घरबसल्या १० मिनिटांत काढा ऑनलाईन PAN CARD, फॉलो करा सोप्या स्टेप्स

आधार कार्ड प्रमाणेच पॅनकार्ड देखील महत्वाचं कागदपत्र आहे. आजकाल अनेक कामांसाठी आपल्याला पॅनकार्डची गरज भासते. तसेच आपले ओळखपत्र दाखविण्यासाठी सुद्धा आपल्याला पॅनकार्डची गरज लागते.

घरबसल्या १० मिनिटांत काढा ऑनलाईन PAN CARD, फॉलो करा सोप्या स्टेप्स
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 7:09 PM

आधार कार्ड प्रमाणेच पॅनकार्ड देखील महत्वाचं कागदपत्र आहे. आजकाल अनेक कामांसाठी आपल्याला पॅनकार्डची गरज भासते. तसेच आपले ओळखपत्र दाखविण्यासाठी सुद्धा आपल्याला पॅनकार्डची गरज लागते. खास करून बँकिंग व्यवहारात पॅनकार्डचा वापर केला जातो. त्यातच जर तुमच्या कडून एखाद्या व्यक्तीला मोठी रक्कम ट्रान्सफर करायची असल्यास पॅनकार्ड आवश्यक आहे. आता ज्या लोकांनी अद्याप पॅनकार्ड बनवला नाहीये अशा व्यक्तींना पॅनकार्ड बनवण्यासाठी ऑफिसच्या फेऱ्या माराव्या लागत आहे. पण आम्ही तुम्हाला १० मिनिटांत पॅन कार्ड कसे बनवायचे त्याबद्दल माहिती देणार आहोत. तुम्ही फक्त १० मिनिटांत घरबसल्या पॅन कार्ड मिळवू शकता. मात्र तुम्हाला काही अटी वर शर्थींचे पालन देखील करावे लागेल.

पॅन कार्ड बनवण्यासाठी पहिली अट म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. कारण हे ई-पॅन कार्ड आधारकार्डद्वारचे बनवता येतं. पॅन कार्डच्या जागी ई-पॅन कार्ड देखील वापरता येतो. तुम्हाला माहीतच असेल कि पॅन कार्डवर एक खास नंबर असतो. त्यात इंग्रजी शब्द आणि आकडे असतात. हा खास नंबर म्हणजे तुमच्या पॅनची ओळख.

ई-पॅन कार्ड कसे तयार करावे

आधी तुम्हाला https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

आता पेज स्क्रोल करून तळाशी इन्स्टंट ई-पॅन कार्डचा पर्याय दिसेल.त्यावर क्लिक करा.

यानंतर एक नवीन पेज ओपन होईल, ज्याच्या डाव्या बाजूला instant E-PAN चा पर्याय दिसेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल.

यानंतर तुम्हाला तुमच्या आधारकार्डचा १२ अंक नंबर टाकावे लागतील.

त्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या ‘I confirm that’ पर्यायावर टॅप करावे लागेल.

यानंतर तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP टाकून व्हेरिफिकेशन करा.

यानंतर ई-मेल आयडी टाकून पॅन कार्डसाठी आवश्यक असलेली तुमची संपूर्ण माहिती भरून घ्या.

फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला काही वेळाने कन्फर्मेशन नंबर मिळेल. तुम्ही भरलेली माहिती तपासून घ्या. माहिती बरोबर असेल तर तुम्हाला डाऊनलोड ऑप्शनच्या माध्यमातून पॅन नंबर मिळेल. या पॅनचा वापर तुम्ही रेग्युलर पॅन म्हणून करू शकता.

महत्त्वाचे लक्षात घ्या की, ई-पॅन कार्डसाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला इन्कम टॅक्स वेबसाइटवर जावे लागेल. जिथे तुम्हाला ‘चेक स्टेटस/डाउनलोड पॅन’ ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. अशाप्रकारे पॅन कार्ड PDF मध्ये डाउनलोड होईल.

Non Stop LIVE Update
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?.
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?.
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा.
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला.
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका.
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला.
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?.
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या....
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य.
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट.