स्वस्तात पाहिजे असेल विमानाचे तिकीट तर गुगल सर्च करताना या टिप्स वापरा

Google Flights जर तुम्हीही कमी किमतीत तिकीट बुक करण्याचे मार्ग शोधत असाल तर या लेखात आम्ही तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने स्वस्त दरात बुकिंग करता येईल.

स्वस्तात पाहिजे असेल विमानाचे तिकीट तर गुगल सर्च करताना या टिप्स वापरा
विमानाचे टिकीटImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 27, 2023 | 8:15 PM

मुंबई : जेव्हा आरामदायी प्रवासाचा विचार केला जातो तेव्हा बहुतेक प्रवासी म्हणतात की त्यांच्यासाठी विमान हा प्रवासाचा सर्वात आरामदायी मार्ग आहे. कोणत्याही गंतव्यस्थानावर पटकन पोहोचण्याचा हवाई प्रवास हा सर्वोत्तम मार्ग आहे, परंतु तो जितक्या जलद तुम्हाला तुमच्या गंतव्यस्थानावर घेऊन जाईल तितकेच त्याचे भाडे अधिक महाग होईल. जर तुम्हीही कमी किमतीत तिकीट बुक करण्याचे मार्ग शोधत असाल तर या लेखात आम्ही तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने स्वस्त दरात बुकिंग करता येईल. स्वस्त विमानाचे तिकीट कोणाला नको असते, पण ते कसे मिळवायचे हे फार कमी लोकांना माहिती आहे. फ्लाइटसाठी चांगली डील मिळवणे सोपे काम नाही परंतु काही सोपे उपाय करून तुम्ही कमी किमतीत विमानाचे तिकीट मिळवू शकता. हे सर्व गुगलच्या फीचरच्या (Google Flights) मदतीने शक्य आहे.

तिकीटाचा किंमत आलेख

सर्व प्रथम गुगल फ्लाइट सर्च करा. आता गुगल फ्लाईट्स पर्यायावर क्लिक करा आणि किंमत आलेख म्हणजेच प्राईज ग्राफ तपासा. Google Flight मध्ये, तुम्ही विशिष्ट तारखेनुसार किंवा महिन्यानुसार  देखील टिकीट शोधू शकता. यामध्ये तुम्ही फ्लाइट तिकिटाची जुनी किंमत देखील ट्रॅक करू शकता.

किंमत ट्रॅकिंग चालू करा

जर तुम्हाला कमी किमतीत फ्लाइट तिकीट हवे असेल तर तुम्ही गुगल चे किंमत ट्रॅकिंग फीचर चालू करू शकता. तुम्ही किंमत ट्रॅकिंग वैशिष्ट्य चालू करता तेव्हा, किंमत कमी होताच तुम्हाला गुगलकडून एक सूचना मिळेल. ते सेट करताना, लक्षात ठेवा की तुम्हाला तिकीट कधी हवे आहे याची तारीख आधीच ठरवा.

हे सुद्धा वाचा

फिल्टर वापरा

तसेच गुगल फ्लाइट सर्चमध्ये फिल्टर निवडा आणि श्रेणीनुसार फिल्टर लागू करा. फिल्टरमध्ये तुम्हाला फ्लाइट स्टॉपेज, एअरलाइन कंपनी, सामान आणि वेळ असे पर्याय मिळतील.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.