Reels बनवणाऱ्यांसाठी Instagram लाँच करणार ‘टेक्स्ट टू स्पीच’ आणि ‘व्हॉईस इफेक्ट’ फीचर

मेटाच्या (Meta) मालकीच्या फोटो-शेअरिंग अॅप इंस्टाग्रामने घोषणा केली आहे की, ते रील्समध्ये दोन नवीन TikTok इन्सपायर्ड फीचर्स 'टेक्स्ट-टू-स्पीच' आणि 'व्हॉइस इफेक्ट्स' जोडत आहेत.

Reels बनवणाऱ्यांसाठी Instagram लाँच करणार 'टेक्स्ट टू स्पीच' आणि 'व्हॉईस इफेक्ट' फीचर
इन्स्टाग्रामवर तुमचा आवडता कंटेट पहायचाय? मग ही सोपी युक्ती करा
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 1:29 PM

मुंबई : मेटाच्या (Meta) मालकीच्या फोटो-शेअरिंग अॅप इंस्टाग्रामने घोषणा केली आहे की, ते रील्समध्ये दोन नवीन TikTok इन्सपायर्ड फीचर्स ‘टेक्स्ट-टू-स्पीच’ आणि ‘व्हॉइस इफेक्ट्स’ जोडत आहेत. इंस्टाग्रामचे टेक्स्ट-टू-स्पीच मूळ स्वरुपात युजर्सना व्हिडिओंमध्ये त्यांचा आवाज वापरण्याची परवानगी देईल. इंस्टाग्रामने व्हॉईस इफेक्ट्स फीचरदेखील जोडले आहेत. नवीन फीचरमुळे आता वेगवेगळ्या आवाजांसह मजेदार व्हिडिओ तयार करणे सोपे झाले आहे. (Instagram to launch Text to Speech and Voice Effects features for reel makers)

व्हॉइस आणि ऑडिओ वापरणे ही रील बनवण्याच्या सर्वात मजेदार पैलूंपैकी एक आहे! म्हणूनच ‘व्हॉइस इफेक्ट्स’ आणि ‘टेक्स्ट टू स्पीच’ हे दोन नवीन ऑडिओ टूल्स आम्ही लॉन्च करत आहोत, असे कंपनीने म्हटले आहे. हे फीचर आता iOS आणि Android वर Instagram युजर्ससाठी लाँच केले जात आहे. स्पीच ऑप्शनमध्ये नवीन जोडण्यासाठी, एकदा तुम्ही क्लिपमध्ये मजकूर जोडल्यानंतर, कंपोजरना स्क्रीनच्या तळाशी असलेल्या टेक्स्ट बबलवर टॅप करावे लागेल, त्यानंतर थ्री डॉट्स मेनूमधून टेक्स्ट-टू-स्पीच पर्याय निवडावा लागेल.

इन्स्टाग्रामचं नवं फीचर – Take a Break

इन्स्टाग्रामने टेक अ ब्रेक (Take a Break) नावाच्या नवीन फीचरचे टेस्टिंग सुरु केले आहे, जेणेकरून लोकांना मेटाच्या मालकीचे हे फोटो-शेअरिंग अॅप वापरण्यापासून नियमित ब्रेक घेण्यास मदत होईल आणि वापरकर्त्यांना त्यात व्यस्त राहण्यास प्रोत्साहित केले जाईल. इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी (Adam Mosseri) यांच्या म्हणण्यानुसार, दीर्घकाळापासून मागणी केलेले टेक अ ब्रेक फीचर युजर्सना आठवण करून देईल की त्यांनी या प्लॅटफॉर्मवर बराच वेळ घालवला आहे.

तुम्ही या फीचरचा वापर सुरु केल्यास ते तुम्हाला अॅपवर ठराविक वेळ घालवल्यानंतर Instagram तुम्हाला 10, 20 किंवा 30 मिनिटांचा ब्रेक घेण्यास एनकरेज करते, असे मोसेरी यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. अॅडम मोसेरी म्हणाले की, टेक अ ब्रेक डिसेंबरमध्ये उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

इन्स्टाग्राम आपल्या किशोरवयीन युजर्ससाठी हानिकारक असल्याची टीका होत असताना हे नवीन फीचर आले आहे. अलीकडे, अमेरिकन व्हिसलब्लोअर फ्रान्सिस हाउगनने खुलासा केला आहे की, लोकप्रिय सोशल मीडिया अॅप्स किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम करू शकतात.

इतर बातम्या

48MP कॅमेरा आणि दमदार फीचर्स, नोकियाचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच, किंमत…

50MP कॅमेरा आणि आकर्षक डिझाईनसह Poco M4 Pro 5G स्मार्टफोन बाजारात, जाणून नव्या स्मार्टफोनमध्ये काय आहे खास

64MP क्वाड कॅमेरा, मीडियाटेक प्रोसेसर, स्टाँग बॅटरीसह Lava चा पहिला 5G फोन बाजारात, कंपनीकडून 2000 रुपयांचा डिस्काऊंट

(Instagram to launch Text to Speech and Voice Effects features for reel makers)

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.