स्मार्टफोन्स मध्ये एक फीचर असते ज्याला ‘ऑटो ब्राईटनेस’ (Auto Brightness) असे म्हणतात. यूजर्सच्या मोबाईल स्क्रीनवरील ब्राईटनेस केव्हा वाढवायचा आणि कधी कमी करायचा, हे फीचर ठरवते. हे फीचर आता अँड्रॉईड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवाल्या डिव्हाईसवर उपलब्ध आहेत. स्मार्टफोन्स (smart phones) शिवाय या फीचरचा वापर हल्ली लॅपटॉप आणि मॅकबुक मध्ये देखील दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या हातात असलेल्या स्मार्टफोनला याबद्दल कसे कळते की, तुमच्या मोबाईलची ब्राईटनेसला वाढवायची आहे किंवा कमी करायचे आहे, असा अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. तसे पाहायला गेले तर यामागे एक इंटरेस्टिंग कारण आहे, जे आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.,चला तर मग जाणून घेऊया फोटो ब्राईटनेस फीचर (features) कशा पद्धतीने काम करते याबद्दल त्याबद्दल.
तुम्ही अनेकदा मोबाईलचा वापर करत असताना पाहिले असेल की, जेव्हा आपण घराच्या बाहेर किंवा जास्त प्रकाश असणाऱ्या जागेवर जातो तेव्हा आपला मोबाईल वरील स्क्रीनची लाईटनेस आपोआप वाढत जाते. रात्रीच्या वेळी स्क्रीनची जी चमक असते हळू गतीने कार्य करते या सगळ्या गोष्टी आपल्या मोबाईल मधील ऑटो ब्राईटनेस फीचर मुळे घडतात. जर तुम्ही या फिचरचा वापर करत असाल तर तुम्हाला मॅन्युअली ब्राईटनेसला कमी किंवा जास्त करावे लागत नाही.
गॅजेट्स नाऊ यांच्या रिपोर्टनुसार, आपल्या स्मार्टफोनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर लावलेले असतात जसे की – प्रॉक्सिमिटी सेंसर, गायरोस्कोप आणि बॅरोमीटर्स इत्यादी..यातीलच एक आहे एम्बिएंट लाइट सेंसर. या सेंसर च्या मदतीनेच हे फीचर काम करते. स्मार्टफोन लावलेल्या एम्बिएंट लाइट सेंसर ओळखण्यास सक्षम असतो की, मोबाईलच्या आजूबाजूला किंवा प्रकाश पडणार आहे किंवा नाही. ही एक तंत्रप्रणाली आहे आणि ही तंत्रप्रणाली एका कॅमेरा प्रमाणे कार्य करते. यामुळे आपल्या मोबाईलच्या आजूबाजूला असलेल्या प्रकाशाच्या तीव्रतेनुसार त्याची गती कॅल्क्युलेट केली जाते आणि या अनुषंगानेच आपल्या मोबाईल मधील ब्राईटनेस कमी जास्त होत असतो.
पिक्सल आणि सॅमसंग यांच्या काही फोन्स मध्ये ‘अडाप्टिव ब्राइटनेस’ फीचर सुद्धा दिले गेले आहे, जे आर्टिफिशियल इंटेलिजेंस च्या मदतीने आपल्या मोबाईल मधील ब्राइटनेस ला एडजस्ट करतो. त्याच बरोबर ऍपल मध्ये उपलब्ध असलेल्या ट्रून टोन फीचर सुद्धा असे करण्यात आपली मदत करतो.
संबंधित बातम्या :
झोपेतून जागे होताच मोबाईल वापरण्याची सवय? भविष्यात गंभीर आजारांना देताय निमंत्रण!
फोन बिघडल्यावर दुरुस्तीसाठी कंपनीचा सर्व्हिस मॅनेजर घरी येणार, सेवा पूर्णपणे मोफत