WhatsApp मध्ये कमी क्वॉलिटीचे फोटो सेंड होताय? तर या सोप्या ट्रीक्सने HD मध्ये पाठवा फोटो
व्हॉट्सॲपवर फोटो पाठवताना क्वालिटी कमी होऊन समीरच्या व्यक्तीला सेंड होतंय. त्यामुळे तुम्हाला HD क्वालिटी असलेले फोटो नातेवाईकांना किंवा मित्र-मैत्रिणींना पाठवायचे असतील तर एक अतिशय सोपी ट्रिक आहे. यामुळे तुम्ही व्हॉट्सॲपवर सुद्धा HD क्वालिटीचे फोटो पाठवू शकाल.
आजकाल प्रत्येकाकडे व्हॉट्सॲप हे आहेच कारण याच्या माध्यमातून आपल्या पासून लांब असलेल्या कुटुंबियांशी आणि मित्रमैत्रिणींशी आपण जोडलेलो आहोत. तसेच व्हॉट्सॲप हे जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. व्हॉट्सॲपवर तुम्ही एकमेकांना फोटो, व्हिडिओ आणि फाईल्स पाठवू शकता. पण जेव्हा आपण व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आपल्या कुटुंबियांना किंवा मित्रांना एखादा फोटो पाठवत असाल पण त्याची क्वॉलिटी तेव्हा कमी होऊन जाते. त्यामुळे फोटो म्हणा किंवा व्हिडीओ यांची क्वॉलिटी कमी झाल्याने चांगले दिसत नाही. जर तुम्हीही फोटोंच्या खराब क्वॉलिटीमुळे वैतागले असाल तर आम्ही तुमच्यासाठी HD मध्ये फोटो पाठवण्याचा अतिशय सोपा मार्ग घेऊन आलो आहोत. चला तर जाणून घेऊयात.
व्हॉट्सॲपमध्ये फोटोची क्वॉलिटी कमी करून पाठवता येते. कारण कमी क्वॉलिटीचे फोटो तुमच्या फोनचे स्टोरेज वाचवण्यासाठी आणि इंटरनेट डेटाचा वापर कमी करण्यासाठी केले जाते. पण जेव्हा आपण चांगल्या क्वॉलिटीचा फोटो पाठवतो तेव्हा या सेटिंगमुळे कमी क्वॉलिटीचा फोटो सेंड होतो. पण एका उत्तम ट्रिकने तुम्ही एचडीमध्ये फोटो पाठवू शकाल.
HD मध्ये फोटो कसे पाठवावे?
व्हॉट्सॲपवर एचडीमध्ये फोटो पाठवण्याची पद्धत खूप सोपी आहे, फक्त या स्टेप्स फॉलो करा.
तुम्हाला ज्या व्यक्तीला किंवा ग्रुपमध्ये HD क्वॉलिटीचा फोटो पाठवायचा आहे त्या व्यक्तीचा किंवा ग्रुपचा चॅट ओपन करा.
ओपन केल्यांनतर आता अटॅचमेंट आयकॉनवर जा आणि आपल्या फोन गॅलरीमधून फोटो निवडा.
फोटो सिलेक्ट केल्यावर टॉपवर एचडी ऑप्शन दिसेल, सिलेक्ट करा.
एचडी ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर हाय डेफिनेशन फोटो शेअरिंगॲक्टिव्हेट होईल आणि हाय क्वालिटी इमेज पाठवली जाईल.
या गोष्टी लक्षात ठेवा
जेव्हा तुम्ही एचडी फोटो पाठवता तेव्हा त्यावर एचडी लेबल लावेल गेलं आहे कि नाही हे एकदा चेक करा. व्हॉट्सॲपवरून एखादा फोटो शेअर केल्यावर एचडी निवडण्याचा पर्याय मिळतो. हे हाय-डेफिनेशने इमेज शेअर करेल.
जर तुमचे इंटरनेट स्लो असेल किंवा तुम्हाला डेटा सेव्ह करायचा असेल तर तुम्ही फोटोची गुणवत्ता निवडू शकता. गरजेनुसार तुम्ही नॉर्मल फोटो आणि हाय डेफिनेशन फोटोज मध्ये समतोल साधू शकाल.