64MP Quad Cam, 256GB स्टोरेजसह Infinix चे दोन नवे स्मार्टफोन बाजारात, किंमत 11 हजारांहून कमी
मुंबई : Infinix ने Note 10 Series मधील स्मार्टफोन लाँच करण्यासह भारतातील आपली लाइनअप आणखी वाढविली आहे. कंपनीने गेल्या आठवड्यात इन्फिनिक्स नोट 10 (Infinix Note 10) आणि इन्फिनिक्स नोट 10 प्रो (Infinix Note 10 Pro) असे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. या दोन्ही स्मार्टफोनची फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साईटच्या माध्यमातून विक्री सुरु करण्यात आली आहे. हा […]
मुंबई : Infinix ने Note 10 Series मधील स्मार्टफोन लाँच करण्यासह भारतातील आपली लाइनअप आणखी वाढविली आहे. कंपनीने गेल्या आठवड्यात इन्फिनिक्स नोट 10 (Infinix Note 10) आणि इन्फिनिक्स नोट 10 प्रो (Infinix Note 10 Pro) असे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. या दोन्ही स्मार्टफोनची फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साईटच्या माध्यमातून विक्री सुरु करण्यात आली आहे. हा फोन आजपासून फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. (Infinix Note 10 Series smartphone now awailable on Flipkart at less than 11000 rs price)
या दोन्ही स्मार्टफोन्सच्या किंमतींबद्दल बोलायचे झाल्यास Infinix Note 10 दोन स्टोरेज मॉडेल्समध्ये सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये 64GB इंटर्नल स्टोरेज आणि 4GB RAM वाल्या फोनची किंमत 10,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे, तर 6GB RAM आणि 128GB स्टोरेजवाल्या फोनची किंमत 11,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. तसेच Infinix Note 10 Pro मध्ये 8GB RAM आणि 256GB इंटर्नल स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. या फोनची किंमत 16,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
डिस्काऊंट ऑफर
Infinix Note 10 आणि Infinix Note 10 Pro वर दिल्या जाण्याऱ्या ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही पेमेंट केलंत तर तुम्हाला दोन्ही फोनवर 5 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळेल. तसेच 500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त खरेदीवर फर्स्ट फ्लिपकार्ट पे लेटर ऑर्डरवर 100 रुपयांचा डिस्काऊंट मिळेल.
Infinix Note 10 चे स्पेसिफिकेशन्स
या स्मार्टफोनमध्ये 6.95 इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले आहे आणि तो MediaTek Helio 85 SoC प्रोसेसरवर चालतो. मायक्रोएसडी कार्डद्वारे या फोनची स्टोरेज स्पेस 256GB पर्यंत वाढवता येऊ शकते. कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात 48MP+2MP+2MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे आणि सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, ज्यास 18W टाइप-सी फास्ट चार्जर सपोर्ट देण्यात आला आहे.
It’s never endgame when you game on Infinix #NOTE10 #OutplayTheRest with Helio G85 gaming processor, 180Hz touch sampling rate and a massive 5000mAh battery!
Buy now on @Flipkart https://t.co/LB82maLptE pic.twitter.com/svZCmU9yT7
— InfinixIndia (@InfinixIndia) June 14, 2021
Infinix Note 10 Pro चे स्पेसिफिकेशन्स
अँड्रॉइयड 11 आधारित ऑपरेटिंग सिस्टम ऑउट ऑफ द बॉक्सवर चालणाऱ्या या फोनमध्ये 6.95 इंचाचा आयपीएस डिस्प्ले आहे, जो FHD+ डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे, ज्याचं रिझोल्यूशन 2460X1080 पिक्सल इतकं आहे आणि 90Hz चा रिफ्रेश रेट आहे. फोटोग्राफीसाठी यात 64MP+8MP+2MP+2MP क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे आणि सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Infinix Note 10 Pro स्मार्टफोन MediaTek Helio G95 प्रोसेसरने पॉवर्ड आहे. microSD कार्डद्वारे या फोनची स्टोरेज स्पेस तब्बल 2TB पर्यंत वाढवता येईल. याशिवाय फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, ज्यास 33W फास्ट चार्जर सपोर्ट देण्यात आला आहे.
इतर बातम्या
Flipkart Sale : Narzo 30 Pro, Realme X7 आणि Moto चे स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदीची संधी
धमाकेदार ऑफर! 14 हजारांचा 5G स्मार्टफोन 699 रुपयांत खरेदीची संधी
48MP कॅमेरा, 6000 mAh बॅटरीसह दमदार स्मार्टफोन बाजारात, किंमत फक्त 7999
(Infinix Note 10 Series smartphone now awailable on Flipkart at less than 11000 rs price)