मोबाईलच्या वापरात भारत तिसरा, भारतीय रोज किती तास घालवतात मोबाईलमध्ये?; वाचा सर्व्हे!
मोबाईल ही प्रत्येक व्यक्तीची गरज झाली आहे. मोबाईल हे संपर्काचं साधन असलं तरी त्यात माहितीचे अनेक स्त्रोत असल्याने अनेकजण मोबाईलमध्ये तास न् तास डोकावताना दिसतात. (India Ranks 3rd On Average Smartphone Usage Globally: Report)
नवी दिल्ली: मोबाईल ही प्रत्येक व्यक्तीची गरज झाली आहे. मोबाईल हे संपर्काचं साधन असलं तरी त्यात माहितीचे अनेक स्त्रोत असल्याने अनेकजण मोबाईलमध्ये तास न् तास डोकावताना दिसतात. एका सर्व्हेक्षणानुसार मोबाईल वापरात भारत हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर, भारतीय लोक रोज चार तास मोबाईलवर घालवत असल्याची धक्कादायक माहितीही या सर्व्हेक्षणातून उघड झाली आहे. (India Ranks 3rd On Average Smartphone Usage Globally: Report)
ZDNet न्यूज वेबसाइटने या बाबतचं वृत्त दिलं आहे. जगात ब्राझिलमध्ये सर्वाधिक मोबाईलचा वापर केला जातो. त्यामुळे या सर्व्हेत ब्राझिलला वरचा क्रमांक देण्यात आला आहे. ब्राझिलमधील लोक रोज 5 तास चार मिनिटं मोबाईलवर असतात. या सर्व्हेत इंडोनेशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथील लोक रोज 5 तास 3 मिनिटं मोबाईलवर असतात. भारतातील लोक रोज 4 तास 9 मिनिटं मोबाईलचा वापर करतात.
10 देशांमध्ये सर्व्हे
या रिपोर्टनुसार, सात इतर देशांच्या रँकिंगमध्ये साऊथ कोरियाचा चौथा नंबर आहे. साऊथ कोरियन लोक रोज 4 तास 8 मिनिटं मोबाईलचा वापर करतात. मॅक्सिकोमध्ये 4 घंटे 7 मिनिटं मोबाईलचा वापर केला जातो. या यादीत मॅक्सिको पाचव्या क्रमांकावर आहे. तुर्कीतील लोक 4 तास 5 मिनिटं मोबाईलचा वापर करतात. तुर्कीचा या यादीत सहावा नंबर लागतो. तर, जपानचा सातवा क्रमांक लागतो. जपानमध्ये 4 तास चार मिनिटं मोबाईलचा वापर केला जातो. कॅनडात मोबाईलचा वापर 4 तास एक मिनिटं केला जातो. अर्थात त्यामुळे कॅनडाचा या यादीत आठवा क्रमांक आहे. अमेरिकेत 3 तास 9 मिनिटं तर ब्रिटनमध्ये 3 तास 8 मिनिटं मोबाईलचा वापर केला जातो. त्यामुळे अनुक्रमे अमेरिका आणि ब्रिटन या यादीत नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहेत.
मोबाईल वापर वाढला
दरम्यान, विवोच्या अहवालानुसार, एप्रिल 2020नंतर मोबाईल फोनचा वापर पूर्वीच्या तुलनेत तब्बल 25 टक्क्यांनी वाढला आहे. कदाचित आपणही अशा लोकांच्या यादीत असू शकतो, जे मोबाईलचा अधिक वापर करतात, तर सावधगिरी बाळगा. कारण मोबाईल अति वापराची ही सवय तुम्हाला अनेक जीवघेण्या आजारांचा बळी बनवू शकते. काही काळापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालाद्वारे लोकांना मोबाईल फोनचा अति वापर टाळण्याचा इशारा दिला होता. एका अभ्यासानंतर डब्ल्यूएचओने आपल्या अहवालात म्हटले आहे की, मोबाईलचा अति वापर लोकांसाठी घातक ठरू शकतो. यामुळे होणारे रेडिएशन ब्रेन ट्युमर आणि ब्रेन कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकतात. (India Ranks 3rd On Average Smartphone Usage Globally: Report)
VIDEO | 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 26 July 2021 https://t.co/gFLxbyVNMB #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 26, 2021
संबंधित बातम्या:
256GB स्टोरेज, 32MP फ्रंट कॅमेरासह OnePlus Nord 2 5G भारतात दाखल, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
(India Ranks 3rd On Average Smartphone Usage Globally: Report)