5000mAh बॅटरीसह इनफिनिक्स नोट 12 लाँच, फ्लिपकार्टवर खास ऑफर…
तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर, 5000mAh बॅटरीसह इनफिनिक्स नोट 12 हा बजेट 5G स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. यात, ग्राहकांना 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देखील देण्यात आला आहे.
इनफिनिक्सने (Infinix) नुकताच भारतीय मोबाईल बाजारात दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. कंपनीच्या या सिरीजच्या स्टंडर्ड प्रकाराची म्हणजेच इनफिनिक्स नोट 12 5जी (Infinix Note 12 5G) ची आजपासून पहिली विक्री करण्यात येत आहे. हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर (Flipkart offer) खरेदीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने हा हँडसेट Infinix Note 12 Pro 5G सह लाँच केला आहे. हा एक बजेट स्मार्टफोन ठरणार आहे. बजेट स्मार्टफोन असला तरी यात विविध नवीन आकर्षक फीचर्स देण्याचा प्रयत्न कंपनीकडून करण्यात आला आहे. या स्मार्टफोनला 6GB रॅम दिली असून यासह 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी सपोर्ट मिळणार आहे. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिले आहे.
इनफिनिक्स नोट 12 5जी ची किंमत
कंपनीने हा फोन फक्त एकाच कॉन्फिगरेशनमध्ये लाँच केला आहे. त्याच्या 6GB रॅम + 64GB स्टोरेज सोलो व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. ग्राहक फ्लिपकार्टवरून आज म्हणजेच 15 जुलै रोजी दुपारी 12 वाजल्यापासून हँडसेट खरेदी करू शकतात. हा फोन ब्लॅक आणि व्हाईट या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ॲक्सिस बेंक क्रेडिट कार्ड आणि ईएमआयवर 1500 रुपयांची सूट दिली असून एसबीआय कार्डवरही ऑफर आहे.
काय आहेत स्पेसिफिकेशन्स?
Infinix Note 12 5G ला 6.7 इंचाचा AMOLED डिसप्ले मिळत असून तो फुल एचडी + रिझोल्यूशन, 60Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटसह येतो. डिसप्ले पॅनलची ब्राइटनेस 700 निट्सची आहे. सेफ्टीसाठी यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 वापरण्यात आला आहे. हँडसेट ऑक्टाकोर मीडियाटेक डायमेंसिटी 810 प्रोसेसरवर काम करतो. यात 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे. स्टोरेज 2TB पर्यंत वाढवण्याचा पर्याय आहे. डिव्हाइस Android 12 वर काम करतो.
ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप
ऑप्टिक्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्याची मुख्य लेंस 50MP आहे. याशिवाय 2MP डेप्थ सेंसर आणि AI लेंस देण्यात आली आहे. फ्रंटमध्ये कंपनीने 16MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी, 5000mAh बॅटरी उपलब्ध असून ती 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात टाइप-सी चार्जिंग पोर्ट आहे. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर, स्टीरिओ स्पीकर आणि 3.5 मिमी ऑडिओ जॅक होल आहे.