सतत मोबाईल अनलॉक करण्याचा कंटाळा येतो, मग ‘या’ ट्रिकचा करा वापर
तुम्ही हे फीचर कधी ट्राय केले तर तुमचा फोन कधीही लॉक होणार नाही आणि स्क्रीन कधीही बंद होणार नाही.
Smartphone Lock Screen: रात्री तुम्ही झोपाल पण तुमचा स्मार्टफोन जागाच राहिल. तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे, तर आज आम्ही तुम्हाला स्मार्टफोनच्या एका फीचरविषयी महिती सांगणार आहोत. अशा परिस्थितीची कल्पना करा, जिथे तुम्ही झोपत आहात, परंतु तुमचा फोन सुरुच आहे. तुम्हाला झोप येईल, पण फोन चालूच राहिल. शेवटी हे सगळं कसं होणार? फोनमध्ये कोणतं फीचर उपलब्ध आहे, जे असं काम करतं? या सर्व प्रश्नांची उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. तुम्ही हे फीचर कधी ट्राय केले तर तुमचा फोन कधीही लॉक होणार नाही आणि स्क्रीन कधीही बंद होणार नाही.
पुन्हा पुन्हा लॉक उघडण्याची गरज नाही
व्हिडीओ किंवा म्युझिक ऐकताना किंवा फोनमध्ये इतर काही करताना स्मार्टफोन लॉक होऊ नये, त्यांच्यासाठी ही ट्रिक फायदेशीर ठरू शकते. या ट्रिकचा वापर केल्याने फोनची स्क्रीन नेहमी सुरु राहते. यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा लॉक उघडण्याची गरज नाही.
लॉक स्क्रीन ‘नेव्हर’ मोड
लॉक स्क्रीन ‘नेव्हर’ मोड हे एक फीचर आहे, जे आपल्याला आपला फोन नेहमी चालू ठेवण्यास परवानगी देतात. या मोडमध्ये तुमचा फोन बंद होत नाही. तो सतत काम करत असतो. आपण हा मोड बऱ्याच प्रकारे वापरू शकता.
अभ्यास किंवा कामासाठी: जर तुम्ही फोनवर अभ्यास करत असाल किंवा कोणतेही ट्यूटोरियल मटेरियल बघत असाल तर स्क्रीनला वारंवार लॉक केल्याने समस्या उद्भवू शकतात. ‘नेव्हर’ मोड सेट केल्याने फोन पुन्हा पुन्हा अनलॉक करण्याची गरज भासणार नाही आणि कोणताही अडथळा न येता आपल्याला आरामात अभ्यास करता येईल.
सोपा आणि वेगवान अॅक्सेस: जेव्हा लॉक स्क्रीन ‘नेव्हर’ मोडवर सेट केली जाते, तेव्हा फोनची स्क्रीन कधीच बंद होणार नाही. यामुळे तुम्ही फोन लॉक न करता केव्हाही वापरू शकता. विशेषत: जेव्हा तुम्ही घाईत असाल किंवा वारंवार फोन वापरत असाल तर हे फीचर खूप फायदेशीर आहे.
बराच वेळ स्क्रीनवर माहिती पाहणे: नोट्स वाचणे, नकाशे पाहणे किंवा संगीत ऐकणे यासारख्या अॅपचा बराच वेळ वापर केल्यास स्क्रीन वारंवार चालू आणि बंद करण्याची गरज नाही. त्यामुळे वेळेची बचत होते.
डिजिटल प्रेझेंटेशन: जर तुम्ही एखाद्याला फोनवर प्रेझेंटेशन किंवा माहिती सारखे काही दाखवत असाल तर लॉक स्क्रीन ‘नेव्हर’वर सेट करणे खूप उपयुक्त ठरू शकते, कारण स्क्रीन आपोआप बंद होणार नाही आणि आपण सहजपणे माहिती दाखवू शकाल.
‘नेव्हर’ मोड कसा सेट करावा?
तुम्हालाही स्मार्टफोन ‘नेव्हर’ मोडवर सुरु करायचा असेल तर सेटिंगमध्ये जा. येथे लॉक स्क्रीन पर्यायावर जाऊन वेळेची यादी तपासा. 15 सेकंद, 30 सेकंद, 1 मिनिट, नेव्हर असे अनेक टाईमिंग ऑप्शन्स मिळतात. येथे तुम्ही ‘नेव्हर’ मोड निवडू शकता. जर तुम्ही फोनवर काहीही केलं नाही तर तुम्ही जो पर्याय निवडाल त्यासाठी फोनची स्क्रीन ओपन राहील.
तुम्ही झोपताना फोन लॉक करता का?
स्मार्टफोनमध्ये लॉक स्क्रीन फीचरच्या आत एक पर्याय आहे. जर तुम्ही हा पर्याय वापरला तर तुम्ही फोन लॉक करणार नाही. तसेच तुमचा फोन बंद होणार नाही, त्याची स्क्रीन कायम सुरू राहील. टेन्शन घेऊन नका. आम्ही याविषयी अगदी सोप्या शब्दात खाली सांगत आहोत. जाणून घ्या.