पाकिस्तानपेक्षा तिप्पट स्वस्तात मिळवा हा स्मार्टफोन; फीचर पण एकदम दमदार

Smartphone | शाओमीचा ब्रँड रेडमीचा असा एक 5जी स्मार्टफोन भारतात 9,499 रुपयांपासून सुरुवात होतो. तर पाकिस्तानमध्ये Redmi 12 5G हा स्मार्टफोन 35 हजार रुपयांपासून मिळतो. जाणून घ्या काय आहेत या स्मार्टफोनची फीचर, पाकिस्तान आणि भारतातील स्मार्टफोनमध्ये काय आहे फरक?

पाकिस्तानपेक्षा तिप्पट स्वस्तात मिळवा हा स्मार्टफोन; फीचर पण एकदम दमदार
Follow us
| Updated on: Jan 12, 2024 | 11:35 AM

नवी दिल्ली | 12 जानेवारी 2024 : भारतात विक्री होणाऱ्या स्मार्टफोनची पाकिस्तानमध्ये तिप्पट किंमत आहे. तुम्हाला वाटत असेल हे कसे शक्य आहे. पण सध्या पाकिस्तानच्या रुपयाचे अवमूल्यन झाल्याने आणि तिथल्या परिस्थितीमुळे हा मोठा फरक दिसून येत आहे. Redmi 12 5G हा स्मार्टफोन देशात 9,499 रुपयांपासून सुरु होतो. तर पाकिस्तानमध्ये हा स्मार्टफोन भारतापेक्षा तिप्पट किंमतीला विक्री होतो. पाकिस्तानमध्ये या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमतच 35 हजार रुपये आहे. काय आहेत या फोनमधील खास फीचर…

तीन व्हेरिएंटमध्ये फोन – Redmi 12 5G हा स्मार्टफोन तीन व्हेरिएंटमध्ये मिळतो. पहिला व्हेरिएंट 4 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज, दुसरा व्हेरिएंट, 6 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज आणि तिसरा व्हेरिएंट, 8 जीबी रॅम/256 जीबी स्टोरेज सह येतो. चला तर जाणून घेऊयात या स्मार्टफोनची भारतीय आणि पाकिस्तानी किंमत…

Redmi 12 5G Price in India- या रेडमी मोबाईल स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम/128 जीबी व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये, 6 जीबी रॅम/128 जीबी व्हेरिएंटची किंमत 10,499 रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

Redmi 12 5G Specifications (भारतीय व्हेरिएंट) –

  • डिस्प्ले : स्मार्टफोनमध्ये 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्टसह 6.79 इंचचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • प्रोसेसर : स्पीड आणि मल्टिटास्किंसाठी या डिव्हाईसमध्ये MediaTek Helio G88 चा वापर करण्यात आला आहे.
  • रॅम : रेडमी कंपनीचा हा 5जी फोन 12 जीबीपर्यंत व्हर्च्युअल रॅम सपोर्टसह येतो.
  • कॅमेरा सेटअप : रिअरमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर , सोबतच 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाईड एंगल लेन्स आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो कॅमरा सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये फ्रंटचा 8 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सर आहे.
  • बॅटरी : 18 वॅट वायर्ड फास्ट चार्ज सपोर्टसह या डिव्हाईसमध्ये 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

Redmi 12 5G Price in Pakistan – या रेडमी फोनच्या 4 जीबी रॅम/128 जीबी मॉडलची किंमत 34,999 रुपये, 8 जीबी रॅम/128 जीबी व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये आणि 8 जीबी रॅम/256 जीबी व्हेरिएंटची किंमत 42,999 रुपये आहे.

Redmi 12 5G Features (पाकिस्तानी व्हेरिएंट)

  • स्क्रीन : पाकिस्तानमधील मॉडेलमध्ये 6.79 इंचची फुल-एचडी प्लस डिस्प्ले आहे. तो 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्ट करतो.
  • चिपसेट: स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी पाकिस्तानी मॉडलमध्ये मीडियाटेक हीलियो जी88 प्रोसेसर देण्यात आले आहे.
  • कॅमरा : रिअरमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड एंगल कॅमरा आणि 2 मेगापिक्सल मायक्रो सेन्सर तर फ्रंटमध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
  • बॅटरी: या हँडसेटमध्ये 5000 एमएएची बॅटरी देण्यात आली आहे. 18 वॅट वायर्ड फास्ट चार्जचा त्याला सपोर्ट देण्यात आला आहे.
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.