फोन टॅपिंग कशी आणि कोणत्या कारणासांठी होते?; वाचा, सविस्तर रिपोर्ट!
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅप केल्याचं प्रकरण अधिकच गाजत आहे. (How easy is it to tap someone's phone? what is phone tapping?)
मुंबई: आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅप केल्याचं प्रकरण अधिकच गाजत आहे. त्यामुळे फोन टॅप म्हणजे काय? फोन टॅप कोण करू शकतो? फोन टॅप कोणत्या कारणांसाठी केले जातात? असे प्रश्न सामान्य जनतेमध्ये निर्माण झाले आहेत. त्याविषयीचा घेतलेला हा आढावा… (How easy is it to tap someone’s phone? what is phone tapping?)
कशी होते फोन टॅपिंग
पूर्वी लँडलाईनच्या काळात फोन टॅपिंग करणं अत्यंत सोपं होतं. रेडिओ स्कॅनरच्या मदतीने सहजपणे फोन टॅप केला जायचा. रेडिओ स्कॅनर अनेक प्रकारच्या फ्रिक्वेन्सीमध्ये काम करण्यास सक्षम असायचा. त्यामुळे टेलिफोनवर होणारी चर्चा रेडिओ स्कॅनरमध्ये लावण्यात आलेल्या मायक्रोफोनच्या मदतीने ऐकणं शक्य होतं. आता स्मार्टफोन कोणत्याही लाईनवर नाही तर ट्रान्समिशन आणि डिजीटल एन्कोडिंगवर आधारीत आहे. त्यामुळे स्मार्टफोनवरील संभाषण टॅप करणं कोणत्याही बाहेरच्या व्यक्तिला शक्य नाही. केवळ टेलिकॉम कंपन्याच फोन टॅप करू शकतात. तेही सरकारचे आदेश असतील तरच.
कोणत्या कारणांसाठी फोन टॅपिंग केले जाते?
देशाची एकता आणि अखंडता, सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी, परकीय देशासोबत मैत्रीचे संबंध, जनतेमध्ये शांतता राखण्यासाठी आणि एखादा गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडण्यास प्रतिबंध करण्यासाठी (उदा. खंडणी, दरोडा इत्यादी) आदी कारणांसाठी फोन टॅप केले जातात. या व्यतिरिक्त इतर कारणांसाठी फोन टॅप करू नयेत, असे आदेशच गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी दिले आहेत.
कोण करू शकतात फोन टॅप?
मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र एटीएस आणि लाचलूचपत प्रतिबंधक विभाग या तीन विभागाला फोन टॅप करण्याचे अधिकार आहेत. हे तिन्ही विभाग सलग सहा ते सात दिवस कुणाची रेकी करू शकतात. त्यापुढे त्यांना अतिरिक्त मुख्य सचिव (गृह विभाग) यांची परवानगी लागते.
फोन टॅपिंग गुन्हा आहे का?
होय, परवानगी नसताना फोन टॅपिंग करणं हा गुन्हा आहे. वरील यंत्रणांव्यक्तिरिक्त कुणालाही कुणाचा फोन टॅप करता येत नाही. जर एखादी व्यक्ती असं कृत्य करत असेल तर त्याला तुरुंगवास होऊ शकतो. तसेच वरील एजन्सीही देशद्रोह किंवा गंभीर गुन्ह्याचा संशय असलेल्या व्यक्तिंचाच फोन टॅप करतात. कुणाचाही फोन टॅप करण्याची त्यांना परवानगी नाही. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे कुणाचाही फोन टॅप केला जात नाही. जर तुमचा कोणी बेकायदेशीररित्या तुमचा फोन टॅप करत असेल तर तुम्ही त्याविरोधात गुन्हा दाखल करू शकता.
किती वर्षाची शिक्षा
एखाद्या व्यक्तीने बेकायदेशीररित्या फोन टॅप केला आणि त्याच्याविरोधात पुरावे सिद्ध झाल्यास त्याला तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते. तसेच आर्थिक दंडाचीही तरतूद आहे.
फोन टॅप होतोय हे कसं कळणार?
फोन टॅप होतोय हे समजून घ्यायचं असेल तर काही गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे.
>> फोनवर कोणतीही महत्त्वाची चर्चा करताना सावध राहा >> बॅकग्राऊंडला येणाऱ्या आवाजावर लक्ष ठेवा >> तुमचा फोन इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या आसपास घेऊन जा >> तुमच्या फोनमध्ये आपोआप होणाऱ्या अॅक्टिव्हीटीकडे लक्ष द्या >> फोनची बॅटरी कारणांशिवाय गरम होत असेल तर काही तरी गडबड आहे म्हणून समजा >> तुमच्या फोनचे बिल बारकाईने वाचा >> फोनचा डेटा यूजेस वारंवार चेक करा. डेटा अधिक खर्ची तर होत नाही ना ते पाहा >> एखाद्या रँडम नंबर, टेक्स्ट आणि सिम्बॉलवाले मेसेज तर येत नाही ना, याकडे लक्ष द्या. (How easy is it to tap someone’s phone? what is phone tapping?)
LIVE : महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/363zMEtrB4
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 24, 2021
संबंधित बातम्या:
अनेक मंत्र्यांचे फोन टॅप, जितेंद्र आव्हाडांचे आयपीएस रश्मी शुक्लांवर गंभीर आरोप
आयपीएस रश्मी शुक्ला का रडल्या? जितेंद्र आव्हाड म्हणतात…
(How easy is it to tap someone’s phone? what is phone tapping?)