WhatsApp मेसेज समोरच्याला कळू न देता वाचा, सोप्या टिप्स!

समजा कधी आपल्याला कुणाचा मेसेज आला आणि आपल्याला तो वाचायचा आहे पण त्याला कळू द्यायचं नाही की आपण तो मेसेज वाचलाय तर? अशावेळी काय करणार? या काही टिप्स, खास तुमच्यासाठी...

WhatsApp मेसेज समोरच्याला कळू न देता वाचा, सोप्या टिप्स!
मॅसेज केला म्हणून मुलाने आईला संपवलेImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 11:05 AM

मुंबई: अन्न, वस्त्र, निवारा आणि व्हॉट्सॲप! व्हॉट्सॲप हे आपल्या आयुष्यात सध्याला एक अविभाज्य घटक आहे. या व्हॉट्सॲपवर आपण लोकांशी बोलतो, मित्रांशी संपर्कात असतो. फोनकॉल्स ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी व्हॉट्सॲप हे सर्वस्व आहे. कुठेही असलं तरी ही लोकं व्हॉट्सॲप करतात. आता हे व्हॉट्सॲप किती सुरक्षित आहे हा भाग वेगळा. व्हॉट्सॲप असल्यामुळे खरं तर समोरच्या व्यक्तीचे अपडेट्स मिळतात. पण समजा कधी आपल्याला कुणाचा मेसेज आला आणि आपल्याला तो वाचायचा आहे पण त्याला कळू द्यायचं नाही की आपण तो मेसेज वाचलाय तर? अशावेळी काय करणार? या काही टिप्स, खास तुमच्यासाठी…

व्हॉट्सॲप ब्लू टिक सेटिंग्स बंद करा

तुम्हाला व्हॉट्सॲपचे ब्लू टिक बंद करता येते का? जर तुम्हाला या फिचर बद्दल माहित असेल तर तुम्हाला हेही नक्कीच माहित असेल की या फिचरचा किती फायदा आहे. आपण जर व्हॉट्सॲपचे ब्लू टिक बंद केले तर आपण मेसेज वाचला आहे की नाही हे समोरच्या व्यक्तीला कळत नाही.

कसं करणार ब्लू टिक बंद?

व्हॉट्सॲप सेटिंग्ज > अकाऊंट > प्रायव्हसीमध्ये जाऊन रीड रिसिप्ट्स चा पर्याय बंद करा.

एअरप्लेन मोड चालू करा

व्हॉट्सॲपवर मेसेज ओपन करण्यापूर्वी तुमच्या डिव्हाइसवरील एअरप्लेन मोड ऑन करा. या पद्धतीमुळे व्हॉट्सॲप समोरच्याला पाठवलेल्या मेसेजचे स्टेटस अपडेट करणार नाही. म्हणजेच समोरच्याला कळणारच नाही की आपला मेसेज पोहचला आहे की नाही.

फोन एअरप्लेन वर कसा टाकणार?

सेटिंग्स> एअरप्लेन मोडवर जा > चालू करा. आता व्हॉट्सॲप ओपन करा आणि चॅट वाचा.

पण हे फीचर कधीकधी काम करत नाही कारण एकदा तुम्ही एअरप्लेन मोड बंद करून ऑनलाइन परत आलात तर व्हॉट्सॲप मेसेजेसचे रीड स्टेटस अपडेट करू शकते. त्यामुळे या सेटिंग्सवर कितपत निर्भर राहायचं हे तुम्ही ठरवा.

नोटिफिकेशन बार

हा सर्वात सोपा मार्ग आहे. सोपा आणि बेसिक मार्ग ज्याद्वारे लोक चॅट विंडो न उघडता व्हॉट्सॲप मेसेज वाचतात. फक्त नोटिफिकेशन विंडो खाली स्लाइड करा आणि थेट नोटिफिकेशन बारमध्ये संदेश पहा. पण आपल्याकडे यासाठी तत्परता हवी. यात तुम्ही आणखी एक गोष्ट करू शकता. तुम्हाला ज्या व्यक्तीच्या मेसेज सोबत हे करायचं आहे तो सोडून इतर सगळ्या लोकांचे मेसेज Archive मध्ये टाका. सगळे मेसेज Archive मध्ये असल्यामुळे तुम्हाला आता एकाच व्यक्तीचा मेसेज नोटिफिकेशन बार मध्ये दिसेल. ते मेसेज नोटिफिकेशन मध्येच वाचा. हे यासाठी करायचं आहे कारण एकसाथ खूप लोकांचं मेसेज जर नोटिफिकेशन मध्ये दिसले तर तुम्हाला मेसेज वाचणं कठीण जाईल.

पॉप-अप नोटिफिकेशन ऑन कसं करणार?

अशा प्रकारे, आपल्याला पॉप-अप म्हणून मेसेजचे नोटिफिकेशन प्राप्त होईल. पॉप-अप नोटिफिकेशन ऑन करण्यासाठी> व्हॉट्सॲप ओपन करा> वरच्या उजव्या कोपऱ्यात टॅप करा> सेटिंग्ज पॉपअप नोटिफिकेशन > नोटिफिकेशन > आणि ‘नेहमी पॉपअप दाखवा’ निवडा.

होम स्क्रीनवर व्हॉट्सॲप ॲप विजेट जोडा

व्हॉट्सॲप विजेट्स आपल्या कॉन्टॅक्ट्सद्वारे नोटिफिकेशन आणि मेसेज देखील दाखवतात. व्हॉट्सॲप न उघडता हे मेसेज तुम्ही थेट विजेट्सवरून वाचू शकता.

आपल्या डिव्हाइसच्या होम स्क्रीनवर व्हॉट्सॲप विजेट जोडण्यासाठी

होम स्क्रीनवर टॅप करा आणि होल्ड करा> विजेट ऑप्शन दिसेल, टॅप करा> आपल्या डिव्हाइसवरील विजेटची यादी स्क्रोल करा> व्हॉट्सॲप विजेट जोडा.

व्हॉट्सॲप वेब वापरणाऱ्यांसाठी खास टिप्स

ही टीप व्हॉट्सॲप वेब युजर्सच्या कामी येईल. शेवटचा मेसेज जर तुम्हाला वाचायचा असेल तर अगदी सोप्पय. त्या कॉन्टॅक्ट वर माऊस ठेवा तिथे खाली तुम्हाला मेसेज दिसेल. पण यात फक्त शेवटचा मेसेज दिसतो.

थर्ड पार्टी ॲप च्या माध्यमातून

असे काही थर्ड पार्टी ॲप आहेत जे लोकांना कळू न देता व्हॉट्सॲप मेसेज वाचण्यास मदत करू शकतात. पण थर्ड पार्टी ॲप सुरक्षित किंवा विश्वासार्ह नाहीत.

चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.