YouTube व्हिडिओवर आला कॉपीराईट स्ट्राईक? चिंता नको, हा उपाय भारी

Youtube | युट्यूब अनेकांसाठी पैसा कमविण्याचे साधन झाले आहे. काही स्वतःचे व्हिडिओ तयार करतात. प्रत्येक जण त्याच्या आवडीनुसार या प्लॅटफॉर्मवर कामगिरी बजावतो. पण अनेकदा इतर कोणाचे गाणे, संगीत वापरल्यास कॉपीराईटची समस्या उद्भवते. युट्यूबवरील व्हिडिओवर कॉपीराईट स्ट्राईक येतो. या सोप्या पद्धतीने हा कॉपीराईट काढता येतो.

YouTube व्हिडिओवर आला कॉपीराईट स्ट्राईक? चिंता नको, हा उपाय भारी
Follow us
| Updated on: Nov 03, 2023 | 10:22 AM

नवी दिल्ली | 3 नोव्हेंबर 2023 : सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. व्हॉट्सपअप, फेसबुक, युट्यूब अशी सध्याची ऑनलाईन विद्यापीठं तयार झाली आहे. हवसे,नवसे, गवसे सर्वांचीच या यात्रेत गर्दी आहे. प्रत्येक जण थोडा वेळ तर या प्लॅटफॉर्मवर फेरफटका मारतोच. युट्यूबवर अनेक जण व्हिडिओ पोस्ट करुन कमाई करत आहेत. पण बरेचदा इतर कोणाचे गाणे, कंटेट, संगीत वापरल्याचा ठपका बसतो. तुमच्या युट्यूब व्हिडिओवर कॉपीराईट स्ट्राईक येतो. त्यामुळे व्हिडिओ व्हायरल झाला तरी त्याचा तु्म्हाला फायदा होत नाही. या सोप्या पद्धतीने तुम्ही कॉपीराईट स्ट्राईक हटवू शकता.

का लागतो कॉपी राइट

  1. व्हिडिओवर कॉपी राईट का लागतो हे सर्वात अगोदर समजून घ्या. ज्यावेळी दुसऱ्या युझरचा व्हिडिओ तुमचा असल्याचे भासवत पोस्ट कराल. कोणाचे संगीत, धून, गाणे याचा परवानगी न घेता वापर कराल तर अशा व्हिडिओवर कॉपी राईटचा स्ट्राईक येतो.
  2. एखादे पुस्तक, कथा, पटकथा, कादंबरी, ज्यावर इतर कोणाचे स्वामित्व, ट्रेडमार्क आहे. त्याचा तुमच्या व्हिडिओत वापर कराल तर तुमच्या चॅनलवर कॉपीराईट येऊ शकतो.
  3. हे सुद्धा वाचा
  4. एखाद्या व्हिडिओत तुम्ही पेड सॉफ्टवेअर मोफत डाऊनलोड करण्याची पद्धत शिकवत असाल तर या प्रकरणात सुद्धा तुमच्या चॅनलवर कॉपीराईट लागू शकतो.
  5. याशिवाय तुम्ही युट्यूबवर लाईव्ह स्ट्रीम करत असाल आणि त्यातील मजकूर हा कॉपीराईट अंतर्गत येत असेल तर तुमच्या चॅनलवर कॉपीराईट येऊ शकतो. तुमचे लाईव्ह स्ट्रीम पण एका आठवड्यात थांबवविण्यात येऊ शकते.

असे हटवा कॉपीराईट स्ट्राईक

कॉपीराईट स्ट्राईक हटविण्यासाठी केवळ एकच पर्याय आहे. तुम्ही तो व्हिडिओ डिलिट करा. अथवा युट्यूबला यथोचित मुद्यांसह तुमची बाजू मांडणारा व्हिडिओ पोस्ट करा. त्यात तुम्हाला हा कंटेट कॉपीराईट फ्री असल्याचा मुद्दा पटवून द्यावा लागेल. तुम्ही कॉपीराईट मुद्याकडे दुर्लक्ष केले तर युट्यूब व्हिडिओ अथवा अकाऊंट पण बंद करु शकते.

कॉपीराईट मालकाशी संपर्क

व्हिडिओ डिलिट करण्यापूर्वी तुमचा व्हिडिओ कॉपीराईट फ्री असल्याचे व्हेरिफाय करा. त्यानंतर स्ट्राईक स्वीकारा. Copyright School मध्ये सहभाग नोंदवा. याठिकाणी तुम्ही कॉपीराईट मालकाशी संपर्क साधू शकता. तुमचे चॅनल YouTube Partner Program मध्ये सहभागी असेल तर तुम्हाला युट्यूब 7 दिवसांचा वेळ देते. चॅनलविरोदात कॉपीराईट उल्लंघनासाठी तीन स्ट्राईक मिळते. त्यासाठी सात दिवसांचा वेळ देण्यात येतो. या काळात व्हिडिओ हटवावा लागतो वा तो भाग काढून टाकावा लागतो. नाहीतर तुमचे चॅनल बंद करण्यात येते.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.