यूट्यूबची सर्च आणि वॉच हिस्ट्री डिलीट कशी कराल?
मुंबई : इंटरनेट जगतात यूट्यूब हा एक मोठा व्हिडीओ प्लॅटफॉर्म आहे. असं असलं तरी बहुतांश इंटरनेट युजर्सला यूट्यूबवरील हिस्ट्री डिलीट करता येत नाही. पण हे क्रोम ब्राउजवरील हिस्ट्री डिलीट करण्याइतकं सोपं काम आहे. त्याचप्रमाणे यूट्यूबवरील हिस्ट्री कशी डिलीट करावी? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सर्व प्रथम संगणक किंवा लॅपटॉपवर तुमचं यूट्यूब ओपन केल्यानंतर ते […]
मुंबई : इंटरनेट जगतात यूट्यूब हा एक मोठा व्हिडीओ प्लॅटफॉर्म आहे. असं असलं तरी बहुतांश इंटरनेट युजर्सला यूट्यूबवरील हिस्ट्री डिलीट करता येत नाही. पण हे क्रोम ब्राउजवरील हिस्ट्री डिलीट करण्याइतकं सोपं काम आहे. त्याचप्रमाणे यूट्यूबवरील हिस्ट्री कशी डिलीट करावी? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सर्व प्रथम संगणक किंवा लॅपटॉपवर तुमचं यूट्यूब ओपन केल्यानंतर ते यूट्यूब अकाउंट साईन इन करा. त्यानंतर डाव्या बाजूला असलेल्या History बटनावर क्लिक केल्यानंतर पुढे एक नवीन पेज ओपन होईल. त्यात सर्च हिस्ट्री आणि वॉच हिस्ट्री या दोन प्रकारच्या हिस्ट्री दिसतील. या दोन्ही हिस्ट्री डिलीट करण्यासाठी दोन प्रोसेस कराव्या लागतील.
वॉच हिस्ट्री
यूट्यूबवर पाहिलेले सर्व व्हिडीओ तुम्हाला वॉच हिस्ट्रीमध्ये पाहता येतात. या वॉच हिस्ट्रीमध्ये जाऊन एखादा व्हिडीओ डिलीट करायचा असेल तर त्या व्हिडीओ जवळ फुल्ली असलेल्या चिन्हावर क्लिक करा. त्यानंतर तो व्हिडीओ डिलीट होईल. अशाच प्रकारे clear all watch history वर क्लिक केल्यानंतर संपूर्ण वॉच हिस्ट्री डिलीट होते.
सर्च हिस्ट्री
यूट्यूबवर सर्च केलेल्या सर्व व्हिडीओंची माहिती यूट्यूबच्या सर्च हिस्ट्रीमध्ये मिळते. यामधील एखादा व्हिडीओ डिलीट करायचा असेल तर त्या व्हिडीओजवळ असलेल्या तीन डॉट असलेल्या टॅबवर क्लिक करणं गरजेचें आहे. क्लिक केल्यानंतर तो व्हिडीओ सर्च हिस्ट्रीमधून डिलीट होतो. अशाच प्रकारे Remove all Search history वर क्लिक केल्यावर संपूर्ण वॉच हिस्ट्री डिलीट होईल.
विशेष म्हणजे, यूट्यूबवरील वॉच आणि सर्च व्हिडीओ डिलीट करताना यूट्यूब दोन्ही वेळा Confirm हा पर्याय विचारला जातो, तो निवडल्यानंतरच संपूर्ण व्हिडीओ डिलीट होतात.