Cyber Insurance: सायबर इन्शुरन्सचा कसा घ्याल फायदा, फसवणूक झाल्यास नुकसान भरपाई कशी मिळवणार? वाचा हा रिपोर्ट
डिजिटल व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. दरम्यान, आपण गाडी, कार यासह अनेक गोष्टींचा विमा काढतो. तशाच प्रकारचा विमा आता तुम्हाला सायबर गुन्हेगारीपासून बचावासाठी देखील काढता येणार आहे.
मुंबई : सायबर (Cyber) फसवणुकीच्या वाढत्या घटनां वाढतायत. यामध्ये आपण देखील फसू शकतो. सायबर फडवणुकीच्या घटना वाढत असल्यानं आता तुमच्याकडे ‘सायबर विमा’ (Cyber Insurance) असणं आवश्यक आहे. हा एक प्रकारचा करार आहे. यामध्ये ऑनलाइन व्यवसाय कंपनी किंवा व्यक्ती आर्थिक जोखीम टाळण्यासाठी विमा पॉलिसी खरेदी करते. सायबर गुन्ह्यांमुळे होणारे नुकसान निश्चित शुल्काच्या बदल्यात कव्हर केले जाते. पण, सायबर इन्शुरन्सलाही मर्यादा असते, हे तुम्हाला माहिती आहे का, त्यामुळे डिजिटल व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. दरम्यान, आपण गाडी, कार (Car) यासह अनेक गोष्टींचा विमा काढतो. तशाच प्रकारचा विमा आता तुम्हाला सायबर गुन्हेगारीपासून बचावासाठी देखील काढता येणार आहे. याचविषयी आम्ही तुम्हाला आज माहिती देणार आहोत. सायबर इन्शुरन्सचे फायदे जाणून घ्या….
पॉलिसी समजून
सायबर इन्शुरन्स घेताना पॉलिसीची चांगली माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला पॉलिसीपासून कोणतं संरक्षण मिळेल आणि गरज पडल्यास ते कसे वापरावे याची जाणीव असायला हवी. विमा पॉलिसीमध्ये विविध प्रकारचे सायबर धोके दिलेले आहेत. जर तुम्ही जास्त ऑनलाइन व्यवहार करत असाल तर जास्त मर्यादा असलेली पॉलिसी घेणे चांगले.
या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
- सायबर गुन्ह्यांचे किती धोके कव्हर केले जात आहेत हे लक्षात ठेवा
- सायबर ठग तुमची संवेदनशील माहिती चोरतात, जसे की- बँक खाते तपशील आणि ओळख इ.
- हा एक प्रकारचा व्हायरस आहे जो संगणक, मोबाईल आणि टॅबलेट इत्यादी डिजिटल उपकरणांमधून वैयक्तिक माहिती चोरतो.
- सिम स्वॅप यामध्ये- तंत्रज्ञानाच्या मदतीने मूळ सिमऐवजी डुप्लिकेट सिम तयार केले जाते. याद्वारे बँक खात्यातून ऑनलाइन पैसे ट्रान्सफर केले जातात.
- क्रेडेन्शियल स्टफिंग यामध्ये फसवणूक करणारे तुमची वैयक्तिक माहिती गोळा करतात.
पॉलिसीमध्ये काय समाविष्ट करावे
जर तुम्ही सायबर विमा पॉलिसी निवडत असाल, तर काही गोष्टी लक्षात ठेवा….
- स्पूफिंग आणि फिशिंगमुळे आर्थिक नुकसान बँक खाते किंवा डेबिट-क्रेडिट कार्डशी संबंधित महत्त्वाच्या माहितीची चोरी.
- ई-वॉलेटद्वारे ऑनलाइन व्यवहारांमध्ये फसवणूक.
- ओळख चोरीनंतर संबंधित नुकसान आणि खर्चाची माहिती.
- व्हायरस इत्यादींमुळे डेटा किंवा संगणक प्रोग्रामचे नुकसान झाल्यानंतर त्यांना पुन्हा स्थापित करण्याची किंमत.
अशी बाळगा सावधता
तुम्ही स्वतः सायबर विमा असला तरीही तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण, बहुतेक लोक केवळ त्यांच्या संगणक आणि स्मार्टफोनवरूनच नव्हे तर कार्यालयीन संगणक आणि सार्वजनिक वाय-फाय वरून देखील आर्थिक व्यवहार करतात. बाह्य उपकरणांवरून वैयक्तिक माहिती ऍक्सेस करण्यामध्ये उच्च मोठा असतो. सायबर हल्ले कसे होतात हे कळायला हवे. कोणत्या परिस्थितीत नुकसान होऊ शकते आणि सायबर हल्ले कसे टाळताही येऊ शकतात.