व्हाट्सअॅप पेमेंटवर ‘असे’ मिळवा कॅशबॅक… काय आहे ऑफर?

जर तुम्ही व्हाट्‍सॲप पेमेंटसाठी रजिस्टर असाल तर तुम्हाला आता त्यावर पेमेंट ट्रान्सफर करण्यावर लवकच कॅशबॅक मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या लेखातून ही संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या...

व्हाट्सअॅप पेमेंटवर ‘असे’ मिळवा कॅशबॅक... काय आहे ऑफर?
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 10:41 AM

युजर्सनी व्हाट्‍सॲपवरील पेमेंटच्या (whatsapp payments) पर्यायाचा जास्तीत जास्त वापर करावा यासाठी कंपनीकडून कॅशबॅक (cashback) सारख्या सुविधा आणल्या जात आहेत. व्हाट्‍सॲप या मॅसेजिंग ॲप्लिकेशनमध्ये पूर्ण भारतभरात तब्बल 100 मिलियन युजर्ससाठी पेमेंटच्या फिचर्सला पुढे घेउन जाण्यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न केले जात आहेत. व्हाट्‍सॲप पेमेंट ही युपीआयवर आधारीत सिस्टीम आहे. ज्यात मॅसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये इंटीग्रेट करण्यात आले आहे. आता या पेमेंट ऑप्शनचा वापर वाढावा म्हणून कंपनीकडून कॅशबॅक ऑफर आणण्यात आली आहे. या फिचरला हळूहळू सर्वच युजर्ससाठी वापरात आणले जाणार आहे. कंपनीच्या एका दाव्यानुसार, पुढील काळात 500 मिलियन भारतीयांना डिजिटल पेमेंट (Digital payment) इकोसिस्टीममध्ये आणण्याचे लक्ष ठरवण्यात आले आहे.

रॉयटर्सच्या एका रिपोर्टनुसार, व्हॉटस्अप पेमेंटच्या वापरानंतर युजर्सना कॅशबॅक मिळणार आहे. यात विशेष म्हणजे हे कॅशबॅक ट्रांजेक्शन करण्यात येणार्या रकमेपर्यंतच लिमिटेड राहणार नाही, कॅशबॅक ट्रांजेक्शनवर ऑफर करण्यात येणार आहे. एक रुपयांच्या ट्रांजेक्शनसाठीही व्हाट्‍सॲप याला एका व्हॅलिड ट्रांजेक्शनच्या रुपात मोजणार आहे.

अशी मिळवा कॅशबॅक

कॅशबॅक मिळवण्यासाठी सर्वात आधी भारतात व्हाट्‍सॲप पेमेंटसाठी नोंदणी केलेल्या तुमच्या व्हाट्‍सॲप कॉन्टँक्टमधील एखाद्याला पैसे हस्तांतरीत करा. जर तुमचा क्रमांक व्हाट्‍सॲपवर पेमेंटसाठी नोंदणीकृत असेल तर तुम्हाला त्यांच्या नावाच्या समोर एक गिफ्ट आयकॉन दिसेल. जर तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्टच्या नावाच्या समोर कुठलेही आयकॉन दिसत नसेल तर, तुम्हाला 11 रुपयांचे कॅशबॅक मिळवण्यासाठी कुठलीही रक्कम हस्तांतरीत करण्याआधी व्हाट्‍सॲप पेमेंटमध्ये ॲड होण्यासाठी इनव्हाइट करावे लागेल.

ॲड्रोईड मोबाईलवर असे करा व्हाट्‍सॲप पेमेंट

1. व्हाट्‍सॲप ओपन केल्यावर ‘मोअर ऑप्शन’वर जावे. त्यानंतर बाप पेमेंटवर क्लिक करा, त्यानंतर सेंड न्यू पेमेंटवर क्लिक करावे.

2. ज्यांना पैसे पाठवायचे आहे, अशा कॉन्टॅक्टवर क्लिक करा. जर तो नंबर व्हाट्‍सॲपवर पेमेंटसाठी रजिस्टर आहे, तर त्याच्या नावासमोर एक गिफ्ट आयकॉन दिसेल.

3. अमाउंट टाका, नेक्टवर टॅप करावे, सेंड पेमेंटवर टॅप करा, आणि आपला युपीआय पीन टाका.

आयफोनवर असे करा पेमेंट

1. व्हाट्‌सॲप उघडल्यानंतर सेटींग्सवर टॅप करावे, पेमेंटवर जावे, सेंड न्यू पेमेंटवर क्लिक करावे.

2. ज्यांना पेमेंट पाठवायचे आहे, त्या कॉन्टॅक्टवर क्लिक करा.

3 पाठवायची अमाउंट टाका, नेक्टवर क्लिक करावे, सेंड पेमेंटवर टॅप करा, त्यानंतर आपला युपीआय पीन टाका.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.