Smartphones : रंग बदलणारा मोबाइल पाहिलाय? वाचा, कधी येणार आणि काय फिचर्स आहेत
चीनी (China) स्मार्टफोन (Smartphones) निर्माता कंपनी Vivoनं आपला नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्याची घोषणा केलीय. या फोनचं नाव Vivo V23 आहे, 5 जानेवारीला तो लॉन्च होईल.
मुंबई : चीनी (China) स्मार्टफोन (Smartphones) निर्माता कंपनी Vivoनं आपला नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्याची घोषणा केलीय. या फोनचं नाव Vivo V23 आहे, 5 जानेवारीला तो लॉन्च होईल. कंपनीच्या अधिकृत ट्विटनुसार, हा भारतातला पहिला रंग बदलणारा स्मार्टफोन असेल.
डिझाइन आणि सेन्सर Vivo Indiaनं आपल्या अधिकृत खात्यावरून येवू घातलेल्या Vivo मोबाइलबद्दल माहिती दिलीय. याचं नाव Vivo V23 असेल. यासोबतच 17 सेकंदाचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. यामध्ये स्मार्टफोनचं कलर चेंजिंग फीचर दिसतंय. मोबाइलचं डिझाइन आणि सेन्सरची माहितीही देण्यात आलीय.
5 जानेवारीला होणार लॉन्च Vivo V23च्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल, यामध्ये प्रायमरी सेन्सर 64 मेगापिक्सेल असेल. हा 5G मोबाइल असेल. हा फोन भारतात 5 जानेवारीला दुपारी 12 वाजता लॉन्च होईल. या सिरीज अंतर्गत दोन स्मार्टफोन नॉक करू शकतात, ज्यांची नावं Vivo V23, Vivo V23 Pro असतील. तसंच त्याला कर्व्ह्ड एज असतील.
मेटल फ्रेम यामध्ये मेटल फ्रेम वापरण्यात येणार असल्याचं टीझर व्हिडिओमध्ये दिसून आलंय. दोन्ही मॉडेल्समध्ये गोल्ड कलर व्हेरिएंटदेखील दिसेल. जुन्या रिपोर्ट्सनुसार, या फोन्समध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरे उपलब्ध असतील.
The exceptionally beautiful and brilliantly designed #vivoV23series is launching soon. Stay tuned to know more about India’s first colour changing phone.
Know more: https://t.co/AdnmuyWtL3#DelightEveryMoment pic.twitter.com/xVKGOFB8SX
— Vivo India (@Vivo_India) December 27, 2021
जुन्या लीकनुसार, Vivo V23 Proमध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरा असेल, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेल असेल, जो ऑटोफोकससह येतो. हा फोन र्व्ह्ड डिस्प्ले आणि S स्लिम बॉडी असलेला फोन आहे.