8GB/128GB, 50 MP कॅमेरा, खास गेमर्ससाठी डिझाईन केलेले Infinix Note 11, Note 11S बाजारात

स्मार्टफोन निर्माती कंपनी इन्फिनिक्स (Infinix) आता नोट 11 सिरीजचे अनावरण केले आहे. प्रिमिअम व शक्तिशाली गेमिंग फोन्स म्हणून आपले स्‍थान प्रबळ करणारा नोट 11 एस (6/64, 8/128) 20 डिसेंबरपासून अनुकमे 12,999 रूपये व 14,999 रूपये या सुरूवातीच्या किंमतींमध्ये फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल.

8GB/128GB, 50 MP कॅमेरा, खास गेमर्ससाठी डिझाईन केलेले Infinix Note 11, Note 11S बाजारात
Infinix Note 11
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 6:51 PM

मुंबई : स्मार्टफोन निर्माती कंपनी इन्फिनिक्स (Infinix) आता नोट 11 सिरीजचे अनावरण केले आहे. प्रिमिअम व शक्तिशाली गेमिंग फोन्स म्हणून आपले स्‍थान प्रबळ करणारा नोट 11 एस (6/64, 8/128) 20 डिसेंबरपासून अनुकमे 12,999 रूपये व 14,999 रूपये या सुरूवातीच्या किंमतींमध्ये फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. तसेच नोट 1 (4/64) 23 डिसेंबरपासून 11,999 रूपये या सुरूवातीच्या किंमतीमध्ये उपलब्ध असेल. (Infinix Note 11, Note 11S first sale starts in India via Flipkart, know Price, specs and features)

नोट 11 व नोट 11 एस या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये उत्तमोत्तम फीचर्स, उच्च दर्जाचे गेमिंग तंत्रज्ञान, शक्तिशाली प्रोसेसर, आधुनिक ओएस आणि मोठी बॅटरी आहे, नोट 11 4 जीबी / 64 जीबी आणि ग्लेशियर ग्रीन, सेलेस्टियल स्नो, ग्रॅफाईट ब्लॅक या तीन रंगांच्या व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असेल. नोट 11 एस 6 जीबी रॅम / 64 जीबी व 8 जीबी रॅम / 128 जीबी स्टोरेज पर्याय या दोन मेमरी व्हेरिएण्ट्समध्ये, तसेच सिम्फोनी सियान, हेझ ग्रीन व मिथ्रिल ग्रे या तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल.

इन्फिनिक्सचा नोट सिरीजमधील नवीन स्मार्टफोन नोट 11 6.7 इंच एफएचडी+ एएमओएलईडी डिस्प्ले असलेला स्मार्टफोन क्षेत्रातील पहिलं डिव्हाईस असेल. नोट 11 एस मध्ये 6.95 इंच पंच-होल एफएचडी+ डिस्प्ले आहे, जो 120 हर्टझचे अल्ट्रा-स्मूद रिफ्रेश रेटसह येतो.

फीचर्स

प्रो-लेव्हल गेमर्सच्या सर्व गरजा लक्षात घेत इन्फिनिक्स नोट 11 मध्ये प्रगत मीडियाटेक हेलिओ जी88 प्रोसेसर आहे. किफायतशीर दरातील विभागामध्ये असे शक्तिशाली प्रोसेसर असलेले भारतातील हे तिसरे डिवाईस आहे. या शक्तिशाली प्रोसेसरची सीपीयू गती जवळपास 2 गिगाहर्ट्झ आहे. नोट 11 एस शक्तिशाली मीडियाटेक हेलिओ जी96 प्रोसेसर असलेलं हे या विभागातील दुसरं डिवाईस आहे. ज्यामधून उच्च दर्जाच्या गेमिंग कार्यक्षमतेची खात्री मिळते. गेमिंग कार्यक्षमता नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी दोन्ही डिवाईसेसमध्ये डार-लिंक 2.0 गेम बूस्‍ट तंत्रज्ञान आहे. तसेच दोन्ही डिवाईसेसमध्ये युनिक सुपरकूल यंत्रणा आहे. नोट 11 एस मध्ये हॅप्टिक फिडबॅक लिनियर मोटर आहे, जी वास्तविक गेमिंग अनुभव देते.

