AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Facebook Avatars Feature | फेसबुकवर तुमचा अ‍ॅनिमेटेड अवतार कसा बनवाल?

या फीचरच्या मदतीने फेसबुक युझर्स त्यांच्या सारखे दिसणारे स्टिकर्स कमेंट्स आणि मेसेजमध्ये वापरु शकतात.

Facebook Avatars Feature | फेसबुकवर तुमचा अ‍ॅनिमेटेड अवतार कसा बनवाल?
Follow us
| Updated on: Jul 02, 2020 | 4:41 PM

मुंबई : सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने नुकतंच ‘अवतार फीचर’ (Facebook Avatars Feature) भारतात आणलं. या फीचरच्या मदतीने आता फेसबुकचे भारतीय युझर्स त्यांचं अ‍ॅनिमेटेड कॅरेक्टर डिझाईन करु शकतील. या फीचरच्या मदतीने फेसबुक युझर्स त्यांच्या सारखे दिसणारे स्टिकर्स कमेंट्स आणि मेसेजमध्ये वापरु शकतात. फेसबुकने विशेषकरुन हे स्टिकर्स आणि अवतार भारतीय युझर्ससाठी कस्टमाईज केले आहेत (Facebook Avatars Feature).

फेसबुक अवतार फीचरच्या मदतीने युझरला फक्त एकदा त्यांचं अ‍ॅनिमेटेड कॅरेक्टर (Animated Character) डिझाईन करावं लागेल. त्यानंतर पोस्ट्स, प्रोफाईल फोटो किंवा मेसेन्जर चॅट विंडोमध्ये ते त्यांचा अवतार शेअर करु शकतील.

विशेष म्हणजे हा फेसबुक अवतार फक्त फेसबुकपुरताच मर्यादित नसेल. तर, तुम्ही थर्ड पार्टी अ‍ॅप्स जसे स्नॅपचॅट, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरही हा अवतार एक्सपोर्ट करु शकता.

फेसबुक अवतार कसा बनवावा?

– सर्व प्रथम, तुम्हाला गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर जाऊन फेसबुक अ‍ॅपचं नवीन व्हर्जन अपडेट करावं लागेल.

– त्यानंतर फेसबुक अ‍ॅप ओपन करा. वरच्या बाजुने उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या 3 लाईन असलेल्या ‘हॅमबर्गर’ ऑप्शनवर क्लिक करा.

– इथे स्क्रोल डाऊन केल्यानंतर See More ऑप्शनवर क्लिक करा. तिथे तुम्हाला जांभळ्या रंगात Avatars चा आयकन दिसेल.

– या Avatars च्या आयकनवर क्लिक करा.

– त्यानंतर तुम्हाला अवतार कस्टमाईज करण्याचा ऑप्शन मिळेल. यामध्ये तुम्हाला चेहऱ्याचा आकार आणि हेअरस्टाईलपासून ते तुमचे सर्व फीचर्स टाकावे लागतील.

– अवतारसाठी तुम्हाला बॉडी शेप आणि कपडेही निवडावे लागतील.

– एकदा का तुम्ही कस्टमायजेशन पूर्ण केलं, त्यानंतर टॉप राईटमध्ये दिसणाऱ्या निळ्या रंगातील ‘Done’ ऑप्शनवर क्लिक करा.

– त्यानंतर हे अ‍ॅप्लिकेशन तुमचा नवीन अवतार जनरेट करेल, म्हणजेच तयार करेल. त्यानंतर तुम्हाला हा अवतार सोशल मीडियावर शेअर करण्याचं ऑप्शनही मिळेल.

– जर तुम्हाला हा अवतार फीडमध्ये शेअर करायचा असेल तर तुम्ही ते करु शकता किंवा स्किपही करु शकता.

– यानंतर कमेंट किंवा मेसेन्जरमध्ये जाऊन स्माईलीच्या आयकनवर क्लिक करा. त्यानंतर स्टिकर सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही तुमचे स्टिकर्स शेअर करु शकता (Facebook Avatars Feature).

संबंधित बातम्या :

Tik Tok ला टक्कर देण्यासाठी भारतीय Mitron अॅप लाँच, महिनाभरात तब्बल 50 लाखांपेक्षा अधिक युझर्स

लॉकडाऊनदरम्यान Whatsapp कडून युझर्ससाठी नवं फीचर लाँच

Chinese Apps Ban | चीनच्या 59 अ‍ॅपवर बंदी, तुमच्या मोबाईलमधील त्या अ‍ॅप्सचं पुढे काय होणार?

पहलगाम हल्ल्याचा मुद्दा ब्रिटिश संसदेत उपस्थित; शांततेचं आवाहन
पहलगाम हल्ल्याचा मुद्दा ब्रिटिश संसदेत उपस्थित; शांततेचं आवाहन.
'शत्रू हल्ल्याआधी 10 वेळा विचार करेल', नवाज शरीफच्या मुलीची दर्पोक्ती
'शत्रू हल्ल्याआधी 10 वेळा विचार करेल', नवाज शरीफच्या मुलीची दर्पोक्ती.
या गोष्टीत धर्म, जात, पात भाषा आणायच्या नाहीत - शरद पवार
या गोष्टीत धर्म, जात, पात भाषा आणायच्या नाहीत - शरद पवार.
27 नागरिकांचे मृत्यू हे सरकारने घेतलेले नरबळी; संजय राऊतांचा घणाघात
27 नागरिकांचे मृत्यू हे सरकारने घेतलेले नरबळी; संजय राऊतांचा घणाघात.
मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल, पाकची तंतरली अन् मध्यरात्री मोठा दावा
मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल, पाकची तंतरली अन् मध्यरात्री मोठा दावा.
पहलगामनंतर CCSची बैठक, 'सिंधू जल' स्थगितीनंतर कोणता मोठा निर्णय होणार?
पहलगामनंतर CCSची बैठक, 'सिंधू जल' स्थगितीनंतर कोणता मोठा निर्णय होणार?.
पाकिस्तानची मस्ती काय उतरेना..भारतीय लष्कराबाबत समर्थकांकडून खोटे दावे
पाकिस्तानची मस्ती काय उतरेना..भारतीय लष्कराबाबत समर्थकांकडून खोटे दावे.
यूट्यूब चॅनल बंद केले; याला बदला म्हणायचं का? संजय राऊतांचा सवाल
यूट्यूब चॅनल बंद केले; याला बदला म्हणायचं का? संजय राऊतांचा सवाल.
पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठी माहिती समोर
पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठी माहिती समोर.
पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र
पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र.