स्पॅम कॉल्सपासून सुटका हवी? ‘ही’ सेटिंग करा, फोन स्विच ऑफची गरज नाही

मार्केटिंग, स्पॅम कॉल्समुळे कंटाळले आहेत का? चिंता करू नका. आम्ही यावर तुम्हाला पर्याय सांगणार आहोत. फोनमधील एक छोटीशी सेटिंग बदलून तुम्ही या स्पॅम आणि नको असलेल्या कॉल्सपासून सुटका मिळवू शकता. जाणून घ्या.

स्पॅम कॉल्सपासून सुटका हवी? ‘ही’ सेटिंग करा, फोन स्विच ऑफची गरज नाही
Follow us
| Updated on: Nov 16, 2024 | 4:16 PM

स्पॅम कॉल्समुळे वैतागलात का? तुमच्या सारखे अनेक लोक मार्केटिंग आणि स्पॅम कॉल्समुळे वैतागले आहेत. पण, चिंता करू नका. आम्ही तुम्हाला एका ट्रिकबद्दल सांगणार आहोत. ही ट्रिक वापरल्यास तुम्हाला फोन स्विच ऑफ किंवा फ्लाईट मोडवर ठेवण्याची गरज भासणार नाही.

ही सेटिंग ऑन केल्यानंतर तुमचा नंबर फोन स्विच ऑफ न करता कॉलरला कॉल ऑफ सांगेल, ज्यामुळे अनेक नको असलेले आणि स्पॅम कॉल्सपासून सुटका मिळवता येईल. कारण, घरी असाल किंवा ऑफिसमध्ये, नको असलेले स्पॅम कॉल्स तुम्हाला त्रास देण्यासाठी नेहमीच तयार असतात.

आता या नको असलेल्या स्पॅम कॉल्सपासून सुटका कशी मिळवायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जास्त विचार करण्याची गरज नाही. फोनमधील एक छोटीशी सेटिंग बदलून तुम्ही या स्पॅम आणि नको असलेल्या कॉल्सपासून सुटका मिळवू शकता.

‘या’ सेटिंगच्या मदतीने स्पॅम कॉल्स रोखा

आम्ही तुम्हाला एका ट्रिकबद्दल सांगणार आहोत. यानंतर तुम्हाला फोन स्विच ऑफ किंवा फ्लाईट मोडवर ठेवण्याची गरज भासणार नाही. होय, ही सेटिंग ऑन केल्यानंतर तुमचा नंबर फोन स्विच ऑफ न करता कॉलरला कॉल ऑफ सांगेल. यामुळे अनेक नको असलेले आणि स्पॅम कॉल्सपासून सुटका होईल.

‘या’ स्टेप्स फॉलो करा

नको असलेले आणि स्पॅम कॉल्सपासून मुक्त होण्यासाठी प्रथम आपला फोन घ्या आणि कॉलच्या सेक्शनमध्ये जा.

कॉल सेक्शनमध्ये सप्लिमेंट्री सेवेचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. हा पर्याय वेगवेगळ्या कंपनीच्या फोनमध्ये वेगवेगळ्या नावाने असू शकतो. अशावेळी आपल्या डिव्हाईसमध्ये ते कोणते नाव आहे, हे शोधावे लागेल.

सप्लिमेंटरी सर्व्हिस ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर कॉल वेटिंगचा ऑप्शन दिसेल. बहुतेक फोनमध्ये हा पर्याय आपोआप चालू होतो, त्यामुळे आधी तो डिसेबल करा.

कॉल वेटिंग ऑप्शन बंद केल्यानंतर कॉल फॉरवर्डिंग पर्यायावर क्लिक करा. आयफोनमध्ये थेट तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन कॉल फॉरवर्ड पर्यायावर क्लिक करू शकता आणि पुढील प्रक्रियेचे अनुसरण करू शकता.

कॉल फॉरवर्डिंगवर क्लिक केल्यानंतर एक विंडो ओपन होईल, ज्यामध्ये दोन पर्याय दिसतील. व्हॉईस कॉल आणि व्हिडिओ कॉल, यापैकी पहिले निवडा.

व्हॉईस कॉलवर क्लिक केल्यानंतर चार पर्यायांची विंडो ओपन होईल. या विंडोमध्ये व्यस्त असताना फॉरवर्ड या पर्यायावर क्लिक करा. आता ज्या नंबरवर तुम्हाला तुमचे कॉल फॉरवर्ड करायचे आहेत तो नंबर टाका. परंतु लक्षात ठेवा की येथे तोच नंबर टाका, जो बहुतेक स्विच ऑफ असतो.

शेवटी इनेबलच्या पर्यायावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर नको असलेले आणि स्पॅम कॉल थेट तुम्ही फीड केलेल्या स्विच ऑफ नंबरवर फॉरवर्ड होतील.

स्पॅम कॉल्स रोखण्याचे इतर मार्ग

तुमचा स्विच ऑफ नंबर नसेल किंवा तुम्ही तुमच्या फोनमध्ये वर नमूद केलेल्या सेटिंग्ज ऑन करू शकत नसाल तर तुम्ही टेलिमार्केटिंग, प्रमोशनल आणि स्पॅम कॉल्स-मेसेज थेट ब्लॉक करू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या नंबरवर डीएनडी म्हणजेच डू नॉट डिस्टर्ब सर्व्हिस देखील चालू करू शकता.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.