स्पेसिफिकेशन्स आणि प्रोसेसर

नोट 11 मध्ये 4 जीबी / 64 जीबी इंटर्नल स्टोरेजसह एलपीडीडीआर4एक्स रॅम आहे. तसेच नोट 11 एस दोन मेमरी व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असेल: 6 जीबी रॅम / 64 जीबी आणि 8 जीबी / 128 जीबी स्टोरेज पर्यायांसह एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि मल्टी-टास्किंगसाठी यूएफएस 2.2 स्टोरेज तंत्रज्ञान आहे.

दोन्ही डिवाईसेस आधुनिक अँड्रॉईड 11 सह आधुनिक एक्सओएस 7.6 स्किनवर संचालित आहेत. ज्यामधून युजर्सना सुलभ व गतीशील सॉफ्टवेअर यूएक्ससह रिफ्रेश आयकॉन्स, नवीन डिझाइन, रिफ्रेशिंग वॉलपेपर्स आणि सुलभ पोहोचसाठी इंटरअॅक्शन क्षेत्राची खात्री मिळते. या स्मार्टफोन्समध्ये बिल्ट-इन वैशिष्ट्ये आहेत जसे खाजगी अॅप्स, मेसेज नोटिफिकेशन्स व मीडिया सुरक्षित ठेवण्यासाठी एक्सहाइड; सुधारित सुरक्षिततेसाठी थेफ्ट अलर्ट, पीक प्रूफ आणि किड्स मोड.

शानदार कॅमेरा

नोट 11 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअपसह 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा लेन्स, एफ/1.6 लार्ज अपर्चर, परिपूर्ण पोर्ट्रेट फोटोज कॅप्चर करण्यासाठी सेकंडरी लेन्ससह 2 मेगापिक्सल डेप्‍थ सेन्सर आणि एआय लेन्ससह क्वॉड एलईडी फ्लॅश आहे. नोट 11 एस मध्ये 50 मेगापिक्सल एआय ट्रिपल रिअर कॅमेरासह 2 मेगापिक्सल माक्रो लेन्स, 2 मेगापिक्सलची डेप्थ लेन्स आणि क्वॉड-एलईडी फ्लॅश आहे. दोन्ही डिवाईसच्या पुढील बाजूस 16 मेगापिक्सल एआय सेल्फी कॅमेरासह ड्युअल-एलईडी फ्लॅश आहे. नोट 11 व नोट 11 एस मध्ये हेवी-ड्युटी 5000 एमएएच बॅटरी आहे. नोट 11 व नोट 11 एस या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 33 वॅट चार्जिंग सपोर्टसह टाइप सी चार्जर आहे.

इतर बातम्या

iPhone 13 सिरीजवर 20000 रुपयांची सूट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर?

Xiaomi 12 या महिन्यात लाँच होणार, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

ऑनलाईन फूड ऑर्डर करताय? 1 जानेवारीपासून द्यावा लागणार टॅक्स

(Infinix Note 11, Note 11S first sale starts in India via Flipkart, know Price, specs and features)

वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...
'सुरेश धस माझ्या मुलाला..', कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
'सुरेश धस माझ्या मुलाला..', कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या.
'आपला पक्ष काँग्रेस झालाय', बड्या नेत्याचा उद्धव ठाकरे गटाला घरचा आहेर
'आपला पक्ष काँग्रेस झालाय', बड्या नेत्याचा उद्धव ठाकरे गटाला घरचा आहेर.
'...आणि सरपंचाला संपवलं', वारंवार फोन करून देशमुखांना बोलवणारा कोण?
'...आणि सरपंचाला संपवलं', वारंवार फोन करून देशमुखांना बोलवणारा कोण?.
साताऱ्यातून जाऊन दाखव... लक्ष्मण हाकेंना कोणी दिली धमकी?
साताऱ्यातून जाऊन दाखव... लक्ष्मण हाकेंना कोणी दिली धमकी?.