iPhone वापऱ्यांसाठी महत्वाची बातमी! आता हे फोनही कंपनी दुरुस्त करू शकणार नाही

अशी सर्व उत्पादने विंटेज म्हणून घोषित केली जातील, ज्यांची विक्री कंपनीने 5 वर्षांपेक्षा जास्त आणि 7 वर्षांपेक्षा कमी काळासाठी थांबवली आहे.

iPhone वापऱ्यांसाठी महत्वाची बातमी! आता हे फोनही कंपनी दुरुस्त करू शकणार नाही
निम्म्या किमतीत खरेदी करा आयफोन 13
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 4:38 PM

मुंबई : मोठा आणि महागडा मोबाईल म्हटलं की डोळ्यासमोर चटकन अ‍ॅपल (Apple) कंपनीच्या आयफोनचं (iPhone) नाव समोर येतं. आयफोन म्हणजे आजकाल प्रतिष्ठेची गोष्ट झाला आहे. प्रत्येकाला आयफोन हवा असतो. अलीडेच अगदी सर्रासपणे पालक देखील मुलांना आयफोन घेताना दिसून येतात. दरम्यान, याच वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी आहे. अ‍ॅपल दरवर्षी आयफोनचे नवीन प्रकार बाजारात आणत असतो. या वर्षी कंपनी आपला नवीन iPhone 14 लाँच करायचा आहे. याशिवाय कंपनी (Company) जुन्या आयफोनबाबतही अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अ‍ॅपलने आपल्या जुन्या आयफोनची सेवा बंद केली आहे.

अ‍ॅपलने काय म्हटलंय?

Apple सपोर्ट पेजवर दिलेल्या माहितीनुसार, ‘अशी सर्व उत्पादने विंटेज म्हणून घोषित केली जातील, ज्यांची विक्री कंपनीने 5 वर्षांपेक्षा जास्त आणि 7 वर्षांपेक्षा कमी काळासाठी थांबवली आहे. जर एखादे उत्पादन 7 वर्षांपेक्षा जास्त काळ बंद केले असेल, तर अशा कोणत्याही उत्पादनाचे हार्डवेअर सेवा दिली जाणार नाही.’ असं अ‍ॅपल कंपनीने म्हटलंय. त्यामुळे ज्यांच्याकडे जुना आयफोन आहे. त्यांचा आयफोन आता काहीही कामाचा नाही राहिलाय. कारण, तो रिपेअर देखील आता होऊ शकणार नाही. त्यामुळे जुना फोन घेत असाल तर खात्रीने आणि त्याचं मॉडेल चेक करून घ्या.

 या उत्पादनांची सेवा दिली जाणार नाही

  1. iPhone 4 (8GB)
  2. iPhone 4S
  3. हे सुद्धा वाचा
  4. iPhone 5
  5. iPhone 5C
  6. iPhone 6 Plus

अ‍ॅपलने गेल्या वर्षी यादी देखील जारी केली होती

  1. iPhone 3G (8GB, 16GB)
  2. iPhone 3GS (8GB, 16GB, 32GB)
  3. iPhone 4 GSM (8GB

कंपनी चांगली सूटही देते

अ‍ॅपल कंपनी आपली उत्पादने दर्जेदार आणि जास्त काळ टिकेल अशी बनवते. पण काही काळानंतर कंपनी त्याचे अपडेट्स देणे बंद करते. तसेच, अ‍ॅपल या उत्पादनांसाठी हार्डवेअर पुरवत नाही. उपकरणाची कार्यक्षमता राखण्यासाठी कंपनी वेळोवेळी दोषांचे निराकरण करते. त्यामुळे कंपनीने सॉफ्टवेअर अपडेट देणे बंद केले असेल तर तुम्ही ते अपग्रेड करा असा सल्ला दिला जातो. अ‍ॅपलने आयफोन वापरकर्त्यांसाठी ‘ट्रेड इन’चा पर्यायही दिला आहे . या पर्यायांतर्गत तुम्ही जुना आयफोन अपग्रेड करू शकता आणि त्या बदल्यात कंपनी चांगली सूटही देते. यासोबतच इतर ई-कॉमर्स साइट्सवरही एक्सचेंज ऑफर्स चालू राहतात. सध्या फ्लिपकार्टवर आयफोन अपग्रेड करण्यासाठी चांगली ऑफर आहे.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.