली : मंगळवारी रात्री आलेल्या जोरदार भूकंपाने (earthquake) भारतासह (India) अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला हादरवले. दिल्ली-एनसीआरसह भारताच्या विविध राज्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली तसेच मालमत्तेचेही नुकसान झाले. जगभरात लाखो लोक अशा भागात राहतात जिथे भूकंप होण्याची शक्यता असते. अशा स्थितीत इशारा देणारी यंत्रणा (alert system) जीव वाचवण्यास मदत करू शकते.
तुम्ही वापरत असलेल्या अँड्रॉइड फोनवर भूकंप येण्यापूर्वी अलर्ट मिळतो, हे तुम्हाला माहीत आहे का ? Google ही कंपनी त्यांच्या युजर्सना वेळेतच भूकंपाचा अलर्ट पाठवते. भूकंपाच्या काही सेकंद आधी अँड्रॉइड यूजर्सना त्यांच्या फोनवर हा अलर्ट मिळतो. याद्वारे युजर्स त्यांचा व इतरांचा जीव वाचवू शकतात. ही वॉर्निंग सिस्टीम नेमकी कसे कार्य करते ते जाणून घेऊया.
Android Earthquake Alerts System
‘ अँड्रॉइड अर्थक्वेक अलर्ट सिस्टीम ‘ असे गुगलच्या या सर्व्हिसचे नाव आहे. ही एक पूर्णपणे मोफत सेवा आहे जी जगभरात येणारे भूकंप ओळखते. भूकंपाच्या आधी ही सेवा अँड्रॉइड यूजर्सना अलर्ट पाठवते. पाकिस्तानमध्येही अनेकांना फोनवर भूकंपाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचे स्क्रीनशॉटही काही लोकांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
not my phone giving me earthquake alert 5 minutes before it was felt and I ignored it like “isko kya pta, aesy thori zalzala ata hai” and then the whole house shaked. ps: it’s a good feature, android. I should take it serious next time.#earthquake#earthquakeinpakistan pic.twitter.com/2cxuucpzIL
— Ayesha Baig (@AyeshaBayg) March 21, 2023
असा मिळतो इशारा
भूकंपाचे धक्के शोधण्यासाठी शेक अलर्ट 1,675 सिस्मिक सेन्सर्सचे नेटवर्क वापरते. यानंतर डेटाचे विश्लेषण केले जाते आणि भूकंपाचे ठिकाण आणि प्रभाव ओळखला जातो. लोकांना भूकंपासून बचावाची तयारी करता यावी यासाठी ही सिस्टीम थेट अँड्रॉइड फोनवर अलर्ट पाठवते.
दोन पद्धतीचे आहेत अलर्ट
अँड्रॉइड फोनसाठी भूकंपाची सूचना किंवा नोटिफिकेशन दोन प्रकारे तयार करण्यात आली आहे. दोन्ही प्रकारच्या अलर्ट सूचना फक्त 4.5 किंवा त्याहून अधिक तीव्रतेच्या भूकंपांसाठी पाठवल्या जातात. पहिल्या अलर्टचे नाव ‘बी अवेअर अलर्ट’ आहे, तर दुसऱ्या चे नाव ‘टेक ॲक्शन अलर्ट’ असे आहे.
Be Aware Alert : हे अलर्ट नोटिफिकेशन भूकंपाच्या हलक्या धक्क्यांसाठी तयार करण्यात आले आहे. भूकंपाशी संबंधित अधिक माहिती तुम्ही त्याच्या नोटिफिकेशनवर टॅप करताच उपलब्ध होईल. हा इशारा MMI 3 आणि 4.5 किंवा त्याहून अधिक तीव्रतेच्या भूकंपाच्या आधी प्राप्त होईल. मात्र, हा अलर्ट व्हॉल्यूम, डू नॉट डिस्टर्ब आणि नोटिफिकेशन सेटिंग्जनुसारच काम करतो.
Take Action Alert : जेव्हा भूकंपाच्या तीव्र धक्क्यांचा धोका असतो तेव्हा Google तर्फे हा इशारा अथवा अलर्ट पाठवला जातो. जेणेकरून भूकपापासून बचाव करण्यासाठी किंवा स्वत:चा आणि इतरांचा जीव वाचवण्यासाठी तिम्ही वेळेत तयारी करू शकता. हा इशारा फक्त MMI 5+ शेक आणि 4.5 किंवा त्याहून अधिक तीव्रतेच्या भूकंपासाठी येईल. डू नॉट डिस्टर्ब सेटिंगची पर्वा न करता, हा अलर्ट फोनची स्क्रीन चालू (on) करतो आणि मोठ्या आवाजात वाजू लागतो.
भूकंपाचे झटके कुठे कुठे? भारत
पाकिस्तान
अफगानिस्तान
कझाकिस्तान
चीन
तुर्कमेनिस्तान
ताझिकिस्तान
उज्बेकिस्तान
किर्गिस्तान
हिंदूकूश पर्वत हादरला, 11 दिवसात पाच झटके
21 मार्च- 6.6 तीव्रतेचा भूकंप
18 मार्च- 5 तीव्रतेचा भूकंप
12 मार्च- 4.5 तीव्रतेचा भूकंप
11 मार्च- 4.5 तीव्रतेचा भूकंप
10 मार्च- 4.5 तीव्रतेचा भूकंप
भारतात कुठे कुठे झटके?
दिल्ली
उत्तर प्रदेश
जम्मू-कश्मीर
पंजाब
राजस्थान
उत्तराखंड
मध्य प्रदेश