Instagram Down : फेसबुक, इन्स्टाग्राम डाऊन, मॅसेज पाठवण्यात अडचणी, सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव
5 जुलै रोजी रात्री 8.30 वाजल्यापासून ते आजही इन्स्टाग्रामवर मॅसेज करण्यात समस्या आहे. फेसबुकवरही तोच प्रकार होतोय. अनेकांनी ट्विटरवर मीम्समधून संताप व्यक्त केलाय. कुणी आपल्याला आलेल्या आडचणींचा पाढा वाचला. तर काहींनी लवकरात लवकर ही अडचण दूर करण्याची मागणी केली.
मुंबई : सोशल नेटवर्किंग साईट इन्स्टाग्राम डाऊन (Instagram Down) झाले असून युजर्स वैतागले आहेत. त्यांनी ट्विटरवर अडचणींचा मीम्सच्या माध्यमातून पाढा मांडला आहे. यूजर्सना (User) मॅसेज (Massage) पाठवण्यात आणि रिसिव्ह करण्यातही त्रास होत आहे. DownDetector ने देखील इन्स्टाग्राम डाउन असल्याची पुष्टी केली आहे. अनेक वापरकर्त्यांनी ट्विटरवर तक्रार केली आहे आणि माहिती दिली आहे की, त्यांना जवळपास 12 तास संदेश पाठवण्यात आणि प्राप्त करण्यात समस्या येत आहेत. 5 जुलै रोजी रात्री 8.30 वाजल्यापासून ते आजही इन्स्टाग्रामवर मॅसेज करण्यात समस्या आहे. DownDetector नुसार इंस्टाग्राम सुमारे 12 तासांसाठी डाऊन आहे. बातमी लिहेपर्यंत सोशल मीडियावर सेकंदा-सेकंदाला इन्स्टाग्राम, फेसबुक डाऊनचे मीम्स ट्विट केले जात होते. याबाबत यूजर्स इन्स्टाग्राम डीएमला ट्रेंड करत आहेत. या डाऊनबाबत यूजर्स ट्विटरवर अनेक प्रकारचे क्रिएटिव्ह मीम्स शेअर करत आहेत.
ट्विटरवर इन्स्टा डाऊन झाल्याचे ट्विट
Me waiting for the instagram dm’s to work again to see the 0 dms I have #instagramdown pic.twitter.com/ug9k1FroWJ
हे सुद्धा वाचा— Alex (@alexculee) July 5, 2022
फेसबुकवर मॅसेज जात नाहीत
अनेक फेसबुक युजर्सनी ट्विटरवर या अॅपच्या मेसेंजरच्या डाऊनिंगची माहितीही शेअर केली आहे. इंस्टाग्रामप्रमाणेच फेसबुक मेसेंजरवरही मॅसेज पाठवण्यात आणि प्राप्त करण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. याआधी 25 मे रोजी सकाळी 9.45 वाजल्यापासून इंस्टाग्राम बंद करण्यात आले होते. त्यानंतर यूजर्सना मॅसेज पाठवताना आणि रिसिव्ह करण्यात अडचणी येत होत्या. दिल्ली, जयपूर, बंगळुरू आणि लखनऊच्या बहुतांश युजर्सनी इन्स्टाग्राम डाऊन झाल्याची तक्रार केली.
ट्विटरवर इन्स्टा डाऊन झाल्याचे ट्विट
People rushing to twitter, to confirm instagram is down or not :))) pic.twitter.com/dyT9D3BJqa
— اسپرسو (@cantcopyquality) July 6, 2022
कधीपासून बंद?
5 जुलै रोजी रात्री 8.30 वाजल्यापासून ते आजही इन्स्टाग्रामवर मॅसेज करण्यात समस्या आहे. DownDetector नुसार इंस्टाग्राम सुमारे 12 तासांसाठी डाऊन आहे. बातमी लिहेपर्यंत काही युजर्सनी ट्विटरवर आपल्या त्रासाची माहिती दिली होती. काहींनी मजेशीर मीम्स देखील ट्विट केल्या. याबाबत यूजर्स इन्स्टाग्राम डीएमला ट्रेंड करत आहेत. या डाऊनबाबत यूजर्स ट्विटरवर अनेक प्रकारचे क्रिएटिव्ह मीम्स शेअर करत आहेत. तर अनेकांनी संताप व्यक्त केला. कुणी आपल्याला आलेल्या आडचणींचा पाढा वाचला. तर काहींनी लवकरात लवकर ही अडचण दूर करण्याची मागणी केली. आता हे कधी सुरळीत होणार ते पहावं लागेल.