आता WhatsApp वर इमेज सर्च करता येणार, नव्या फिचरमध्ये फेक न्यूजही कळणार
आता व्हॉट्सअॅपमध्ये इमेज सर्च करता येणार, तसेच फेक न्यूजला देखील आळा घालने शक्य होणार आहे. कारण, व्हॉट्सअॅपमध्ये नवे फीचर येत आहे. या फीचरमुळे युजर्स थेट व्हॉट्सअॅपमध्ये कोणतीही इमेज सर्च करून त्याची सत्यता तपासू शकता. विशेष म्हणजे एक नवीन 'कस्टम लिस्ट' फीचर देखील येत आहे. हे नवे फीचर तुम्हाला फायद्याचे ठरू शकते. युजर्सना त्यांचे आवडते कॉन्टॅक्ट सहजपणे शोधता येतील.
व्हॉट्सअॅपमध्ये आता तुम्हाला आणखी मजा येऊ शकते. कारण, व्हॉट्सअॅपमध्ये तुम्हाला इमेज सर्च करता येणार आहे. व्हॉट्सअॅप लवकरच एक नवीन फीचर घेऊन येत आहे. हे फीचर युजर्सला फेक न्यूजपासून दूर ठेवण्यास मदत करेल. व्हॉट्सअॅपच्या या फीचर्सविषयी खाली विस्ताराने जाणून घ्या.
कोणतीही इमेज सर्च करा
व्हॉट्सअॅपमध्ये या नव्या फीचरच्या मदतीने युजर्स थेट व्हॉट्सअॅपमध्ये कोणतीही इमेज सर्च करू शकतील आणि ती इमेज खरी आहे की फेक आहे, याचा शोध घेऊ शकतील. हे फीचर खूप उपयुक्त ठरू शकतं, कारण व्हॉट्सअॅपवरून फेक न्यूज वेगाने पसरत आहे, ज्यावर सरकारकडून व्हॉट्सअॅपवर प्रचंड दबाव आणला जात होता. फेक न्यूजचा प्रसार रोखण्यासाठी व्हॉट्सअॅपकडून एक नवीन टूल आणले जात आहे.
‘हे’ फीचर कसे काम करेल?
इमेज शोध: जेव्हा आपल्याला एखादी इमेज सापडेल तेव्हा आपण त्यावर क्लिक करू शकता आणि शोध चिन्हावर टॅप करू शकता.
वेब सर्च: हा आयकॉन वेबवरील इमेज सर्च करेल आणि तुम्हाला दाखवेल की ही इमेज आधी कुठे वापरली गेली आहे.
फेक न्यूज टाळणे: अशा प्रकारे एखादी इमेज फेक आहे की नाही हे तुम्ही सहज शोधू शकाल.
व्हॉट्सअॅप कस्टम लिस्ट फीचर
व्हॉट्सअॅपने कस्टम लिस्ट नावाचे आणखी एक नवे फीचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या आवडत्या कॉन्टॅक्ट्स आणि ग्रुप्सची स्वतंत्र यादी तयार करू शकता. यामुळे तुम्हाला ते कॉन्टॅक्ट शोधणे सोपे जाईल आणि तुम्ही त्यांच्याशी पटकन चॅटिंग करू शकाल.
‘या’ फीचरचे फायदे काय?
फेक न्यूजचा प्रसार रोखणे: आजकाल सोशल मीडियावर फेक न्यूज खूप वेगाने पसरतात. व्हॉट्सअॅपच्या या नव्या फीचरमुळे फेक न्यूज पसरण्यापासून रोखण्यास मदत होणार आहे.
अधिक चांगला युजर्स अनुभव: कस्टम लिस्ट फीचर युजर्सना अधिक चांगला चॅटिंग अनुभव देईल.
फीचर कधी उपलब्ध होणार?
व्हॉट्सअॅप हळूहळू हे दोन्ही फीचर्स सर्व युजर्ससाठी रोलआउट करत आहे. तुमच्याकडे व्हॉट्सअॅपचे लेटेस्ट व्हर्जन असेल तर तुम्ही हे फीचर्स ट्राय करू शकता.
व्हॉट्सअॅपचे हे दोन्ही नवे फीचर्स
युजर्ससाठी हे दोन्ही फीचर्स खूप उपयुक्त ठरणार आहेत. फेक न्यूज रोखणे आणि चॅटिंगचा चांगला अनुभव, हे दोन्ही फायदे युजर्सना मिळतील.
व्हॉट्सअॅपचे हे दोन्ही फीचर्स तुमच्या फायद्याचे ठरू शकतात. विशेष म्हणजे तुम्हाला फेक न्यूज देखील कळेल आणि कोणतीही इमेज सर्च करता येईल.