Instagram : मित्राची इन्स्टा स्टोरी पहा! त्याला कळणारही नाही, जाणून घ्या इन्स्टाचा फंडा

मित्राची इंस्टाग्राम स्टोरी पहा. त्याला कळणार देखील नाही. कशी पाहणार स्टोरी, हे जाणून घ्या सोप्या शब्दात.

Instagram : मित्राची इन्स्टा स्टोरी पहा! त्याला कळणारही नाही, जाणून घ्या इन्स्टाचा फंडा
इन्स्टाग्रामImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 12:04 PM

मुंबई : भारतात टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर इन्स्टाग्रामची (Instagram) क्रेझ झपाट्यानं वाढली आहे. सर्व वयोगटातील लोक इंस्टाग्रामवर छोटे-छोटे व्हिडीओ (Video) बनवून शेअर करत आहेत. यासोबतच इन्स्टाग्रामवर स्टोरीजही (Instagram story) बनवता येतात. ज्यामध्ये व्हिडीओ आणि अनेक फोटोंच्या माध्यमातून स्टोरीज बनवल्या जातात. इंस्टाग्रामवर एखाद्याची स्टोरी पाहून यूजरला त्याची स्टोरी कोणी पाहिली आहे, याची माहिती मिळते. बर्‍याच वेळा तुम्हाला अशा मित्राची स्टोरी पहायची इच्छा असते ज्याच्यासोबत तुम्ही बोलणं बंद केलेलं असतं. परंतु तुम्हाला हे देखील हवे आहे की जर त्याला याबद्दल माहिती नसेल तर तुम्हाला त्याची काळजी करण्याची गरज नाही. कारण, स्टोरी पाहण्याची अशी पद्धत आम्ही इथे सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या मित्राला कुणी स्टोरी पाहिली हे कळणार नाही. त्यामुळे तुम्हाला देखील त्याची स्टोरी पाहता येईल.

कशी पाहणार स्टोरी?

इंस्टाग्रामवर स्नीक पीक स्टोरीज पाहण्याचा एक सोपा मार्ग आहे. इंस्टाग्राम वापरकर्त्यांच्या स्टोरी प्रीलोड केलेल्या आहेत. अशा परिस्थितीत, जेव्हाही तुम्हाला स्टोरी गुपचूप बघायची असेल तेव्हा आधी तुमचा स्मार्टफोन एअरप्लेन मोडवर ठेवा. त्यानंतर तुम्ही प्रीलोड स्टोरीवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला स्टोरी दिसेल पण व्ह्यू लिस्टमध्ये तुमचे नाव जाणार नाही. त्यामुळे तुमच्या मित्राला तुम्ही स्टोरी पहायली, हे कळणारच नाही. त्यामुळे ही खास टीप्स आहे.

हे सुद्धा वाचा

प्रीलोड न केल्यास काय करावे?

स्टोरी प्रीलोड न केल्यास काय करावे, असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. कधी कधी खूप स्टोरीजमुळे इंस्टाग्राम अकाउंटमध्ये प्रीलोड स्टोरी दिसत नाही. अशा परिस्थितीत, ज्या युजरची स्टोरी तुम्हाला गुपचूप पहायची आहे. त्याच्या प्रोफाइलला भेट द्या आणि काही सेकंद थांबा. यानंतर तुमचा स्मार्टफोन पूर्वीप्रमाणे Airplane Mode वर ठेवा आणि Story वर क्लिक करा. ही प्रक्रिया केल्यानंतरही तुमचे नाव व्ह्यू लिस्टमध्ये दिसणार नाही.

थर्ड पार्टी अ‍ॅप धोकादायक

थर्ड पार्टी अ‍ॅपवरूनही गुप्तपणे स्टोरी पाहता येईल. इन्स्टाग्रामवर गुप्त गोष्टी पाहण्यासाठी तुम्ही थर्ड पार्टी अ‍ॅप्स देखील वापरू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअर किंवा इतर कोणत्याही वेबसाइटची मदत घ्यावी लागेल. पण इथे आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, हे थर्ड पार्टी अ‍ॅप्स तुम्हाला धोका देऊ शकतात कारण हे थर्ड पार्टी अ‍ॅप्स व्हेरिफाय केलेले नाहीत. त्यामुळे जेही करताय ते सगळ्या गोष्टी पडताळून पहायल्याशिवाय करू नका. यातून तुमचं नुकसानंही होऊ शकतं.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.